STORYMIRROR

Piyush Khandekar

Abstract Fantasy Inspirational

3.0  

Piyush Khandekar

Abstract Fantasy Inspirational

ऋतू..बहरता बहरलेला..! भाग-3

ऋतू..बहरता बहरलेला..! भाग-3

3 mins
240


..बंद केलेल्या दारावर कुणी हक्काने थाप मारत असेल तर ते दार आपण उघडावं.

..एखादी संधी किंवा एखादा क्षण पुन्हा जगायला कदाचित मिळू शकेल.

..दगडासारखं जगायचं निश्चित झालं असल्यावर; पाझर फुटणारी आणि कितीतरी झरे तुझ्यात आहेत म्हणणारी प्रलोभने दिली जातात.

..अर्थात हे तेवढ्यापुरता असतं. लोकांची मतलबं एकदा का साध्य झाली की, मग ते तुमच्यावर ओझं बनत नाहीत.

..तुमच्यावर मात्र मग आणखीन ओझं पडतं. अलिप्त राहायचं म्हटलं की जबाबदारी आडवी येते. एकट राहायचं म्हटलं की, कर्तव्य आडवी येतात. काहीही केलं ना तरी जग तुम्हाला कधीच स्वस्थ, निवांत, कर्महीन जगू देत नाही.

..घेत असलेल्या श्वासांचा का असेना, व्यवहार सुरु असलाच पाहिजे.

..या सगळ्यातून संन्यास घेऊन हिमालयात जाण्याची आपली इच्छा पूर्ण कधीच होणार नसते.

..आपलं धाडस होतं. जिद्दही असते. पण हा हट्ट पुरवायला आपण स्वतः समर्थ नसतो.

..नाही म्हटले तरी आपली नाती आपल्यासोबत भावनिक व्यवहार करत असतात. कारण त्या सगळ्या नात्यांना चांगल्याने ठाऊक असतं. "तुमच्याशिवाय त्यांना कोणीच आपुलकीने विचारणार नसतं." त्यामुळे नात्यांची मुद्दल जिचं व्याज तुम्ही जन्मभर चुकवणार आहात त्या मुद्दलीला तुमची तमा अजिबात नसते.

..बेहिशेबी व्यवहारांचा एकदिवस सोक्ष-मोक्ष लागतोही. पण बेलगाम नात्यांवर बंधन कुठलीच आवर घालत नाहीत. ती जीव जाळतात. विना चितेच तुम्हालाही जाळतात. तुम्ही होरपळता. हजार मौतं मरता. तरीही जगता. भावनिक व्यवहार संपुष्टात आलेला नसतो म्हणून..

..आकडेमोड असलेली गणिते एवढ्या चांगल्याने कधी तुम्हाला आयुष्यभर जमली नाहीत. पण भावनिक, सामाजिक आणि नितीमूल्यांची सूत्रे वापरुन तुमच्या आयुष्याची गणिते सोडवायला तुम्ही तत्पर बनता. तिथे गणित चुकलं तर पुन्हा संधी मिळेलच असं नाही. रवानगी थेट चौकटीत. उंबरठ्याच्या आत. तुम्हाला पंख आहेत हे कायमच विसरुन जायचं. जखडून घ्यायचं स्वतःला.

..स्वतःच्याच हाताने स्वतःची गळचेपी करुन ओठांनी हसावं लागतं. देखावा म्हणण्यापेक्षा जगण्याची सोंग करणाऱ्यांना ही ढोंग उत्कृष्ट निभवावी लागतात. सोंग एकदा का जमू लागले की, मग खरी सुरुवात होते नाटकाची. आयुष्याच्या रंगमंचावर!

..तुमची भूमिका वखाणण्यासारखी मुळीच नसते. महत्त्व तुम्हाला काडीचे काय कवडीचेसुद्धा नसते.

..प्रयोग असतो तुम्हाला वापरुन बघायचा आण

ि तुमचा वापर निरुपद्रवी, विनामूल्य अगदी उत्तम होत असतो. तुम्हालाही ते तुमचा वापर होऊन गेल्यावर कळते.

..तुमचा तुम्हीही वापर करु इच्छिता. पण स्वतःला दुसऱ्यासाठी झटण्याची अंगी बाळगलेली वृत्ती तुम्हाला तुमचा वापर करु देत नाही. जमतच नाही!

..अथक प्रयास करुन तुम्हाला जमलेलं कुणावर तरी निर्व्याज प्रेम ओवाळून टाकावं लागतं. समाजात बसत नाही. उच्च निच्च कितीतरी पदे आडवी येतात. कुळ तुमचं तरी किती प्रतिष्ठित आहे? अशी बंडखोरीची हजारो प्रश्न पडतात.

..उत्तरे पिढीजात रटवून दिलेली असलीत तरी ते तुम्हाला पटत नाही. प्रेमाचं पारडं तेवढं तोलामोलाचा झालेलं असतं.

..जात पाहून कोणी जन्म घेत नाही. त्याप्रमाणे जात पाहून कुणी प्रेमात देखील पडत नाही.

..आपलं शहाणपण जेष्ठांना शिकवता थोडी येते. ते कुजत असतात आणि तुम्हालाही सडवत असतात.

..नातं सडायला अवधी मग काय लागणार? कीड आपलीच आपल्याला लागते. घुसमट नको-नको करुन सोडते.

..बंड पुकारुन सगळ्या विरोधात तुम्ही उभे ठाकता. अगदी अर्जुनासारखे सज्ज होता. कर्णासारखा मित्र तुम्हाला लाभलेला नसतो. कृष्णासारखा सारथी पण तुमचा नसतो. धर्माच्या बाता मग मारणार कुणाकडे?

..युद्ध जुंपल असतं. अंत तुमच्या आत्म्याचा होत असतो. बलिदान तुमच्या इच्छांच दिलं जातं. अन् वस्त्रहरण तुमच्या वैचारिकतेच होतं. एवढंच काय ते या महाभारतात बदललेलं आहे.

..येणारा सूर्य उमेदिसह अस्तही सोबत घेऊन येत असतो. आपल्या भावनांच्या विस्तावात आहुती मात्र आपल्या गोड स्वप्नांची दिली जाते.

..एवढं सगळं करुन तुमची तुम्हालाच कदर वाटत नाही. अभिमान मग अख्ख जग मिरवतो. कसला? तर पराजय स्वीकारल्याचा. प्रयत्न निष्फळ केल्याचा. याहीउपर तुमच्या समजूतदारीचा. अगदी ओवाळले जाते यासाठी.

..पण, तुमचा निर्णय तर चुकलेला असतो. तुम्हाला चांगल्याने ठाऊक असतं ते!

..एकदा घेतलेल्या चुकीच्या निर्णयाला बरोबर तोंडदेखलं तुम्ही कितीही म्हणालात. तरी आतल्याआत पडणारे ओरखडे तुम्हाला खरी यातना देतात.

..जाणवणारी वेदना ती मग नाममात्र उरते.

..तुम्हाला त्या वेदनेशी कर्तव्य असतं. पण हतबल, निराश आणि असहाय्य होण्यापलीकडे काहीएक उत्कृष्टपणे जमत नसते.

..अथक प्रयास करुन जमलेच तर तो निव्वळ उपहास होतो. या उपहासला मी, तू, तुम्ही आणि हे जग "वेड" म्हणून संबोधित करते..!

(क्रमशः)..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract