Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Raj Mohite

Comedy Drama Others


3  

Raj Mohite

Comedy Drama Others


पहिली भेट

पहिली भेट

3 mins 221 3 mins 221

रस्त्यावर पडलेल्या एका लेडीज पर्स ने माझे ध्यान आकर्षित केले. एक पर्स त्यात ७०२ रुपये आणि काही आयडी कार्ड आधार पॅन कार्ड आणि एक नंबर मला जाणीव झाली कुणा गरिबाचे पर्स असेल कारण त्यावरचा फोटो पाहून मला कीव आली ते परत करण्याचे ठरविले.

ते पर्स होते एका ४७ अर्धवट वयाच्या स्त्रीचे त्यावरचा नंबर एक दोनदा प्रयत्न करूनही लागत न्हवता. आणि लागला तर कुणी उत्तर देत न्हवते.

अखेर विचार केला आणि एक मेसेज केला

मला सदर एक स्त्रीचे पर्स सापडले आहे काही महत्त्वाचे आयडी कार्ड त्यात आहेत आणि काही रोख रक्कम आयडी वरील नाव जया पाटील वय ४७ आपल्या ओळखीचे असल्यास संपर्क साधा अन्यथा मी ही पर्स अंधेरी पोलिसांच्या ताब्यात देत आहे उद्या तेथून हस्तगत करावे ही विनंती --- राज........

आणि मी माझ्या घरी पोहचलो जेमतेम रात्री मला ८ वाजता त्या नंबर हून कॉल आला प्रिया म्हात्रे ती म्हणाली ते पर्स माझ्या मावशीचे आहे ती पुण्याला असते परवा मुंबई हून पुण्याला जाताना हरविले आहे pls मला द्याल का??

विनवणी करत होती मी सरळ म्हटले नक्की पण त्या साठी तुम्ही अंधेरी पोलिस स्टेशनला या

पोलिस स्टेशन ते कशाला ???? तिने आश्चर्याने विचारले

माफ करा इतर कुणाची वस्तू मी खात्री करून घेतल्या शिवाय नाही देणार.

कसली खात्री???

कुणाची खात्री ??? मिस्टर माझं ऐकुन घ्या जया पाटिल माझी मावशी आहे.

माफ करा पण तुम्ही पोलिस स्टेशनला या रीतसर ओळख दाखवा आणि घेवून जा.

मी समजावतीच्या सुरात म्हटले

तिने फोन ठेवतांना आणि तिच्या तोंडून माझ्या बद्दल निघालेले मस्त वाक्य

"घाला मड्यावर तुमच्या" 😀😀😀😀😀😀😀😀

तिला वाटले फोन डिस्कनेक्ट झाला आणि ती बोलुन गेली

मी विचार करत बसलो आयला मदत करायचं म्हटले तरी शिव्या खाव्या लागतात.😀😀😀😀😀 खरेच माणसाने मदत करणाऱ्याला thanks you म्हणायचे सोडले की काय???😀😀😀😀😀😀

काही असो आता तर पोलिस स्टेशनला आल्या शिवाय पर्स द्यायची नाही हे पक्के केले

जेमतेम ७ दिवस जास्त गेले आणि मलाच अंधेरी पोलिस स्टेशन मधून कॉल आला. पोलिस पण पोलिसाची भाषा बोलतात जसे आहात तसे या बिना नाष्टा अंघोळ सह कुटुंब चौकीत आता चौकीत गेल्या वर माझ्या आईला तिची जुनी मैत्रीण भेटली ती बोलत बसली तिच्या शी

हवालदार त्याच्या सुरात कधी सापडले??? कुठे सापडले??? कसे सापडले???

आता त्या पर्स साठी मला पंचाग बघायला लागला मी मनाशी म्हटले हे पोलिस की भटजी माझी कुंडली काढतात की पर्स ची 😁😁😁😁😁😁😁

माझ्या जवळ बोलून झाल्यावर त्या महाराणीला बोलाविले प्रिया म्हात्रे तुम्ही या आता परत तिची कुंडली तपासली भटजी ने मग तिला पर्स परत दिली.

त्यात मॅडमची एक तक्रार

७०२ रुपये होते २ रुपये कमी आहेत???😁😁😁😁😁

आयाला पर्स परत करायला आई बाबांना ५०० ची taxi करुन आलो आणि ही दोन रुपयाला भांडते ???😁😁😁😁

कमाल आहे बुवा

बाबा म्हणाले सुट्टे आहेत हे घ्या परत त्यांनी भटाला २ रुपये दक्षणा दिली 😁😁😁😁😁😁😁

तुमच्या मावशीला बोलवा मावशी बाहेर आहे ज्या वेळी मावशीला ती बोलवायला गेली त्यावेळी तिची मावशी अँड माझी आई सोबत आल्या तिची मावशीच माझ्या आईची मैत्रीण 🙄🙄🙄🙄🙄🙄

गम्मत अशी की तिच्या मावशीने माझ्या मम्मीला बाहेर गप्पा मारताना भाची साठी स्थळ शोधायला सांगितले आणि मम्मीने सरळ माझ्या साठी विचार केला.

अगदी लग्नाची सर्वच बोलणी पोलिस स्टेशनमध्ये झाली होती लग्न फक्त बाकी होते भटजी समोर होतेच म्हणा 😁😁😁😁😁😁

घरच्यांच्या बोलणी सुरू असताना ती माझ्या जवळ एक नजर बघत होती आता नक्की विचार केला आपली काही खैर नाही 😰😰😰😰😰😰

जाताना मम्मी एकाच म्हणाली योगायोग आहे ना नाहीतर इतकी चांगली संस्कारी मुलगी शोधून कुठे मिळाली असती का???😁😁😁😁😁

नक्की बघ कुंडलीत पण ३६ गुण जुळतील

घ्या ३६ ना पक्का चांगला आकडा आहे कुंडली जूळो न जूळो आकडा ३६ नक्की जुळेल.😁😁😁😁

खरेच ह्या पहिल्या भेटीत नंतर मी एकच विचार केला रस्तावर काही पडले असो आपण त्या भानगडीत पडायचे नाही

जाताना ७०२ पकडून सरळ घर गाठले 😁😁😁😁😁


Rate this content
Log in

More marathi story from Raj Mohite

Similar marathi story from Comedy