shubham gawade Jadhav

Horror

2.5  

shubham gawade Jadhav

Horror

शापित वळण

शापित वळण

4 mins
309


    डोंगराच्या कुशीत बसलेलं एक किनारवाडी गाव . त्याला लाभलेल्या निसर्गामुळे सौंदर्यसंपन्न असलेलं ते गाव कोणाच्याही मनाला सहज भुरळ पाडायचं . छोटीशी शे - दीडशे घरांची लोकवस्ती .डोंगराला विळखा घालून आलेली नदी आणि त्याच बरोबर नदीला चिटकून आलेला रस्ता गावात प्रवेश करत होता . डोंगराजवळून रस्त्याचं एक सुबक वळण ,पाण्याची कमतरता नसल्यामुळे आणि डोंगरदऱ्यांमुळे आजूबाजूला गर्द हिरवीगार झाडी गावाचं सौंदर्य आणखीनच खुलवत होती .पण म्हणतात ना प्रत्येकच सुंदर दिसणारी गोष्टीची सुंदरता तिच्यासाठी शाप शाप असतें .


         किनारवाडीच वळणही सुंदर दिसणारं असलं तरी ते त्या गावासाठी एक शापच होतं .थोडक्यात काय तर ते वळण हे शापित वळण म्हणून मानलं जायचं. गावापासून वेशीच्या बाहेर हाकेच्या अंतरावर ते वळण .गावात अंधार पडल्यानंतर कोणीही गावची वेस ओलांडून जात नव्हतं. कोणामध्ये तेवढी हिंमतही नव्हती .


            अधूनमधून लोकांना तिथे चकवा घडत होता .पण तो साधा सुधाच.पण आज अचानक एक तिशीतला तरुण धावत आला .वेशीच्या आत एक दगडी चौथरा बांधला होता .गावातली लोक तिथे गप्पा मारत बसायची .तो तरुण त्यांच्या जवळ आला तस त्याने अंग टाकून दिल .गावातले लोक त्याला त्या अवस्थेत पाहून घाबरून गेले .त्यांना समजत नव्हतं नक्की ह्याला काय ? झालंय .त्याचे कपडे घामाने ओले झाले होते .पायात चप्पलं नव्हती . चेहऱ्यावरती भयानक भीती पसरलेली होती . डोळे गरगर फिरत होते . त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हता . त्या तिकडे लांब वळणाकडे बोटाने इशारा करत होता . त्याला ओरडायचं तर खूप होतं पण शब्द फुटत नव्हते . दातखिळी बसल्यासारखा प्रकार झाला होता .त्याचं बोट अजूनही त्या वळणाकडेच होतं.


आजूबाजूची माणसं त्याला गराडा घालून उभी होती . काहीजण त्याला बोलकं करण्याचा प्रयत्न करत होते तर काही जण त्याला पाणी पाजण्याचा. सगळीकडस चिंतेचं वातावरण पसरल होतं .कोणीतरी गावच्या पाटलाला बोलावणं धाडलं. तेवढ्यात रायबा पाटील तिकडून आलं .तशी गर्दी फाकली. पाटलांनी सगळ्यांना बाजूला व्हायला सांगितलं आणि त्याला पुरेशी हवा भेटल अशी गर्दी पांगली .

रायबा - काय झालं ह्याला ?

गर्दीतला गण्या पाठीमाघून चावटपणे म्हणाला ,आम्हाला माहित असतं तर तुम्हाला कशाला बोलावलं असत .

सगळी गर्दी खाली मुंड घालून हसायला लागली .पण कोणी मुंड वर केल नाही कारण सगळे पाटलांचा आदर करायचे .

आबा - आव भेदारल हाय ती . नुसत त्या वळणाकडं बोट दावतय .

रायबा - म्हंजी .

आबा - आवं आम्ही समदी हित बसलो होतो .गप्पा झोडीत .ही बेन तिकडून पळत आलं आणि पडलं की कोंबडीच मुंड पिरगाळून टाकल्यावाणी .

गण्या - त्याला बोलायचं बी सुदराना बघा .नुसतं तिकडं बोट दावतंय .

रायबा - आजवर आसं काय घडलं नव्हतं .ह्या बेण्यान नक्कीच काहीतरी पाहिलं दिसतय .

गण्या - भूत बित तर नसल ना .

मंग्या म्हणजे गण्याचा जिगरी दोस्त .

मंग्या - गप लका तुझं काय बी असतं .मानलं की आपण रातच्याला येशीच्या भायेर जात नाय .पण आसं काय नाय .

गण्या - तुला माहित नसत काय .तू गप .पाटील ह्याला शंभर टक्का भूत दिसलया .

रायबा - कशावरुन .

गण्या - आवं .आजवर त्या वळणावर रातच्याला का ? बरं कुणी जात नाही .वळणावर सोडा .येशीच्या बाहेर का ? बरं जात नाही .

रायबा - का ? म्हंजी .आपली परंपरा हाय आन आपल्या जुन्या लोकांनी सांगितलंय की बाहेर पडू नका येशीच्या रातच्याला .

गण्या - पण का ? कधी इचारलं का ?

रायबा - न्हाय म्या तर न्हाय .

गर्दीतल्या सगळ्या लोकांना गण्याचा मुद्दा पटला तसे सगळे गाण्याच्या होकारात होकार मिळवत होते .

गण्या - म्या सांगतो .

रायबा - तुला कस माहित .

गण्या - म्या माझ्या आज्याला इचारलं होतं .आधी नाय म्हणाला पण म्या सारखं इचारू इचारू त्याज्याकडून काढून घितलं .


              गण्या सांगू लागला, बऱ्याच दिवसापूर्वी त्या वळणावर एक वली बाळंतीण मेली बघा. बैलगाडीतून पडली आणि तिचा जाग्यावरच जीव गेला. तवा तिझा नवरा असाच धावत आला पण आपल्या गावातल्यानी कुणबी त्याला मदत केली नाही .त्याचा त्यो भेदरलेला आणि कापड फाटलेला अवतार पाहून त्याला लोक येडा समजली आणि हितून हुसकावून लावला .पुढ त्यो खरच येडा होऊन मेला . त्या येळी आपल्यातल्या कुणी तरी त्याला मदत केली असती तर ती बाळंतीण नक्कीच वाचली असती .मग त्या बाळंतिणीने आपल्याला शाप दिला की ह्या वळणावर आपल्या गावातली बारकाली पोर मरण पावत्यान .तेव्हापासून लोकांनी रातच्याला आणि दिवसाबी पोरांना येशीच्या बाहेर जायला नाकारलं .


आज बी आवस पुनवला त्या वळणावर बाळ रडल्याचा आवाज येतो .आपण सगळ्यांनी तुक्याला येड्यात काढला पण मी , दाद्या आणि वाघ्या यांनी ह्यो आवाज ऐकलंय लय येळा .ती वळण शापित हाय.तिथं जर एखादा घावला तर त्यो काय जिता वापस यायचा नाही बघा .

रायबा - मग ही बेन कसकाय आलं ?

गण्या - आवं पाटील ह्यो आपल्या गावचा आहे का ? शाप फकस्त आपल्या गावाला हाये .

माघून गर्दीतून कोणाचातरी आवाज आला की आज अमावशा हाय .गर्दीत आता भीतीच वातावरण पसरल.सगळ्यांच्या तोंडच पाणी पळालं .

गण्या - अमावशा आणि पूर्णिमेला ती बया बाहीर येती .ह्या बेण्यान तिच पहिली असल.


तोवर तो पडलेला माणूसही सावध झाला होता .त्याच्या हालचालीने सगळ्या गर्दीचा लक्ष्य त्याच्याकडे गेलं .त्याने त्याला एक कडेवर बाळ घेऊन दिसलेली बाई दिसली .ती त्याला थांबा म्हणून हात करत होती .बारिक लेकरू आणि अशा जंगलात एकटीच म्हणून थांबलो तर तिझ पाय आणि ती केस बघून मी घाबरलो आणि पळत इकडं आलो . हे सगळं ऐकून गर्दीतले सगळेच घाबरून गेले .भयान शांतता पसरली .कोणच काही बोलत नव्हतं .गण्याने जे सांगितलं ते अगदी खरं होतं .ते वळण खरच शापित होतं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror