हार जीत
हार जीत

1 min

779
स्वतःच बंद केलेले दरवाजे
जेव्हा उघडण्याची वेळ येते
तेव्हा कवडश्यांआड लपलेल्या
जाणिवांची माती होताना पाहणे
यापेक्षा वेगळी हार नसते...
पण नव्याची सुरुवात करताना
जुन्या कवडश्यांचा अतिभार
नि जाणिवांची वास्तविकता जपून
कालानुरूप बदलांचं भान होणे
यापेक्षा वेगळी जीत नसते...