Sangieta Devkar

Drama Romance

3  

Sangieta Devkar

Drama Romance

रंजना

रंजना

4 mins
931


रंजना कॉटवरून उठली आणि आपली साडी ठीकठाक करू लागली. अजय ही स्वतःचे कपडे घालत होता.

साहेब खूप दिवस झाले विचारीन म्हणते पण विसरून जाते. रंजना साडी नेसत बोलली.

काय विचारायचे तुला अजय शर्टची बटणं लावत म्हणाला

हेच की तुम्ही चांगल्या घरचे दिसता मग इकडे का येता? सांगावं वाटत असेल तर सांगा मी सहज विचारले कारण आमच्याकडे येणारे लोक म्हणजे ट्रक ड्रायवर, शेठ लोक, पोलीस किंवा मजा म्हणून कॉलेजची पोर.

रंजना कसे असते माणसाला शरीर दिले देवाने मग त्याची भूक काय एकतर पोटभर जेवण आणि मनासारखं देहसुख.

मग तुमची बायको नाही का देत हे सुख.

देते ना पण त्यात आपलेपणा, प्रेम नसतं.

म्हणजे काय रंजना बोलली.

हे बघ आता तू विषय काढलाच आहे तर सांगतो अजय तिथल्या प्लास्टिकच्या खुर्चीवर बसत म्हणाला. मी एक कलाकार आहे. नाटकात काम करतो. लिखाणपण करतो. घरच्यांनी ठरवून चांगली मुलगी बघितली आणि लग्न झालं. मला दोन मुलंही आहेत. सुरवातीला छान चाललं होतं पण नंतरनंतर माझं काम, नाटकासाठी होणारे दौरे, माझ्यासोबत काम करणाऱ्या इतर महिला, माझ्या मैत्रिणी, माझ्या फॅन्स यांच्या गोतावळ्यात मी असायचो. समजते का रंजना मी काय बोलतो ते तुला? मध्येच अजयने रंजनाला विचारले.

हो साहेब मी दहावीपर्यंत शिकली आहे.

हम्मम... मग बायकोला हे काही वागणं माझं पटेना. ती सतत संशय घेऊ लागली मग त्यातून वाद भांडण होऊ लागले. तिला वाटते माझे बाहेर अफेयर असेल.

मग तुम्ही बोलला नाहीत का बायकोशी रंजनाने विचारले.

खूप वेळा समजावून सांगितले पण ती ऐकत नाही. पण माझं काम असंच आहे तिथे अनेक महिलांशी संबंध येतो म्हणून काही मी कोणाशी तसे संबंध नाही ठेवले. कारण मला कुठले बंधन किंवा जबाबदारी नको आहे आणि माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. पण तिला ते समजत नाही. आता काय दोन मुलं झालीत मग तिचा माझ्यातला इंटरेस्ट संपला आहे. मी जवळ जातो तिच्या प्रेमाच्या ओढीने पण ती प्रेतासारखी थंडगार पडून असते. सगळं काही यांत्रिकपणे पार पडतं. माझ्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून मग तुझ्याकडे येतो. आता तू म्हणशील ही पण फसवणूकच करत आहात तुम्ही बायकोची. मला इतके समजते की माणसाला शरीरसुखाची भूक असते. ती भूक नाही भागली की माणूस असा बाहेर पडतो. याला तू वासना म्हण किंवा अजून काही ही. पण एका लिमिटपर्यंत माणूस सहन करतो नंतर मात्र त्याचा उद्रेक होतो. मलाही प्रेम हवंय ग पण माझ्या बायकोला ते समजत नाही. संसार हा दोघांचा असतो मग एकमेकांना समजून घेणं पण महत्वाचे असते. माझी गरज घरातच पूर्ण झाली असती तर मी इकडे का आलो असतो रंजना? आणि तिलाही असेल ना देहाची भूक पण ती स्वतःच्याच भूमिकेतून माझ्याकडे बघते आणि मला सुख मिळवून नाही द्यायचं म्हणून थंड अलिप्त राहते. पण मला माहित आहे ती ही अतृप्तच राहात असणार. सगळे तिच्या मनाचे खेळ आहेत. मी समजावून थकलो आहे आता. मला इथं येऊन सुख मिळत ते मी उपभोगतो. माझी वासना शमवतो.

एक विचारू साहेब, रंजना मध्येच बोलली.

काय... विचार, अजय म्हणाला.

आता तुम्ही स्वतःसाठी इथं येता मग असाच कोणी मित्र तुमच्या बायकोचा झाला तर?

रंजना कसं आहे की नवरा बायकोनी ही वेळ येऊच द्यायची नसते. एकमेकांच्या गरजा काय हे जाणून एकत्र संसार करावा आणि मुख्य म्हणजे एकमेकांवर विश्वास हवा. तेच तर माझी बायको नाही ठेवत. खरंतर वासना ही तुमचं आयुष्य बरबाद करते हा मार्ग ही चांगला नाही हे सगळं मला माहित आहे. पण शरीर आणि मनापुढे मी हतबल आहे. माझी ही हतबलता तिला नाही समजत. साहेब पुन्हा एकदा तुमच्या बायकोशी बोलून बघा. इथं येऊन तुम्ही तुमचंच आयुष्य खराब करत आहात. तुमचं नावही खराब होईल. मला तुमच्यासारखं नाही बोलता येत. पण ही वासना लई वाईट आहे, इतकं समजते.

रंजना तू म्हणतेस ते ही खरं आहे मी प्रयत्न करेन.

अजून एक साहेब. बोल रंजना अजय म्हणाला.

साहेब जमलं तर पुन्हा इथे नका येऊ. तुम्ही चांगले आहात उगाच माझ्यामुळे तुमचा संसार मोडू नये असं मला वाटतं. रंजना हुशार आहेस तू पण. मी तुझी कहाणी लिहीन आणि त्याचं पुस्तकपण काढेन.

खरंच का साहेब... का मस्करी करता माझी?

नाही गं मस्करी नाही खरंच लिहीन तुझ्यावर.


अजय निघाला. पुन्हा येईल की नाही हे माहीत नव्हते पण वासना माणसाला काय काय करायला लावते हे रंजनाला समजले होते. ती ही हेच करत होती. अशा कितीतरी अजयच्या वासनांची पूर्तता करत होती. तिचा मार्ग वेगळा होता आणि अजयचाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama