The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Piyush Khandekar

Tragedy

2  

Piyush Khandekar

Tragedy

अपूर्ण..!

अपूर्ण..!

2 mins
1.4Kक्षण...!

अपूर्ण..!

स्वत:च्या निश्चयावर आणि निर्णयावर कुणाला नव्हे स्वत:लाच ठाम असावे लागते. बाकी जग काय न् निसर्ग काय टपलेलेच असतात स्वत:चे प्रलोभने दाखवायला. इतकेच काय बोट धरुन मार्गही दाखवले जातात. काही ध्येयही 'अपेक्षेच्या' नावाने लादून ठरवलेही जातात. पण हे सगळे आपण परिपूर्ण करु शकतो कि, नाही हे ठरवायचे स्वत:ला असते. कारण शेवटी स्वत:चीही स्वत:कडून एक दिवस निराशा होतेच आणि ज्यांच्या इच्छा अपेक्षा पणाला लागलेल्या असतात त्यांची जरा जास्तच निराशा होते. तरी माणूस "आशा" करणे सोडून देत नाही. कारण त्याला जगतांना एक कळलेले असते. त्याचे जगणेही उपेक्षा करुन जाणार आहे, नि मरणेही उपेक्षाच करणार त्याची स्वत:ची! बस फरक येवढाच असेल. होत्याचे अस्तित्व नव्हत्यात बदलेले असेल, या मागचे कारण त्यांच्या मागेही कधी कुणाला कळत नाही नेमक काय झालं...(?)

काही गोष्टी न् व्यक्ती कधी बदल अपेक्षित असूनही बदलत नाही कारण हा क्षणभर बदल किती क्षुद्र आहे किंवा असणार आहे हे कदाचित त्यांना कळलेलं नसत न् आपलंही अडलेलं नसत. कारण एक दिवस असण्याची-नसण्याची पोकळीक स्विकारावीच लागते. अन् काही प्रश्न अनुत्तरीत सोडून द्यावे लागतात. मग कुणी याला "स्वार्थ" समजला तरी वावगे नाही. चांगले आयुष्य कसे जगायचे कुणाला कुणी सांगू तर शकतं, पण ज्याचा श्वास त्यालाच घ्यायचा असतो. ताटात वाढलेल्या आवडीच्या पदार्थापासून जरी सुरुवात करावी ना तरी शेवट हा नावडत्या पदार्थालाही संपवून अथवा ताटातच टाकून करावा लागतो. मग पुन्हा सुरुवातीपासून शेवटाकडे जायचे कि शेवटाकडून शेवटाच्याही पुढे...(?)

सुरवातीला न् शेवटी चुकामुक होतेच बस सुरवातिला तर एक झालीये बस! शेवटची काय तेवढी उरलीये अन् अशीच उरणार आहे अपूर्ण राहून पुर्णत्त्वाला दूर करत..!


Rate this content
Log in

More marathi story from Piyush Khandekar

Similar marathi story from Tragedy