Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Pravin Oswal

Others

4.8  

Pravin Oswal

Others

बुद्धिबळाचा डाव !!!

बुद्धिबळाचा डाव !!!

2 mins
878


बुद्धिबळाचा डाव मांडला गेला होता गेला. प्रत्येक जण आपापल्या जागा अडवून बसले होते. प्रत्येकाची आपापली भूमिका होती आणि तों ती चौख बजावत होते. काही जणांची बाजू डावांमध्ये खूपच बळकट होती तर काही स्वतःला वाचवण्याकरता धडपडत होते.आपापले अस्तित्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. नवीन चाल घेतलेला उंट आपल्या नवीन ठिकाणी अस्वस्थ होता. . त्याची पुढची चाल रोखली गेली होती. तों आता निशाणा वर आला होता.. सुरक्षित जागे च्या शोधात तों स्वरभर झाला होता


सारंग ने नवीन कॉर्पोरेट जॉब घेतला तों एक चेंज म्हूणन. स्वतःला परत एक नवीन चॅलेंज द्यावं असावं विचार करून. आपल्या अनुभव चा उपयोग होईल आणि आपल्या कंपनी मध्ये आपली शान तशीच राहील या आशेने आणि विश्वासाने.


सुरवात तर छानच होती. नवीन टीम. नवीन वर्क कल्चर आणि मोठे पॅकेज या मुळे तों सुखावला होता. पण थोडया दिवसात त्याच्या हालचाली मध्ये लगाम घातला गेला. नवीन वर्क कल्चर त्याला भारी पडू लागले होते . जॉब एक्सपेक्टशन क्लिअर होत नव्हती तर मग एक्झिक्युशन चा मार्ग खुपच बिकट होता. आधीचा अनुभवपण फारसा कामाला येत नव्हता. .माघारी चे डोर कापले गेले होते. . त्याने विचार केला आणि आपली पत्नी वृषाली तिच्याबरोबर सल्लामसलत केली. वृषाली ने कुठलाच सल्ला दिला नाही, ती तो देऊ पण शकत नव्हती, सारंग अधिकच अस्वस्थ झाला, त्याने आपल्या टिम कडे बघितले प्रत्येक जण आपापल्या जागेवर स्थिर होता, ते त्याला बघत होते, मोठी मदत करण्याची त्यांची इच्छा आणि तयारी दिसत नव्हती,

तो परिस्थितीवर आणि स्वतःवर खूप चिडला, आपणच आपली लढाई लढण्यासाठी तो स्वतःची समजूत घालू लागला, अटॅक इज बेस्ट डिफेन्स असा विचार करून त्याने समोरच्या टीम बरोबर लढाईचे रणशिंग फुंकले. पण इथेच तो फसला गेला. चारी बाजूनी तो व्यवस्थित घेरलागेला होता. त्याची रणनीती पूर्णपणे विफल झाली होती


उंटाची चाल तिरकस आहे पण तों घोड्यासारखा सहज वळू शकत नाही. वजीरा इतकी शक्ती आणि युक्ती त्याच्यात नाही. आपल्याच प्यादीन मध्ये तो जखडला गेला होता

शेवटी सारंग ने ठरवले, या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये स्वतःचा नाहक बळी देण्यापेक्षा शांतपणे स्वतःच्या घरी माघारी फिरणे आणि जी टीम जिनें आपल्याला सहकार्य करण्यास नकार दिला तिला तिची पुढची लढाई करण्यास सांगणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे. सारंग शांत झाला. सकाळी पहाटे त्यांनी राजीनामा पत्र तयार केले आणि पाठवून दिले. आता त्याची भीती शांत झाली होती


उंट आपल्या घरी व्यवस्थित परतला होता, आत्ता नवीन डाव पुन्हा लवकरच सुरू होणार होता.. नवीन पडणारी फासे आपल्याला अनुकूल असतील हाच विचार करून तो शांत झोपी गेला


Rate this content
Log in