kanchan chabukswar

Thriller

4.0  

kanchan chabukswar

Thriller

रात्र काळी...

रात्र काळी...

6 mins
243


" दार उघड शालू! दार उघड… दार उघड....." जोर-जोरात दारावर ती थाप मारत होती, शालू नेहमीप्रमाणे गाढ झोपेमध्ये होती," शालू दार उघड, लवकर उघड ग." दिनकर चा कळवलेला स्वर ऐकू येत होता. शालू च्या आधी चाळीतल्या दोन-तीन घरांमध्ये दिवे लागले.


अण्णा, काका, विजय भाऊ काळजीने बाहेर आले.

" काय झालं दिनकर?"

दिनकर चा अवतार बघण्यासारखा होता, अंगावरचा शर्ट रक्ताने भिजला होता, त्याच्या अंगावर जखम दिसत नव्हती, पण रक्ताचा फवारा मात्र उडालेला होता. दिनकर घामाघूम झाला होता, एकाच पायात बूट होता, त पॅन्ट मागचा भाग ब्लेडने कापलेला दिसत होता. गिरगावच्या चाळीच्या बाल्कनीमध्ये अण्णाने आधी दिनकरला खाली बसवले, पटकन घरातून पाणी आणले, त्याला पाजले, विजय वर्तमानपत्राचा वारा त्याला घातला.

दहा मिनिटानंतर दिनकरच्या जीवात जीव आला. शालू पण बाहेर आली होती. दिनकर चा अवतार बघून तिच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला.


अण्णांनी सगळ्यांना शांत केले," शालू आधी दिनकरला आ त घे, दोघे शांत व्हा उद्या सकाळी बोलू."


    गेल्या एक वर्षापासून दिनकर फॅक्टरीमध्ये दुसरी शिफ्ट करत होता. त्याचं कारण असं की पप्पू जन्माला आला आणि सांभाळायची पंचायत झाली. शालूची सकाळची शाळा सात ते साडे बारा, मग पप्पू च शिशु, अंघोळ, जेवण भरवणं सगळी कामं दिनकर ची आईच करत होती, पण गेले वर्षभर ती दिनकर च्या भावाकडे जाऊन राहिली होती, त्यामुळे दिनकर दुपारी एक वाजता निघे आणि रात्री दीड वाजेपर्यंत परत येत असे. अडल्यानडल्या ला शेजारपाजारचे होतेच. पण पाळणाघरात पप्पूला ठेवणे दिनकर आणि शालूला परवडत नव्हते. म्हणून गेले वर्षभर नवरा बायकोची भेट फक्त सुट्टीच्या दिवशीच होत असे. मोबाईल फोन अस्तित्वातच नव्हते, गरीबांकडे कुठले फोन. तशी वेळ झाली तर शेजारचे कोणी ना कोणी धावून येत. गिरगाव मध्ये कोकणातून आलेले कितीतरी कुटुंब वास्तव्यास होते, कुठल्या तरी गिरणीमध्ये नाही तर कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये मुले काम करत.


रात्रभर चाळीतल्या बऱ्याच लोकांना झोपच आली नाही. दिनकर चा प्रवास त्यांना माहिती होता, कळल्या होऊन ठाण्यापर्यंत बस, नंतर लोकल पकडून दादर, दादरला रात्री लोकल बदलून चरणी रोड पर्यंत प्रवास, आणि नंतर स्टेशन हुन पाई पाई आयुर्वेदिक दवाखान्यात बाजूला असलेल्या चाळीमध्ये. कष्टाची सगळ्यांना सवय होती. गिरणीमध्ये आणि फॅक्टरी मध्ये एक तारखेला पगार होत नसे. 5, आठ, किमान दहा तारखेला रोकड पगार म्हणून मिळत असे. गेले वर्षभर पगार घरी घेऊन येताना दिनकरला देव आठवत असत. कधी टिफिन मध्ये प्रत्येक कप्प्यांमध्ये लपवून, तर कधी अंडर पॅन्टच्या खिशामध्ये, तर कधी चक्क बुटांमध्ये.


बरेच जण तर सांगत देखील की ते कसे लपवून पगार आणत. त्याच्यामुळे रात्रीच्या प्रवासामध्ये लोकलमध्ये तर फारच धोका असे. कधीकधी घाटकोपर हुन सायन पर्यंत डब्यामध्ये कोणीच नसे, तेव्हा दिनकर मोटरमनच्या मागच्या डब्यांमध्ये जाऊन बसत असे. कधीकधी लेडीज डब्यामध्ये चार पाच बायका असत, पोलीस असण्याची त्यावेळेला काही पद्धत नव्हती.


    दुसऱ्या दिवशी शालू नेहमीप्रमाणे उठली काळजीने तिने नाश्ता जेवण बनवले, थोडी जास्त जेवण बनवले, दिनकर ला बराच वेळ झोप आली नव्हती त्याच्यामुळे पहाटे पहाटे तो गाढ झोपेत होता. त्याला न उठवता अण्णा ना सांगून शालू आपल्या शाळेच्या ड्युटी वरती गेली. पप्पूच्या रडण्याने दिनकरला जाग आली, नेहमीप्रमाणे तो उठला, पप्पूची शी-शु आवरली, त्याच्या तोंडात दुधाची बाटली खुपसून दिनकर बाल्कनीमध्ये आला. अण्णा विजय तात्या, शेजारची मामी हळूहळू गोळा झाले, मामीने नेहमीप्रमाणे आलं घालून फर्स्टक्लास चहा बनवला होता, दिनकरच्या हाता मध्ये मोठा चहाचा कप देऊन त्या म्हणाल्या "काय झालं बाळा तुला? कुठे मारामारी करून आला होतास का?"


दोन घोट चहाचे घेऊन, दिनकर ने बोलायला सुरुवात केली.


नेहमीप्रमाणे कल्याणहून आलेल्या लोकलमध्ये तिसऱ्या डब्यामध्ये त्यानी पाय ठेवला. डबा रिकामा होता, पण कोपऱ्यामध्ये दूरवर दोन माणसं बसलेली त्याला दिसली, सोबत असलेली बरी म्हणून दिनकर त्यांच्या दिशेने चालत गेला, आणि तिथल्याच एका रिकाम्या बाकावर ती बसला. ती दोन माणसं म्हणजे पोरगेलीशी मुलेच होती. दिनकरचा निळा ड्रेस, फॅक्टरी मध्ये काम केलेले काळे झालेले हात, भरदार मिशा, डोक्यावरती दाट कुरळे केस, दिवसभराच्या कामाने झालेले लालसर डोळे, उंच मजबूत बांधा बघून ती दोन पोर त्याला घाबरली.


मुलुंड ते भांडुप ट्रेन नेहमीच पाच मिनिट देते, मधेच काय झाले माहित नाही पण ट्रेन थांबली, आणि अचानक डब्यामध्ये कुठून कोण जाणे पण अजून दोन माणसे चढली. माणसं काही बरोबर दिसत नव्हती. दिनकरचा आज पगार झालेला होता, आणि दिनकरने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पैसे चार ठिकाणी लपवून ठेवले होते. भांडुपच्या अलीकडेच पडलेली माणसं बहुतेक भंगार गोळा करणाऱ्यांपैकी दिसत होती. एकाच्या हातामध्ये कार्डबोर्डच्या मोठ्या बॉक्सेस न लावणारी ॲल्युमिनियमची पट्टी गोळा केलेली होती.


ट्रेनने आता जोर पकडला, फास्ट ट्रेन असल्यामुळे भांडुपला न थांबता ट्रेन विक्रोळीपाशी येऊन थांबली. विक्रोळीला डब्यामध्ये तीन बायका चढल्या. बायका चांगल्या घरातल्या वाटत नव्हत्या, लोकल ट्रेनमध्ये फुटकळ सामानाची विक्री करणाऱ्यांपैकी वाटत होत्या. आल्या आल्या त्यांनी त्या भंगारवाल्यांची हुज्जत घालायला सुरुवात केली. पैशावरूनच बाचाबाची चालू होती.


ती दोन मुले अजूनच घाबरून खिडकीतल्या कोपऱ्यात पोटाशी पाय धरुन बसली होती. जसं ट्रेननी माटुंगा सोडलं तसं दिनकर उठून दरवाज्यापाशी येऊन उभा राहिला, तेवढ्यात मागे हालचाल झाली, त्या भंगारवाले मुलांनी पट्टी सोडून हवेमध्ये फिरवायला सुरुवात केली होती, खाटकन ती पट्टी भांडणाऱ्या बाईच्या गळ्यावरुन फिरली, भसकन रक्ताचा फवारा डब्यामध्ये उडाला.


दिनकर सगळे डोळे फाडून बघत होता, आता पाळी त्याची होती, तो मुलगा ॲल्युमिनियमची पट्टी फिरवत त्याच्या दिशेने आला आणि त्यांनी सर्रकन दिनकरच्या शर्टवर ओढली. काही कळायच्या आत दिनकरनी ती पट्टी हवेमध्ये ओढली, आणि ट्रेनच्या बाहेर फेकून दिली, गाडी दादर स्टेशनमध्ये शिरली होती. चालत्या गाडीतूनच दिनकरने उडी टाकली, आणि धावत तो जिन्याच्या दिशेने पळत सुटला. त्याच्यामागे धावण्याचे भरपूर आवाज येत होते, मागे न बघता तो सरळ धावत सुटला, दादरचा भलामोठा ब्रीज ओलांडून तीन नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या लोकलमध्ये त्यांनी स्वतःला लोटून दिले. जरा श्वास घेतो बाकावर ती बसला फास्ट लोकल असल्यामुळे ती धडधड चालली होती. महालक्ष्मी स्टेशनमध्ये अचानक डब्यामध्ये काहीतरी हालचाल जाणवली, ती दोन भंगार वाली मुलं आणि उरलेल्या दोन बायका त्या डब्यात शिरले. डब्यामध्ये अजून कोणीच नव्हतं. बाईचा खून होताना बघणारा दिनकरही त्याच डब्यामध्ये होता. आता मात्र दिनकरची सटारली.


  भंगारवाल्यांनी भंगारातला एक अल्युमिनियमच्या डबा उघडला करा करा पत्रा फाडला आणि त्याच्या दिशेने येऊन म्हणाले,"चल बे निकाल जो भी कुछ है" त्या दोन बायका देखील कमी नव्हत्या. त्या दोन बायका मध्ये आता अक्षरशः मारामारी सुरू झाली. त्यांचं लक्ष दिनकरकडे नव्हतं, भंगारामधल्या कसल्यातरी मालाबद्दल त्यांची बाचाबाची चालू होती.


एका भंगार वाल्यांनी दिनकरच्या जवळ येऊन परत तो पत्रा त्याच्या दिशेने फिरवला, दिनकरची पाठ वळवली त्याच्यामुळे त्याच्या पँटचा खिसा कापला गेला. "उतार उतार जुते," एक भंगारवाला त्याच्या पायाला लटकला. आज मात्र दिनकरने पैसे बुटा मध्ये लपवले नव्हते. बूट फॅक्टरीचे होते, स्पेशल होते, त्यामुळे बूट हरवले तर त्याला भुर्दंड पडणार होता. बूट देण्यास दिनकर तयार नव्हता.


 खाड खाड खाड, ग्रँड रोड आला आणि दिनकरने डब्यामध्ये पळापळी सुरुवात केली, करण्यामध्ये त्याचा एक बूट निसटून खाली पडला, मध्ये आलेल्या बाईचा हात पत्र्याने कापला गेला, तर दुसरा भंगारवालेने पहिल्या भंगारवाल्याला दुसऱ्या पत्र्याने कापून काढले. परत तोच प्रकार, उडालेले रक्त दिनकरच्या शर्टला पण लागलं होतं. आजच्या क***** रात्री कोण कोणाला वाचवेल काही कळत नव्हतं.


जशी ट्रेन ग्रँटरोडवरून सुटली थोडा वेळ गेल्यानंतर त्यापैकी एक जण ट्रेन थांबवण्याच्या चेन लटकला,"आज तुम्ही नही छोडेंगे." असं म्हणत ते दोघेजण दिनकरच्या दिशेने चालून आले, ट्रेन गपकन थांबली होती, आता ड्रायव्हर उतरणार ट्रेन कोणी !कुठल्या डब्याने !थांबवली हे शोधणार, नंतर ट्रेन चालू करणार त्याच्यामध्ये दहा पंधरा मिनिट वाया जाणार होती. ओरडूनदेखील ऐकणार तिकडे कोणीच नव्हतं, दिनकरने झटपट निर्णय घेतल, पटकन तो मधल्या दरवाजाशी आला आणि ट्रेनच्या बाहेर उडी मारली.


चर्नीरोडच्या दिशेने जाणाऱ्या रुळावरून त्यांनी धावायला सुरुवात केली, धावता-धावता त्यांनी जोरात ओरडून "पीछे चोर है" असं मोटरमनला सांगितलं. एकाच पायात बूट एका पायात फक्त मोजे पण नेहमीचा रस्ता असल्यामुळे दिनकर रेल्वेच्या पटरीवरून धावत सुटला. चर्नीरोडच्या अलीकडे जेव्हा लेव्हल क्रॉसिंग होतं तेव्हा तो पटकन रस्त्यावरती वळला, अचानक त्याला मागून धावण्याचा आवाज आला, एक भंगारवाला आणि एक बाई त्याच्या मागे धावत येत होती. गिरगावात आल्यामुळे दिनकरला हायसं वाटलं. सगळे रस्ते सगळ्या गल्ली आणि बोळ त्याला लहानपणापासूनच परिचित होते. तिरपं धावत त्याने त्या दोघांना चुकवायचा प्रयत्न केला, पण तो भंगारवाला जास्त चिवट निघाला, अचानक दिनकरला मागून पोलिसांच्या शिट्ट्या ऐकू आल्या. त्याच्यामुळे न थांबता त्याने अजूनच वेग वाढवला. गिरगावातले गल्ल्याबोळ दिनकरला व्यवस्थित माहीत असल्यामुळे त्याला चुकवत चुकवत शेवटी त्यांनी आपली चाळ गाठली.

 

         अण्णांच्या सांगण्यावरून दिनकरने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली, ती माणसं कुठे चढली, दिसायला कशी होती त्या बायका कुठे चढल्या, त्या दिसायला कशा होत्या, सगळ्याचे वर्णन त्याने रेल्वे पोलिसांना दिले. चाकरमानी माणसं रात्रीचा पण प्रवास करत, धोकादायक प्रवास करायला कोणीच तयार नसे. सगळ्यांचं हातावरचे पोट, सुट्ट्या तरी किती घेणार. पुढच्या महिन्यापासून शेजारचा शाम पण दिनकरच्या फॅक्टरीमध्ये कामाला लागला. बाजूचे चाळीमधला गोविंददेखील दिनकरचाच फॅक्टरीमध्ये नवीन नोकरभरतीमध्ये कामाला लागला. आता तिघेजण शिफ्ट ठरवून घेतात आणि बरोबरच प्रवास करतात.


  दिनकरची आई पण पप्पूला सांभाळायला परत आली आहे, आता सगळ ठीक आहे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller