शॉपिंग
शॉपिंग
बायको किंवा गर्लफ्रेंडबरोबर शॉपिंगला जाणाऱ्यांना विचारायला नको. त्यांची काय अवस्था होते???
पन्नास दुकान १०० ब्रँड आणि २५ सेल्स पर्सन जो पर्यंत त्यांची स्तुती करत नाही. तो पर्यंत शॉपिंग त्यांची संपत नाही.
सेल्स मन पण काय??
मॅडम हा कलर तुम्हाला खुलून दिसेल .... हे मार्केट मध्ये नवीन आहे...... मॅडम अगदी तुमच्या मापाचे आहे......हा नवीन ब्रँड आहे..... तुमच्या गळ्यात शोभून दिसते....
कुणी विचारले नाही तर सांगा माझे नाव बदलतो.....
किंमत ची कशाला परवा करता तुम्ही नेहमी येता तुम्हाला डिस्काउंट देवू.....
मायला त्या सेल्समनच्या नेहमी येता म्हणे...
ह्याच दुकान परवा उघडले आणि सांगतोय नेहमी येता..
आणि किंमत ची परवा करू नका???? ती कशाला करणार आहे परवा ?????
परवाच तर पगार झालाय.....
कधी कधी तर नवीन काही तिचे
खूप स्वस्त आहेत रे ब्रँड नाही .... कलर जाण्याची भिती आहे.... आवडली नाही तुला ना??? चल दुसरी कडे...
खूप महाग आहे रे मला सवय नाही महाग गिफ्ट ची.....
तिला बाकी सर्व महाग मीच बरा स्वतात भेटलो...
आता माझ्या आवडीचे कधी तिने काही घेतले आहे का???
विचारते मला तशी ....
हे बघ ना कशी दिसते????
काही मी बोलायच्या आतच ......
तुला ना काही विचारला नको... तुझा कलर कॉम्बिनेशन बरोबर नाही....
भैय्या ये कैसा लग राहा हैं?????
पैसा माझा विचार भैयाचा....
कधी कधी तर तिच्या शॉपिंग ची चिड येते ..... पूर्ण दिवस गेला तरी तिला काही आवडत नाही.....
ते दाखवा ... राईट मधून तिसरे .... लेफ्ट मधून दुसरं
लांबून छान दिसत होता पॅटर्न....
सर्व दुकान पाहिले तरी चप्पल पसंत नाही....
सर्व दुकान पॅटर्न पाहून झाल्यावर तो बॉक्स दाखवा नवीन पॅटर्न दिसतोय...
मॅडम तो पॅटर्न नाही माझा टिफीन बॉक्स आहे...
आता त्याच्या आतील पॅटर्न त्याच्या बायकोला माहित...
परत दुसरे दुकान तशी आहे काळजी माझी तिला
अच्छा तू बोर नाही होत ना?????
काही मना सारखे नाही रे काही पण दाखवत आहेत.???
तुला आवडले का????
हो म्हटले तरी नुकसान नाही म्हटले तरी खड्ड्यात....
लग्ना नंतर पण तेच फक्त शॉपिंग ची पद्धत बदलते...
तुला काही नाही कळत ...??
हा साबण चांगला .... हे कुकिंग ऑईल छान आहे..
माझी बहिण पण हीच पावडर वापरते .....
अच्छा तरीच इतकी काळी ..???
मायला त्या D MART च्या नुसता लोभ उभा करून ठेवतात..
सहज बायको गेली होती ऑफर मधे चहा घ्यायला .....मला चहा जास्त आवडतो ना म्हणून माझ्या आवडीची चहा पावडर आणायला पाठवली.
चहा ची ऑफर नंतर आजुन एक साखर सोबत तांदूळ...
तांदूळ सोबत बाजरी.... मासाल्या सोबत हळद... साबण सोबत शाम्पू... तूरडाळ सोबत गहू.... आणि गव्हा सोबत आम्ही भरडले गेलो.
१९९ ऑफर ची चहा आणायला गेलेली बायको
७१९९ चे बिल करून आली. सांगा ऑफर केवढ्याला पडली मला..
त्या दिवसा पासून ऑफर पहिली की फेफर येत...
म्हणे बायका काटकसर करतात.????
हो कसलीच कसर न करता काट काट करतात...
इतके आता शहाणपण आले आहे
बायकोला D MART
GF ला Mall दाखवायचं नाही..
नाही तर आपल्याला माती मॉल व्हावे लागेल
