Pravin Oswal

Thriller

4.5  

Pravin Oswal

Thriller

रहस्यभेद

रहस्यभेद

5 mins
2.1K


तात्या आणि राजाआज दोघेही बरेच खुश होते. बऱ्याच महिन्यांनी मोठं घबाड हाती लागलं होतं. त्यांच्या हाती लागलेल्या चोरीच्या मालाचा त्यांनी परत हिशोब केला. सात ते आठ लाखांचा एकूण ऐवज हाती आला होता. त्यांच्यासारख्या भुरट्या चोरांसाठी ही रक्कम मोठी होती. थोड्याशा प्रयत्नाने आणि विना प्रतिकाराने ही मोठी चोरी साध्य झाली होती. खात्रीशीर सूत्रांकडून माहिती मिळाली होती आज दादा रावांच्या बंगल्यामध्ये त्यांच्या सूने शिवाय कुणीच नव्हते . त्यांनी दादाराव साहेबांच्या कंपनीच्या माणसांचा बहाना केला. सुनेने दरवाजा उघडला दोघेही बंगल्यामध्ये घुसले, सुनेला त्यांनी खुर्ची ला बांधून ठेवले. चाकूच्या जोरावर तिजोरीच्या चाव्या हिसकावून घेऊन त्यांनी तिजोरी लुटली. रोकड, सोन्याचे दागिने आणि चांदी घेऊन त्यांनी पळ काढला. अवघ्या एक तासाच्या आत त्यांनी ही लूट कमावली होती. आता या दागिन्यांची विल्हेवाट कशी लावायची याचा ते विचार करत होते


दादाराव हे एक पुण्यामधील मोठे प्रस्थ होते मेडिकल डिव्हाइसेस चा त्यांचा मोठा बिझनेस होता, भारताशिवाय आफ्रिकन देशांमध्ये त्यांनी आपला व्यापार वाढवला होता. आपला मुलगा आनंद व त्याची पत्नी शिल्पा यांच्याबरोबर ते आपल्या बाणेर मधील प्रशस्त बंगल्यामध्ये राहात होते. पत्नी शारदेच्या आकस्मिक मृत्यू नंतर त्यांनी आपला व्यवसाय हळूहळू आनंद च्या ताब्यात देण्यास सुरुवात केली. आता ते आपला बहुतांश वेळ आपल्या मित्रांबरोबर घालवत होते. दादाराव हे एक श्रीमंत प्रस्थ होते. त्यांच्या ओळखी बऱ्याच मोठ्या लोकांबरोबर होत्या.


पुढच्या दिवशी ते वर्तमानपत्र पाहून तात्या आणि राजा दोघेही दचकले. दादा रावांच्या घरी हत्या आणि दरोडा या शीर्षकाखाली आलेल्या बातमीमध्ये शिल्पाचा खून झाल्याची बातमी होती. चोरांनी खून करून दरोडा टाकला अशी ती बातमी होती. न केलेल्या खूनाचा आरोप या दोघांवर आला होता. बातमी वाचून दोघेही सुन्न झाले, आता काय करावे ते दोघांनाही कळेनासे झाले. आपण खून केला नाही तर तो कोणी केला ह्याचा विचार ते करत होते


खून झाला त्या दिवशी दादाराव आपल्या घरी नव्हते. आपला मुलगा आनंद याला घेऊन ते मुंबईला गेले होते. त्यांची चोरीस गेलेली बीएमडब्ल्यू कार मलाड मध्ये दिसल्या ची माहिती त्यांना मिळाली होती. त्या गोष्टीचा तपास करण्यासाठी ते मलाड पोलीस स्टेशनला गेले होते. घरी शिल्पा एकटीच होती. आनंदने तिला फोन करून सीमेन्स कंपनीची माणसे डेमो मशीन घेण्यासाठी घरी येतील हे सांगितले होते.. ह्याच मिस अंडरस्टँडिंग मुळे शिल्पाने चोरांना घरात घेतले. . पोलीस पुढे तपास करत होते शिल्पा चा खून चाकू मारून करण्यात आला होता. पोलीसांनी सर्वत्र ठसे घेतले. अगदी बारकाईने घराचा कानाकोपरा तपासला. खून आणि चोरी संध्याकाळी आठ च्या सुमारास झाली होती. ज्या चाकुने खून करण्यात आला तो चाकू पोलिसांना मिळाला नाही. ही घटना हाय प्रोफाईल असल्यामुळे पोलिसांना सखोल चौकशी करणे भाग होते. दादाराव यांनी पोलीस कमिशनर यांची लागलीच भेट घेतली. पोलिसांवर आता खूपच दबाव होता.. पोलिसांनी आपली सर्व यंत्रणा कामाला लावली 48 तासांच्या आत आपण शोध लावू शकू असा विश्वास पोलिसांना होता.


तिकडे तात्या आणि राजा दोघेही घाबरलेले होते. पोलीस आपल्याला नक्की पकडणार. खून आणि चोरी दोनी चा आरोप आपल्यावर लावणार याची दोघांनाही खात्री होती. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी बाणेर पोलीस स्टेशन गाठले. इंस्पेक्टर मोरे यांची भेट घेऊन त्यांनी आपला गुन्हा चोरीचा गुन्हा कबुल केला. खुनाचा आरोप बाबत मात्र त्यांनी साफ इन्कार केला. या साऱ्या प्रकरणांमुळे पोलीस मात्र चक्रावले. खून कोणी केला हा गहन प्रश्न त्यांना पडला. दोघांची पोलिस कस्टडी घेण्यात आली त्यांच्यावर थर्ड डिग्री करण्यात आली, पण खुनाचा आरोप दोघेही मान्य करायला तयार नव्हते.

पोलीस आता प्रकरणाचा चारी बाजूने विचार करत होते. आनंद आणि शिल्पा यांचं लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते त्यांचा प्रेमविवाह होता. एकंदरीत कुटुंब सुखी कुटुंब होते. पोलिसांना माहिती मिळाली की आदल्या दिवशी रात्री शिल्पाचे आनंद बरोबर भांडण झाले होते. शिल्पा आनंदला त्यांच्या कोथरूड मधली फ्लॅटमध्ये वेगळे राहण्यास सांगत होती. आनंद याला बिलकुल तयार नव्हता, या वयात दादासाहेबांना एकटं सोडण्याची त्यांची तयारी नव्हती, वेगळे राहण्याचा कोणतंच कारण त्याच्याकडे नव्हते आणि शिल्पा सुद्धा कोणतही कारण सांगत नव्हती. फक्त वेगळे राहण्याचा हट्ट करत होती.


प्रथम पत्नी आणि आता सुनेचा आकस्मित मृत्यू यामुळे दादासाहेब हताश झाले होते. स्वतःपेक्षा ही आनंदाची त्यांना जास्त काळजी वाटत होती.. खूनाबद्दल कुठलाच नवीन सुगावा पोलिसांना मिळत नव्हता. नेहमीप्रमाणे पोलिसांनी दोन्ही चोरांनाच खुनी ठरवले. पोलीस केस फाईल करण्याच्या मार्गावर होते आणि एक दिवस शिल्पाची मैत्रीण प्रिया पोलीस स्टेशनमध्ये मोरे साहेबांना भेटण्यासाठी आली. शिल्पा आणि आनंद यांच्यातील भांडण याचे कारण तिला माहित होते. शिल्पा का वेगळे राहण्यास सांगत होती हे तिला माहित होते. दादासाहेबांचे नेहमी घरी येणारे मित्र शिल्पाला आता नको होते.. त्यातील रावते साहेबांची नजर शिल्पाला बिलकुल आवडत नव्हती. पण याबाबत घरातील कुणाशी काही बोलण्याचे साहस तिच्याकडे नव्हते. रावते साहेब प्रसिद्ध एडवोकेट होते आणि दादासाहेबांचे ते एकदम जवळचे मित्र होते. दादा साहेबांशी त्यांचा जवळचा संबंध होता. रावते साहेबांची मेहुणी गीता दादासाहेबांच्या कंपनीमध्ये आनंदाची सेक्रेटरी म्हणून काम करत होती. पोलिसांनी रावते साहेबांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली त्यांचे फोन डिटेल शोधून ते चेक करण्यात आले. पोलिसांना काही संशयास्पद सापडले नाही.

आणि एक दिवस पोलिसांना नवीनच बातमी मिळाली. रावते साहेबांची मेहुणी गीता आणि आनंद यां दोघांच्या लग्नासाठी दादासाहेब नव्याने पुढाकार घेत होते. रावते साहेबांनीचं ते सुचवलं होतं शिल्पाच्या लग्ना अगोदर रावते साहेबांनी त्यासाठी प्रयत्न सुद्धा केले होते पण त्यावेळी आनंदाने शिल्पा बरोबरच लग्न करण्याचा हट्ट ठेवला. पोलिसांना ह्या सर्व गोष्टी सहज वाटत नव्हत्या. पोलिसांनी रावते साहेब आणि गीता या दोघांवर ही कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली. रावते साहेबांचे गीता बरोबरील संबंध सामान्य नव्हते. गीताचे आनंद बरोबर लग्न करून त्यांना एकाचं दगडात दोन पक्षी मारायचे होते..

पोलिसांनी आपला मोहरा पुन्हा चोराच्या कडे वळवला. ज्या सूत्राच्या माहितीच्या आधारे चोरांनी घरात प्रवेश केला होता त्याबद्दल अधिक चौकशीस सुरुवात झाली.. रावसाहेबांना बीएमडब्ल्यू कार संबंधी माहिती देणाऱ्याची चौकशी सुरू झाली आणि एक एक कडी जुळत केली. या सर्वांचा सूत्रधार रावते आणि गीता असल्याची पोलिसांना खात्री पटली. प्रथम गीताची कस्टडी घेण्यात आली. गीताने बंगल्याची माहिती चोरांना पुरवली होती. चोर चोरी करून परतल्यानंतर रावते साहेबांनी बंगल्याच्या मागच्या दरवाजा मधून येऊन खुर्चीला बांधलेल्या शिल्पाचा खून केला होता. सर्व आरोप चोरांवर येईल याचा पूर्ण बंदोबस्त केला गेला होता. प्रियाने दिलेल्या माहितीच्या आधारे एक कटकारस्थान उघडकीस आले होते आणि तुरुंगाची एक अंधारी खोली आता त्यांची वाट पाहत होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller