भ्रमनिरास..!
भ्रमनिरास..!

1 min

1.2K
नात्यांच्या सुरुवातीला सगळच गोड वाटतं. घरी येण्याचं न येण्याचं आग्रहाने कारण विचारलं जातं. नंतर काही दिवसांनी हा अति गोडवा सगळच कडवट करायला लागतो. ते म्हणतात ना जास्त गोड खाऊनसुद्धा तोंड कडू होत. त्यामुळे प्रमाण ठरवली जातात. मर्यादा या आखल्या जातात. लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा प्रसंग ओढवलाच तर जळाव ते रावणाने आणि विद्रूप व्हावं ते शूर्पणखेने. अशा दुतोंडी व्यवस्थेत सभ्य व साध्या माणसाने पायातली पायतानेसुद्धा काढून घरात यायची काळजी घेऊ नये. वाजवीपेक्षा जास्त भ्रमनिरास होतो..!