शब्दरूपी अश्रू....
शब्दरूपी अश्रू....


शब्द जेव्हा अश्रू बनून ओघळतात
तेव्हा गालावर साचलेल्या पाण्यातला
खारटपणा समुद्रापेक्षाही असतो खारट
त्यात भावनांचा उद्रेक ओकांत करणारा
पण कानापर्यंत शब्द पोहोचण्याआधीच
त्यांच्यातला फोलपणा मात्र निष्क्रिय झालेला
शब्दांच्या ताकदीसमोर अश्रूंचं दृश्य दुःख
अदृश्य शब्दांत कधीच विरून गेलेलं
उरलेली मनातली खंत अजून दुखावणारी
मात्र खारट अश्रूंची साथ केव्हाच सोडलेली