भाऊसाहेब उर्फ भावड्या
भाऊसाहेब उर्फ भावड्या
काही व्यक्ती जगामध्ये जन्मासाठी कशाला येतात हा एक मोठा प्रश्न अनेकांसाठीअसतो, लोक जे बोलतील ते निमूटपणे ऐकावं, प्रसंगी त्यांच्या चार शिव्या खाव्यात, मार खावा, पडेल ते काम करावं आणि जे जे मिळेल ते स्वीकारत जावो हेच त्यांच्या कपाळी ठामपणे लिहिलेले असते, भावड्या हा यातीलच एक होता.. बेरी गावात जन्माला आलेल्या आणि राहणाऱ्या भावड्या ला प्रेमाचे दोन शब्द ऐकायला कधीच मिळाले नाहीत. वीस वर्षाचा तरुण होऊन सुद्धा भावड्या भावड्या राहिला. तसं पाहिलं तर भावड्या हा काय मतिमंद किंवा विकलांग नव्हता. पण एकाला फाटका म्हणून लोकांनी ठरवलं तर संपूर्ण गाव त्याला फाटकं समजतं, भावड्या च्या बाबतीत हीच गत होती. येऊन जाऊन कोणीही त्याला काहीही बोलत असे. पडेल ते काम करणं आणि आणि मिळेल ते निमूटपणे स्वीकारणे हा त्याचा स्वभाव झाला होता.. त्याच्या घरच्यांना पण त्याची काही फिकीर नव्हती. भावड्या शिकला नव्हता. लोकांची फटकळ काम करण्यातच त्याचा सर्व वेळ जात असे.
पण त्या दिवशी मात्र खुपच वेगळे घडलं. भावड्या च्या मावशीने तिच्या दीरा बरोबर झालेल्या भांडणाचा राग भावड्या वर काढला. राग संपेपर्यंत त्याला मारलं. आणि तिच्या घरातून त्याला बाहेर हाकलले. . भावड्याला काहीच समजेना, सुचेना. तो खूप खूप रडला. स्वतःच्या घरी जाण्याची पण त्याला लाज वाटत होती.. काही न विचार करता तो गावाबाहेर वाट फुटेल तिथे चालत राहिला. तो रडत होता आणि चालत होता. स्वतःवरती त्याला खूप राग होता. संध्याकाळ झाली तरी तो चालत राहिला. जंगलात तो भरकटला, अंधार पडू लागला होता ब
ाहेर पडण्या चा कुठलाच मार्ग त्याला दिसत नव्हता. झाडांवरील फळे, कंदेमुळं खाऊन त्यानेआपली भूक भागवली.. तो तसाच भटकत राहिला. असाच भटकत असताना तो एका गावाच्या वेशीवर पोचला.. वेशीवरील हनुमानाच्या मंदिरामध्ये तो गेला. . त्या मंदिराला त्याने आपले घर बनवले, तो मंदिरात राहू लागला. त्याला बघून आपल्या गावात कोणीतरी मोठा साधू आला आहे अशी वावडा कुणीतरी उठवली. आता लोक त्याच्या दर्शनासाठी येऊ लागले. कुणी नारळ कोणी प्रसाद कोण फळ फुले घेऊन त्याच्या दर्शनासाठी येऊ लागले. भावड्या चा भाऊमहाराज झाला होता. त्याच्या हाती दैवी गुण असल्याची वंदता अशीच पसरली.
नशिबाचे फासे बदलायला वेळ लागला नाही. भाऊ ची कीर्ती सर्व दूर पसरली. लोक लांबून त्याच्या दर्शना करिता येत होती. एक दिवस बेरी गावकडून लोक त्याच्या दर्शना करिता आली. भावड्या ची मावशी पण होती. तिने त्याला ओळखलं नाही. पण भाऊ महाराज ने तिला ओळखलं. जवळ बोलावून तिची चोकशी केली.. पण स्वतः ची ओळख दाखवली नाही.. आज भावड्या ते भाऊ महाराज या लांब प्रवासा करिता तीच कारणीभूत होती.
भाऊ बेरी गावात कधी परतला नाही. तो आता राहुरी मध्ये प्रवचन पण करतो. त्याचे प्रवचन ऐकायला लांबून लोक येतात.. खुपच छान बोलतो तो, असं लोक सांगतात
काहीही चूक नसताना बेरी मध्ये भावड्या ने खूप दुःख सहन केले आणि आता काहीच गुण नसताना राहुरी मध्ये तो खूप सुख अनुभवत आहे. नशिबाचे फासे आता त्याच्या बाजूने आहे. फरक फक्त याचा आहे