निलेश कवडे

Drama Romance

4.0  

निलेश कवडे

Drama Romance

रियालिटी शो - भाग 1

रियालिटी शो - भाग 1

3 mins
300


नागपूरच्या कॉमर्स कॉलेजला बेस्ट डांसर या रियालिटी शोचे ऑडिशन सुरू असतात. परीक्षकांना दिवसभर डान्स पाहून सुद्धा मनाजोगे डान्सर मिळालेले नसल्यामुळे ते अत्यंत नाराज असतात. मात्र थोड्याच वेळाने अकोल्याचा गौरव पाटील डान्स परफॉर्मन्सने परीक्षकांची मने जिंकतो त्याला मुंबईच्या प्राथमिक फेरीचे तिकीट मिळते. गौरव नंतर अमरावतीची रश्मी जाने भूलभुलैया सिनेमातील विद्या बालन च्या 'आमीजे तोमार' गाण्यावर दिलखेचक नृत्य करून प्राथमिक फेरीचे तिकीट मिळवते. दुसऱ्या दिवशी सर्वच वृत्तपत्रांच्या विदर्भ आवृत्तीमध्ये गौरव आणि रश्मीचे सोबत फोटो छापल्या जातात. एकमेकांशी त्यांची ओळख वृत्तपत्रांच्या माध्यमातून होऊन जाते. दोघांची कौटुंबिक पार्श्वभूमी निम्नमध्यमवर्गीय होती. आर्थिक अडचण दोघांच्या कुटुंबातील प्रमुख समस्या होती. मात्र आपल्या कलेच्या आणि मेहनतीच्या भरवश्यावर दोघे संपूर्ण विदर्भात फेमस होऊन जातात… दोघांची राहण्या खाण्याची व्यवस्था आता स्पर्धेचे आयोजक करणार असल्याने त्यांना स्पर्धेदरम्यान पैशांची चणचण भासणार नव्हती. दोघे मुंबईला बेस्ट डांसर च्या सेट वर हजर होण्यासाठी आपापले गाव सोडतात...


'बेस्ट डांसर' हा मुंबई येथे होणारा 'रियालिटी शो' स्पर्धकांना नाव आणि पैसा दोन्ही कमवून देणारा होता. त्या वर्षी स्पर्धेची 'थीम' होती 'जोडी तेरी मेरी'. प्राथमिक स्पर्धेतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांमधून डान्स स्पर्धकांच्या रँडमली जोड्या लावल्या जाणार होत्या. योगायोगाने गौरव आणि रश्मीची जोडी लावण्यात येते. आता स्पर्धा संपेपर्यंत या दोघांची जोडी कायम राहणार होती. फेमस कोरिओग्राफर आशिष कुमार त्यांना गाईड मिळतो. प्राथमिक स्पर्धेची डान्स प्रॅक्टिस सुरू होते. डान्स सरावा दरम्यान दोघेही एकमेकांना स्पर्श करताना संकोच करतात. गौरव रश्मीचा हाथ धरतांना लाजतो आणि सैल पकडतो. रश्मी सुद्धा गौरवच्या डोळ्यात पाहताना विचलित होते. या सर्व गोष्टींमुळे डान्स चा सराव व्यवस्थित होत नव्हता. त्यांच्यात अटॅचमेंट नसल्यामुळे डान्स स्टेप योग्य करूनही डान्स सुमार वाटत होता. त्यात गौरव आणि रश्मी यांनी ही बेस्ट डांसर स्पर्धा जिंकणे मेंटर आशिष साठी प्रतिष्ठेचे होते. त्यामुळे त्यांच्या मनातील संकोच काढणे आवश्यक झाले होते. आशिष नी दोघांमध्ये समन्वय असण्यासाठी आणि एकमेकांना समजून घेण्याचा सल्ला दिला. खाजगीमध्ये गौरवला त्याने रश्मीला डेट वर न्यायचा सल्ला दिला. तर दुसरीकडे रश्मीला सुद्धा त्याने गौरवच्या चोरून सांगितले की गौरव सोबत एखादी डेट अरेंज कर म्हणजे तुला त्याच्यासोबत डान्स करणे सोपे जाईल. स्पर्धकांचे आपसातील संबंध यावर स्पर्धेचा टीआरपी अवलंबून असतो त्यामुळे अशा काही गोष्टी आयोजक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या स्पर्धकांनजवळून करून घेतात. स्पर्धकांना याची जराही जाणीव नसते. झगमगाटात अशा काही गोष्टींवर प्रकाशही पडत नाही.


गौरवचे नीता नावाच्या एका मुलीसोबत तर रश्मीचे नितीन सोबत अफेअर असते. त्यांच्या डांस मेंटर नी डेटवर जाण्याचा दिलेला सल्ला दोघेही आपापल्या पार्टनरला सांगतात. स्पर्धा आपल्याच पार्टनर ने जिंकावी या उद्देशाने गौरव आणि रश्मीचे पार्टनर त्यांना डेटवर जाण्यासाठी संमती देतात. 'डेट' साठी थेट कसं विचारावं या द्विधा मनस्थितीत दोघेही असतात. दोघांमध्ये स्पर्धेपुरते का होईना भावनिक बंध जुळावे यासाठी दोघेही हृदयापेक्षा बुद्धीचा वापर कसा करता येईल या विचारात होते. रविवारी डान्सच्या सरावाला सुट्टी होती. सकाळी गौरव रश्मी ला मोबाईल वर मेसेज करतो.

"गुड मॉर्निंग" 

रश्मी चा रिप्लाय येतो, "गुड मॉर्निंग" 

मग दोघांमध्ये फोनवर चॅटिंग सुरू होते… 

गौरव मेसेज करतो, "आज काय करत आहेस"

"आज काय करावे हाच विचार करत आहे"

"का? बरं!"

"जवळजवळ सर्व मुली कुठे ना कुठे फिरायला जाणार आहेत, माझ्या सर्व रूम पार्टनर सुद्धा बाहेर गेल्या आहेत. रूममध्ये मीच एकटी आहे" रश्मी मुद्दाम असा मेसेज गौरव ला पाठवते, 

गौरव रश्मीचा असा मेसेज वाचून मनातल्या मनात खूप आनंदी होतो आणि म्हणतो,

"आपण आज बाहेर जेवायला जायचं का?" थेट डेट वर जाण्याच्या प्रश्ना ऐवजी गौरव अप्रत्यक्षपणे विचारतो… गौरवने असे आपल्याला विचारावे याच उद्देशाने त्याला दिलेले उत्तर सफल झाल्याचे पाहून लगेच रश्मी होकार देते.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama