Jyoti gosavi

Classics

4.0  

Jyoti gosavi

Classics

श्रीधरस्वामी

श्रीधरस्वामी

4 mins
177


श्रीधर स्वामी यांचे साहित्य


महान साहित्यिक संत श्रीधर स्वामी ,यांची आणि माझी अगदी लहानपणापासून त्यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून ओळख झाली .

घरामध्ये भक्तीचा आणि अध्यात्माचा वारसा असल्यामुळे ,

आई दर श्रावणामध्ये "हरिविजय ,रामविजय शिवलीलामृत "हे ग्रंथ लावीत असे. 

ऐकायला आजूबाजूची पाच पंचवीस मंडळी येत होती. आणि आई त्या ओव्यांचा अर्थ सर्वांना विशद करून सांगायची ,त्यामुळे लहानपणापासूनच अध्यात्माची गोडी लागली. आणि ज्यांच साहित्य आपण लहानपणापासून ऐकल आहे आणि आता अनेक वेळा वाचला आहे, त्यांच्याबद्दल लिहणे मला सोपे वाटले. 


त्यांनी रामविजय ,हरिविजय, पांडवप्रताप ,शिवलीलामृत अशा अनेक ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. 

त्यांच्या लिखाणामध्ये उपमा आणि अनुप्रास अलंकार अगदी पावलोपावली भरलेला आहे.पण लेखनाची हातोटी अशी की, तो काळ तुमच्या डोळ्यापुढे उभा राहील. 


ते म्हणतात जशी मिठाशिवाय जेवणाला रुची नाही, तशी उपमा अलंकार शिवाय ग्रंथाला सौंदर्य नाही. नाहीतर एक साधी सरळ कथा पाच मिनिटात सांगून होईल.

काही ठिकाणी त्यांच्या त्याच त्या उपमा पुन्हा पुन्हा येतात, पण तरीही त्या गोड वाटतात .

हरिविजय अठरावा अध्याय मध्ये श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला जातो, तेव्हा यशोदा आणि इतर गोपींनी केलेला शोक, इतके छान शब्दांकन केले आहे की आपण त्यात रममाण होतो. प्रत्येक वेळी तो अध्याय वाचताना माझ्या डोळ्यातून आजही गंगा जमुना वाहू लागतात. 

तसेच तत्वज्ञानाचा विसावा अध्याय सांदिपनी ऋषींना श्रीकृष्ण ब्रह्मच्या ठिकाणी स्फुरण होण्याचे कारण विचारतात ,आणि श्रीधर स्वामींनी अगदी सोप्या शब्दांमध्ये ब्रह्म "अहम ब्रह्मस्मी "हा ध्वनी उठला आणि परम पुरुषाच्या ठायी स्फुरण झाले. 

त्यानंतर ब्रह्मांडाची, या सृष्टीची कशी निर्मिती झाली. 

उत्पत्ती स्थिती आणि लय, पंचमहाभूते एकमेका तुन कशी निर्माण होतात, आणि प्रलयाच्या वेळी एकमेकांमध्ये कशी विलीन होतात .अगदी सोपे सरळ करून सांगितले आहे. 

असे रसाळ कथन प्रत्येक अध्यायात आलेले असून, श्रीकृष्ण जंगलामध्ये गायी गुरे चरावयास घेऊन जात असताना, तेथे असणाऱ्या नानाप्रकारच्या वृक्षांचे वर्णन, ज्यांची नावे आजही आपल्याला देखील ठाऊक नसतील .

लढाईमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे वर्णन , वेगवेगळ्या जातीच्या घोड्यांचे वर्णन, 

एक औक्षहीणी सैन्य म्हणजे किती ?

नवविधा भक्ती चे प्रकार, कृष्णाचा रास रंग, रासक्रीडा परंतु प्रत्येक गोपी कशी कोणत्या ना कोणत्या भक्तिभावाने बांधलेली होती. असं सगळं खूप छान आहे. जमा गाई गुरांचे वर्णन केलेले आहे, तेव्हा किती प्रकारच्या गाई आहेत,? त्यांची नावे किती ?त्यांचे वर्णन कसे? त्यांचे गुणविशेष काय ?इत्यादी सर्व माहिती आपणास मिळते. 

म्हणजे अगदी कितीही आस्वाद घेतला तरी प्रत्येक वेळी नवीन प्रकारची, वेगळ्या प्रकारची तृप्ती होते. 


"जे न देखे रवि ,ते देखे कवि"

 या उक्तीनुसार ज्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान नाही, 

त्या काळात पृथ्वी गोल आहे. पृथ्वी व सूर्याचे अंतर किती आहे? 

त्या काळात विमानाचा शोध होता. इत्यादी अनेक गोष्टींचे दाखले या ग्रंथामध्ये येतात. 


अशाच पद्धतीने त्यांनी रामविजय आणि शिवलिलामृत हे ग्रंथदेखील असेच उपमेय उपमान अनुप्रास अलंकार वापरून गेलेले आहेत .

भक्तिभावाने ओतप्रोत भरलेले हे साहित्य आहे. 

जे आजही घराघरांमध्ये वाचले जाते, भक्तिभावाने ऐकले जाते. 

सज्जनगडावर गेल्यानंतर प्रवेशद्वारापाशीच श्रीधर स्वामींची समाधी आणि छोटेसे मंदिर आहे. त्याचे देखील दर्शन अनेक वेळा झालेले आहे. 

अशा या संत साहित्यिक 

 श्रीधर स्वामींना माझा प्रणाम


 आता थोडीशी श्रीधर स्वामींचा बद्दल माहिती पाहूया . 


महान संत प.पू. भगवान श्रीधर स्वामी महाराज मूळचे मराठवाड्यातील गळेगांव ता. बिलोली जिल्हा नांदेड स्वामीजींच्या मातापित्यांनी गाणगापूरला कठोर तपश्‍चर्या केली. दत्तमहाराजांचा संपूर्ण आशीर्वाद लाभला.आणि त्या आशीर्वादाचे गोंडस फळ म्हणजे प.पू. स्वामीजींचा जन्म.श्रीधर स्वामीजींचा जन्म १९०८ साली दत्तजयंतीच्या दिवशी झाला.


श्रीधर स्वामी

लहानपणापासूनच यांना कथाकीर्तने ऐकण्याची गोडी लागली होती. तसेच रामनामाने हुकमी यश मिळते, असाही त्यांना अनुभव आला होता. शाळेचा अभ्यास, खेळ, देवपूजा, कथाकीर्तनश्रवण व व्यायाम अशा गोष्टीत यांचा बाळपणाचा काळ मजेत चालला होता. पण वयाच्या बाराव्या - तेराव्या वर्षी यांची आई वारली आणि त्यात खंड पडला. त्यानंतर हैदराबाद व गुलबर्गा येथे नातेवाईकांकडे राहून यांनी आपले प्राथमिक शिक्षण पुरे केले व माध्यमिक शिक्षणासाठी हे पुण्याला गेले. पण वेद, उपनिषदे, पुराणे यांना गौणत्व देणाऱ्या आणि आपल्या धर्माची श्रद्धा लोपवून टाकणाऱ्या इंग्रजी शिक्षणात यांना गोडी वाटेना. . श्रुतिस्मृतिपुराणोक्त समाजाच्या उभारणीनेच भारताला पूर्ववत् वैभव प्राप्त होईल, अशी यांची श्रद्धा होती. तेव्हा सनातन आर्य धर्माच्या प्रसारासाठी आपण आपले जीवन समर्पित करावे, असे स्वामींनी ठरवले. त्यासाठी आपण अध्यात्मिक क्षेत्रात अधिकार मिळवावा, असे स्वामींच्या मनाने घेतले. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी योग्य अशा गुरूची कास धरावी लागते, त्याचप्रमाणे उग्र तपश्चर्याही करावी लागते हे यांना माहीत होते. म्हणून यांनी एका विजयादशमीला सज्जनगडावर तपस्येसाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी आज हा देह भगवंताला अर्पण करायचा, म्हणून यांनी एका कागदावर पुढील अर्थाचा मजकूर लिहिला -" मी अामरण अस्खलित ब्रह्मचर्य पाळीन. द्रव्याला शिवणार नाही. न मागताही आग्रहाने कोणी दिल्यास त्याचा उपयोग परोपकारार्थ करीन. मठपती होऊन कुठेही राहणार नाही. गरीबाला शक्य होण्याइतक्या साध्या गरजा ठेवीन. स्त्रीपुरूषांना समदृष्टीने बोध करीन. अखिल स्त्रीसमाज मातेप्रामाणे मानीन. देहनिर्वाहाच्या गरजा शक्य तितक्या कमी करून, होईल तितक्या लोककल्याणाकरिता मी तनमनधनाने झटेन, होईल तितका प्रयत्न करून धर्माची अवनती घालवून जग सुखी करीन. हे सर्व पूर्ण होण्याकरिता हा देह कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुम, अशा भगवंताला मी अर्पण केला आहे. मी मुक्त होऊन जगाला मुक्त करावे, हा पुढचा सर्व भार भगवंतावर आहे. त्याने आपल्या ब्रीदाला उणीव न येईल अशा रीतीने या शरण आलेल्या भक्ताचे काळजीपूर्वक संरक्षण करावे. यापुढे या देहाकडून होणाऱ्या चांगल्या किंवा वाईट कर्माचा जबाबदार तोच आहे."


स्वामीजींना लहानपणापासून अध्यात्माची ओढ आणि आवड होती. या ओढीनेच स्वामीजींना समर्थांच्या सज्जनगडावर आणले.सज्जनगडावर स्वामीजींनी साधनेबरोबरच समर्थांची सेवा सुरू केली. साधनेबरोबरच सज्जनगडावर सेवेलाही विलक्षण महत्त्व आहे.कल्याण स्वामींनी समर्थांच्या सान्निध्यात सेवा करून चंदनाप्रमाणे आपला देह सद्गुरूंच्या चरणी झिजवला.... त्या कल्याण स्वामींच्या सेवेची आठवण पुन्हा प. पू. भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी करून दिली.....


साधन आणि सेवेने पावन होऊन सज्जनगडावर समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन कल्याण स्वामींना दर्शन दिले होते..... त्याच पद्धतीने श्रीधर स्वामींनाही समर्थांनी समाधीच्या बाहेर येऊन प्रत्यक्ष दर्शन दिलेले आहे.... व दर्शन देऊन स्वामीजींना दक्षिणेकडे (कर्नाटकात) जाऊन कार्य करण्याची समर्थांनी आज्ञा केली..... त्याप्रमाणे श्रीधर स्वामींचे महान कार्य महाराष्ट्रात आहेच..... त्याप्रमाणे दक्षिणेकडेही स्वामीजींनी समर्थांना अभिप्रेत असणारा परमार्थ सर्वसामान्यांना शिकवला.....श्रीधर स्वामींनी आर्य संस्कृती नावाचा ग्रंथ लिहिला.



श्रीधर स्वामींची समाधी.

आर्य संस्कृती हा स्वामीजींनी लिहिलेला ग्रंथ साधकांना साधनेची दिव्यानुभूती देणारा आहे..... साधक अवस्थेतून सिद्धावस्थेपर्यंत पोहोचलेले महान संत श्रीधर स्वामी महाराजांनी १९७३ साली वरदहळ्ळी (वरदपूर), ता. सागर, जि. शिमोगा (कर्नाटक) येथे महासमाधी घेतली.....


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics