STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Romance Inspirational

4  

Author Sangieta Devkar

Romance Inspirational

रिलेशनशिप

रिलेशनशिप

3 mins
393

आई मी इतकी काळजी घेते मोहित ची तरी त्याला माझी कदर नाही.मग का थांबू मी तिथे?

रागिनी पण अस लगेच कोणी घर सोडून येते का? जरा शांत पणे विचार करावा.

आई मोहित सरळ सरळ म्हणाला,की मला तुझा कंटाळा आला आहे. म्हणून आले घर सोडून.अजुन अपमान नाही सहन करून घेणार मी.

बर आता शांत हो रागिनी बाबा आले की बोलू आपण.

रागिनी आणि मोहित चे लव मैरिज झाले होते. लग्ना आधी चार वर्ष रिलेशनशिप मध्ये होते ते. मग लग्न केले. दोन वर्ष झाली लग्नाला त्यांच्या. सुरुवातीला सगळ छान चालू होते. दोघेही जॉब करत होते. आता हल्लीच त्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टी वरुन वाद होऊ लागले होते. आज भांडण जास्तच टोकाला गेले आणि मोहित च्या तोंडून निघुन गेले .".मला कंटाळा आला आहे तुझा रागिनी. मला प्लिज एकट्याला राहु दे.."

चार दिवस होऊन गेले पण दोघे ही हटुन बसले होते. कोणी ही कॉल मेसेज करत नव्हते.

मोहित ची आईच म्हणाली मग, मोहित अरे नवरा बायको मध्ये अशी भांडण होतात,त्याला इतक ताणायचे नसते


आई तुला माहित आहे ना रागिनी चा स्वभाव ,तरी तू मला बालतेस? मी कीती सहन करू?

मोहित रागिनी ला लग्ना आधी पासून ओळखतोस ना? मग आता का तिच्या बद्दल तक्रार करतोस?

आई लग्ना आधी प्रेमात होतो मी तिच्या,तेव्हा तिच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या वाटत होत्या. मला वाटले लग्ना नंतर ती मच्युअर होईल पण नाही.

एकदा बोलून बघ तिच्या शी,तिला सांग तरी की तुला काय खटकते.

बघू आई मी विचार करेन.

रागिनी च्या आई नेच मग मोहित ला घरी येण्याची विनंती केली.

मोहित आला होता रागिनी कड़े.

आई नी त्याला पाणी,चहा दिले.रागिनी चे बाबा पण होते.

मोहित,तुम्हा दोघां मध्ये नेमके काय झाले हे आम्हाला काही ही माहित नाही. तुम्ही सांगितले तर ते समजेल. कोणाची चूक आहे हे ही कळेल.

बाबा,मी सांगतो जे घडले ते मग तुम्हीच ठरवा कोणाचे चूकते आहे.मोहित बोलू लागला.

रागिनी आणि मी एकमेकांच्या प्रेमात होतो. त्या वेळे पासुनच ती माझ्या बाबतीत खुप पझेसिव्ह आहे. त्या वेळी ती मला सतत कुठे आहेस,काय करतोस,भेटायला ये अस सारख मला कॉल मेसेज करून सांगत असायची. मला वाटले की तीच प्रेम आहे माझ्यावर म्हणून अस वागते,प्रेमात सगळेच जरा पझेसिव्ह होतात,तसेच रागिनी चे झाले असेल म्हणून मी गप्प राहिलो. कधी कधी आमच्यात तेव्हा ही वाद व्हायचे.

रागिनी चा स्वभाव आज ही तसाच आहे.

तसाच म्हणजे कसा मोहितराव? बाबानी विचारले.

बाबा अहो,मी रोज कुठला शर्ट घालायचा? शॉपिंग कुठे करायचे हे सगळ रागिनी म्हनेल तसेच करायचे. सकाळी ऑफिस ला गेलो की पोहचलास का मोहित? असा तिचा फोन असतो. जेवलास का? म्हणून मेसेज . कधी टिफिन परत आणला तर का नाही खाल्लेस? अरे कधी कधी मित्र पार्टी द्यायचे मग राहून जायचा टिफिन...तर या वर तीच उत्तर अरे कोणता मित्र? आणि कसली पार्टी?

आई तुम्हाला सांगतो सुट्टी दिवशी मी मित्रा सोबत कुठे जायचे नाही,तो वेळ तिला द्यायचा. सतत माझी काळजी करायची. मोहित हे अस कर,ते खा. हा रंग चांगला दिसेल तुला.. अरे माझ्या पण काही आवडी निवड़ी असु शकतात हे तिच्या गावी ही नाही. एक वेळ मी तिची काळजी समजू शकतो पण ती अति काळजी करते माझी. ते मला सहन नाही होत,मी लहान मुलगा नाही आहे. मी तिला सतत वेळ द्यायचा नाहीतर ती रुसुन बसते,चीड़चीड़ करते. भांडण वाद नको म्हणून मी मित्रां कड़े पण जात नाही हल्ली.तिच्या या अति पझेसिव्ह वागन्याचा मला त्रास होतो. माझी घुसमट होते. पण रागिनी ला काही समजतच नाही.

मोहित तुझ बरोबर आहे. रागिनी अग एकदा का लग्न झाले की ते नाते घट्ट बनते. तु का इतकी स्वतःला अन सेक्यूर समजतेस? नात्यात प्रत्येकाची स्वतंत्र अशी स्पेस असते. मोहित ची सुद्धा आहे. त्याने तुला अस बांधून ठेवले तर चालेल का तुला.? तू कुठे जातेस? कोण मैत्रीण याची मोहित चौकशी करतो का?

नाही बाबा,तो काही ही मला विचारत नाही.

त्याची आवड़ माझ्यावर लादत नाही..रागिनी म्हणाली.

मग तू का त्याच्या वर तुझी मर्जी चालवतेस आई म्हणाली.

आई बाबा मला माझी चूक समजली. मोहित आय एम सॉरी

रागिनी अग नात्यात प्रेम हव पण ते प्रेम पायातली बेडी नाही बनली पाहिजे. आपल्या माणसा बाबतीत पझेसिव्ह असावे ग पण इतकी ही काळजी नको की त्याचा जीव गुदमरेल. मोकळा श्वास हवा असतो प्रत्येक नात्यात तर ते नात टिकून राहते.

रागिनी ने आपला स्वभाव,आपल वागन बदलन्याची हमी आई बाबा ना दिली.

मोहित आणि रागिनी आनंदाने मग घरी आले.


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance