akshata alias shubhada Tirodkar

Action Fantasy

3  

akshata alias shubhada Tirodkar

Action Fantasy

सीआयडी इन रामगड

सीआयडी इन रामगड

3 mins
540


वाऱ्याच्या झोक्यासारखी एक गाडी येऊन ठाकूरच्या हवेलीसमोर उभी राहते. गाडीचा आवाज ऐकून ठाकूर बाहेर येतो. 

"या या सी आय डी"

"बरं सांगा कसली मदत हवी तुम्हाला? "

"सर पहिले काहीतरी खाऊन ह्या "

"नाही पहिली काम एकदा काम फते झालं कि मेजवानी करू "

"बरं तर मी तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण आमचा हा गाव एका दहशतीत जगत आहे आणि ते फक्त एका गुंडामुळे... ज्याने आमचे जीवन मुश्किल केले आहे. गब्बर त्याचे नाव. लुटपाट, खून हेच त्याचे काम. गावात ना कसले सण ना कसले उत्सव साजरे होतात. गावातल्या डोंगराळ भागात त्याचा अड्डा आहे त्या बाजूने जायचं लोकांनी केव्हाच टाळलं. कित्येकांनी तर आपल्या काजू बागायतीवर पाणी सोडले. प्लीज आम्हाला त्याच्यापासून वाचवा. "


"ओह गब्बर काय आता सी आय डी दाखवेल त्याला भय काय असतो तो "

"दया अभिजीत लेट्स गो"

"एस सर मिशन गब्बर बिगेन "


दया, अभिजीत आणि प्रदुमन सर डोंगराळ भागाकडे जाण्यास वळतात. त्यांना चालत जाताना पाहून आपल्या धनोसह हितगुज करणारी बसंती टांगेवाली तिथे पोहचते. 


"ओह साहेब कुठे चाललाय, सोडू तुम्हाला "?

"नको फक्त एवढच सांग हाच समोरचा रस्ता गब्बरच्या अड्डयाकडे जातो ना "

"कोण गब्बर साहेब तुम्हला कशाला हवा तो तुम्ही तर शहरातले बाबू दिसता असल्या गुंडांशी कसलं काम साहेब तो लई खतरनाक आहे जाऊ नका तिथे "

'तो असेल खतरनाक पण मी त्याला नाही घाबरत "

"म्हणजे साहेब "

"मी त्याला पकडायला आलोय "

"म्हणजे तुम्ही पोलीस आहात"? 

"सी आय डी इन्सेक्टर अभिजीत "

"साहेब पकडाच त्याला बरं साहेब मी बसंती ह्या गावची टांगेवाली "

"अभिजीत काय करतोस कसल्या गप्पा मारतोस "

"काही नाही सर आलो '

"काय अभिजीत नवीन गावची मैत्रीण वाटत तारिकाला सांगावं लागणार "

"दया तू पण ना "

"काय रे कसली कुजबुज चालू आहे तुमची ?"

"काही नाही सर" 

'चला तर फास्ट '


डोंगराच्या मध्यभागी गब्बरचे साथीदार बंदूक घेऊन पहारा देत होते. त्याच्यात आणि सीआयडीमध्ये चकमक झाली आणि त्यांना ढेर करत ते तिघे मुख्य गब्बरच्या ठिकाणी पोहचले. गब्बर सांबाबरोबर बोलण्यात व्यस्त होता. पण त्याच्या गब्बरी नजरेने त्यांना घेरले आणि आदेशानुसार बांधण्यात आले.


"वाह ठाकूर वाह मला पकडायला शहरातून सी आय डी बोहोत नाइन्साफी हे रे तुम्हला काय वाटलं तुम्ही याल आणि मला पकडाल "

"हा हा हा हा हा "

"तुला तर आम्ही पकडणारच फक्त हे हात सुटू दे "

"खूप ऐकलं होत सी आय डी बदल आज दर्शन झालं आता इथेच पाहुणचार करा "

"पाहुणचार तर तुचा करणार आम्ही "

"माझा हा हा हा हा "

"सांबा कितने आदमी हे रे ?"

"सरदार ३"

"ये दिन और हम ५० और हमे पकडेगे "

"हा हा '

हसून घे गब्बर आता तुझी वाट लागणार आहे... 


फ्रेडी पंकज श्रेया आणि पूर्वी सीआयडीची टीम रामगडमध्ये पोहोचते. ठाकूरच्या माहितीनुसार ते पण डोंगराळ भागात पोहोचतात. हळूहळू वर चढून मुख्य अड्ड्यापाशी पोहचतात. काही साथीदार उभे होते. श्रेया आणि पूर्वीने चपळाईने त्यांना चित केले. तोपर्यंत पंकज आणि फ्रेडीने त्याचे हात सोडले. आता फक्त उरले होते गब्बर आणि सांबा. हात सुटताच प्रदुमन सरांनी दयाला आदेश दिला, 

"दया इथे दरवाजा नाही तोडण्यासाठी पण हा गब्बर आहे फोड त्याला "

"यस सर म्हणत दया ने गब्बर ला एक मुका मारला " सांबा तर भीतीने आपले पंख आधीच गाळून बसला होता. 

'चल गब्बर आता जेलचा पाहुणचार घे फाशी होईपर्यंत "


गब्बरची रवानगी जेलमध्ये करून पुरी सीआयडी टीम रामगडच्या आनंदात सहभागी झाली... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Action