Pravin Oswal

Inspirational Others

3  

Pravin Oswal

Inspirational Others

उमा

उमा

2 mins
560


उमा कोणी नर्स नव्हती, तिने मेडिकल मध्ये कोणती डिग्री अथवा डिप्लोमा पण केला नव्हता. किंबहुना ती फारशी शिकलेली पण नव्हती, पण त्या ट्रस्ट च्या हॉस्पिटल मध्ये सर्वजण तिला सिस्टर म्हणायचे. त्या हॉस्पिटल मध्ये ती सर्वच कामे करत होती. अगदी साफ सफाई पासून ते रुग्णांची सेवा करण्यापर्यंत. तिला कोणत्याच कामाचा कंटाळा नव्हता आणी लाज पण नव्हती. . ती मितभाषी होती पण आपले काम ती चौकस पणे करत होती. कोणीही कोणतंही काम तिला सांगत असे ती पण संकोच न करता ती ते करत असे


उमा गरीब होती. आपल्या आजारी आई बरोबर एका चाळीमध्ये राहत होती.. तिची मोठी बहीण हेमा कॅन्सरमुळे दगावली होती. बहिणीच्या आजारपणा मध्ये उमाने तिची खूप सेवा केली. त्याच मुळे कोणत्याही आजारी व्यक्ती बद्दल तिला खूप ममता वाटायची. ती मन लावून त्यांची सेवा करायची. तिच्या या गुणांमुळेच तिला ही नोकरी मिळाली होती.


त्या दिवशी हॉस्पिटल मध्ये एक नवीन पेशंट दाखल झाला. अतिशय रागीट आणि भांडखोर स्वभावाचा तो पेशंट होता. हॉस्पिटल मधील सर्वजण त्याला लवकरच कंटाळले. कोणीही त्याच्याकडे जाण्यास, त्याच्या सेवेस नकार देऊ लागले

शेवटी ही जबाबदारी पण उमा कडे आली. उमा त्याच्या शिव्या खात असे. राग सहन करत असे. पण त्याची सेवा करण्यात कुठलीच काटकसर ठेवत नसे.

पेशंटला त्याच्या यातना सहन होत नव्हत्या. एकदा तर त्यांने लाथेने उमाला दूर सारले. पण उमाने तेही सहन केले.. पेशंट ची साफसफाई ठेवणे, त्याला वेळेवर औषध देणे, त्याच्या शेजारी बसून त्याची काळजी घेणे तिच्यासाठी नित्याचे झाले होते.

ती मन लावून आपले काम करत होती. पण पेशंट ची तब्येत आणखीन खालावली. पेशंटला फारसे नातेवाईक नव्हते, असले तरी ते त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. पण एक दिवस चार माणसे त्याला भेटण्यासाठी आली कदाचित त्याने त्यांना बोलावले होते. बराच वेळ ते पेशंटची एकांतात बोलत होते. कोणालाही त्यांच्या रूम मध्ये प्रवेश करण्यास मनाई होती.


आणि एक दिवस पेशंट ने या जगाचा निरोप घेतला. त्या दिवशी हॉस्पिटल मध्ये बरीच लोकं आली होती. सर्वाना आश्चर्य वाटले. उमाने पेशंटच्या या नातेवाईकांना कधीच बघितले नव्हते. पेशंटच्या मृत्यूमुळे तिला खूपच वाईट वाटले. पण ती आपल्या दुसऱ्या कामांमध्ये पुन्हा व्यस्त झाली. का कोण जाणे इतरांच्या दृष्टीकोनात बदल झाला होता. अरे तिला उमा म्हणू नकोस उमाबाई म्हण, कुणीतरी बोलत होते. तिने फारसे लक्ष दिले नाही तिला या गोष्टींमध्ये फारसा रस पण नव्हता. तिने आपल्या पेशंटचा बिछाना झटकायला सुरुवात केली.


फादर डिसोजा आज खूपच विचारात होते. त्यांचे डोळे पाणावलेले होते. दोघांमध्ये जास्त श्रेष्ठ कोण? ह्याचा ते विचार करत होते. आपली दोन कोटी ची संपत्ती उमाच्या नावाने देणारा तो पेशंट अथवा ती सारी संपत्ती पुढच्याच क्षणी हॉस्पिटल ला डोनेट करणारी उमा?


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational