रुदाकोवच्या 'माइक्रो-स्टोरीज़'
रुदाकोवच्या 'माइक्रो-स्टोरीज़'




लेखक : सिर्गेइ नोसव
भाषांतर : आ. चारुमति रामदास
सातवा अंक
लकी...ती, निश्चितंच त्यांना खात नाही, जी कायद्याची अपेक्षा आहे, पण नेहमी दाखवायची, - ट्रामचे प्रत्येक टिकीट तपासले जायचे, यंत्रवत् करायची, विचार न करता : पर्समधे टाकण्याआधी पहिल्या तीन आणि शेवटच्या तीन अंकांचा जोड करायची. तर? कधी जोड जुळायचा, दूर सारायची, आनन्दाबद्दल विसरून जायची..ऑक्टोबरमधे सात अंकांचा क्रमांक आला. आंत खोलवर काहीतरी तुटलं. लपूखोव स्वतःच निघून गेला. सीरियल्स बघू लागली. ऑर्थोपेडिक मोजे विकत घेतले. प्रत्येका गोष्टीसाठी पैसे कां खर्चायचे? ससा झाली. ससीण.
व्वा
भटकायचो जंगलांत, कुणालाही हात लावायचो नाही. अचानक :
“पळालो मी दूर, आजोबापासून , आजीपासून, हरीणापासून, लांडग्यापासून, आणि तुझ्यापासून सुद्धां, ऐ अस्वला, पळूनंच जाईन.
झुडूपांत काही तरी गडगडलं.
व्वा. विचार करतोय.
लाकडाची कां आहे? जिवंत असलेली म्हाता-याने कापली...
मी तिच्याकडे : चर्र, चर्र. पाहिलं, माझा पंजा भांड्यात उकळतोय, रोम विखुरले आहेत – म्हणजे म्हातारीने ओरबाडलंय. लपली शेकोटीवर, तिला वाटतंय, मला कळणार नाही, आणि म्हातारा घुसला टबाखाली.
खाऊन टाकलं मी त्यांना
व्वा! विचार करतोय.
सर्कस
बघा, आधी सगळं कसं मस्त होतं. संकटाचा पूर्वाभास नसल्यानेे जोकर ने आपल्या गलोशांनी मनोरंजन केलं, एका घोड्यावर दहा घोडेस्वारांनी खूप चक्कर मारले. मग मात्र गडबड सुरू झाली. नट दोरी वरून उडून काय गेला, तलवार-भक्षक खुर्चीला काय चिकटला, जादुगाराच्या बाहीतून वेडा ससा काय बाहेर उडाला.
सुदैवाने ट्रेनर ने परिस्थिति सांभाळून घेतली. संभावित संकटाचा विचार न करतां, त्याने भयानक जनावरासमोर आपलं डोकं पुढे केलं. आणि आम्हीं कृतज्ञतेने टाळ्या वाजवल्या.
*********