Bharati Sawant

Romance

3.3  

Bharati Sawant

Romance

शीर्षक - माझे जीवन गाणे

शीर्षक - माझे जीवन गाणे

3 mins
1.1K


  

       म्हणतात ना 'प्रेम आंधळ असतं, ते कधी कोणाशी होईल प्रत्यक्ष परमेश्वरही सांगू शकणार नाही.तशा लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात असे म्हटले जाते. माझ्या लग्नाची ही गोष्ट अशीच काहीशी आहे. रविवारची प्रसन्न सकाळ......

बाबा मस्त गाणी ऐकत बाल्कनीतल्या आरामखुर्चीवर डोळे मिटून बसले होते. मी आणि आई स्वयंपाकाच्या तयारीला लागलो होतो. तशी मी अठराच वर्षांची होते. परंतु बाबा जुन्या वळणाचे असल्याने मुलीचे लग्न वेळेतच व्हावे असे त्यांचे मत होते .त्यामुळे नातेवाईकांच्यातही त्यांनी सांगून ठेवले होते ," एखादे चांगले स्थळ आले तर सुचवा आम्हाला शैलाच्या लग्नाचे पाहत आहोत".बाबांचा किंचित डोळा लागला असेल तेवढ्यात दारातंच गाडीचा ब्रेक दाबल्याचा आवाज आला नि त्यांची तंद्री भंग पावली.आई देखील गाडीतुन कोण आलेय पहायला पदराला हात पुसत बाहेर आली.माझी छोटी बहिण भाऊ अंगणातच खेळत होते. अचानक आपल्या दारात गाडी आल्याचे पाहून तेही खेळ अर्ध्यावर टाकून धावतच आले.पाहतात तर काय! गाडीतून एक वयस्कर जोडपे जे खूप सुशिक्षित, खानदानी वाटत होते नि एक तरुण गाडीतून उतरले. तरूणाने डोळ्याला गॉगल लावला होता. अतिशय देखणा होता तो !

         आई-बाबां नि भावंडे सारेजण कपाळावर प्रश्नचिन्ह घेऊन गाडीतून उतरलेल्या अनाहूत पाहुण्यांकडे डोळे फाडुन पहात होते. कारण गाडी देखील खूप महागडी होती आणि आमच्या सर्व नातेवाईकांपैकी कोणाकडेही तशी गाडी नव्हती. मग कोण असतील हे पाहूणे?बाबांना काहीच सुचत नव्हते. पण ते सरळ घरातच आले आणि बाबांचे नाव घेऊन घरात आहेत का असे विचारले. बाबांनी हात जोडून हसून त्यांचे स्वागत केले. तसे ते तिघे घरात येऊन सोफ्यावर घरात सोफ्यावर विराजमान झाले.दरम्यान आई पाणी आणायला आत वळली नि न समजून भावंडेही आतल्या खोलीकडे पळाली.बाबांना सुरुवात कशी नि कुठून करावी हेच कळेना .तरीही ते म्हणाले, "नमस्कार पण मी आपणास ओळखले नाही. कृपया आपली ओळख सांगाल का"? तशी वयस्कर व्यक्तीपैकी पुरूष व्यक्ती उठून उभे राहिले आणि म्हणाले, "माफ करा आम्हाला, काही न कळवताच आम्ही तुमच्या घरी आलो. मी श्री. मुकुंद परांजपे. परांजपे इंटरनॅशनल कंपनीचे मालक. या माझ्या पत्नी सौ. वसुधा परांजपे. यांही आमच्या कंपनीच्या कामकाजात मला मदत करतात". इतके बोलून ते थोडे थांबले आईने दिलेले पाणी पिवून त्यांनी रुमालाने आपला चेहरा पुसला आणि पुढे बोलू लागले,"तुमची शैला आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे ना? आमचे चिरंजीव इंजिनिअर असून आमच्या कंपनीत 'चीफ एक्झेक्युटिव्ह' म्हणून कारभार पाहतात. आमच्या कंपनीचा सारा माल परदेशी जातो .त्यामुळे महिन्यातून बऱ्याचदा आमच्या दोघांचे परदेश दौरे होतात.

      बाबांना अजूनही उलगडा होत नव्हता की हे लोक स्वतःची माहिती का सांगत आहेत. आमच्या घरात का आलेत? त्यांची काही चूक तर झाली नाही ना? मी छोटासा शाळा मास्तर. कितीही काटकसर केली तरी महिन्याच्या वीस तारखेला माझा पगार संपतो.पत्नीचार घरी स्वयंपाकाचे काम करते नाहीतर आमचे काही खरे नव्हते .आणि ही मातब्बर दिसणारी मंडळी आमच्या घरात का आली असतील? ते साहेब पुढे बोलू लागले," माझ्या बहिणीची मुलगी तुमच्या मुलीच्या वर्गातच आहे परवा ती काही कामानिमित्त माझ्या घरी आली होती .तिच्यासोबत तुमची मुलगी ही आली होती. माझ्या भाचीचे थोड्या वेळासाठी काम होते. परंतु हे चिरंजीव कंपनीत जाण्यासाठी हॉलमध्ये आले. त्याची आणि तुमच्या मुलीची नजरानजर झाली. पाहताक्षणी तिने याच्या हृदयात घर केले आहे. आता लग्न करीन तर हीच्याशीच' म्हणून जिद्द करून बसले आहेत. तसे त्याच्यासाठी खूप मोठी स्थळे सांगून आलेत पण काय करणार! एकुलते एक चिरंजीव! त्यांचा हट्ट मी नाही पुरा करणार तर कोण? एवढे बोलून थोडा वेळ थांबले.

       माझ्या बाबांनी वासलेला आ तसाच होता. आता मात्र बाबा तंद्रीतून जागे झाले नि बोलते झाले," पण साहेब तुम्ही कुठे नि आम्ही कुठे? आम्हाला हे सर्व कसे जमणार "? पण गडगडाटी हास्य करत निशांतचे म्हणजे त्या तरुणाचे बाबा म्हणाले, "अहो तुम्ही तुमची मुलगी आम्हाला द्यायची आणि आम्ही तिला आमच्या घरी न्यायची. इतके तरी जमेल की घराच्या अंगणातच मुलीला न्यायला रथ आणू"? बाबांना आनंद नि आश्चर्य यांचा संमिश्र धक्का बसला. हे काय घडतेय त्याच्यावर विश्वास ठेवायला त्यांचे मन तयार होईना.त्यांनी स्वत:ला एक चिमटाही घेवून पाहिले पण हे सारे सत्य होते.आज पोरीने नशीब काढले होते. तिचे सौंदर्य नि संस्कारांचा विजय झाला होता.एका फार मोठ्या घराची ती सून होणार होती.बाबा भानावर आले नि आईला मोठ्या आवाजात बोलले," अहो,बाहेर या,पहा हे काय म्हणता आहेत.आई आतून सारे काही ऐकत होती. तिचा तिच्या डोळ्यांवर नि कानांवर विश्वासच बसत नव्हता .आपल्या अप्सरेप्रमाणे दिसणाऱ्या सद्गुणी मुलीने आज नशीब काढले म्हणून ती देव पुढे ठेवायला पळाली.Rate this content
Log in

Similar marathi story from Romance