STORYMIRROR

Author Sangieta Devkar

Drama Romance

2  

Author Sangieta Devkar

Drama Romance

प्यार ये जाने कैसा है (भाग 2)

प्यार ये जाने कैसा है (भाग 2)

3 mins
37

गौरी अभी शी ख़ुप प्रेमाने बोलायची, जवळीक साधायला बघायची पण अभी तिला अजिबात भाव देत नसायचा कारण गौरी एकदम फ्लर्टी टाईप मूलगी आहे हे तो जाणून होत. कामा पुरता अभी गौरीशी संबंध ठेवत होता. स्वाती अभी शी तूटक वागत होती. एक दिवस अभी तिला म्हणाला,स्वाती तू एक प्रोफेशनल पर्सन असून अस वागतेस याचं मला आश्चर्य वाटते. कोणाला कीती महत्व द्यायचे, हे आपल्याला ठरवता आले पाहिजे. अस वागून तू त्या गौरी च्या हातात आयते कोलित देत आहेस. तू माझ्या साठी जास्त महत्वाची आहेस हे लक्षात ठेव. त्या नंतर स्वाती जरा निट वागू लागली. अभी मुद्दाम ब्रेक मध्ये स्वाती शी बोलत असायचा आणि गौरी ला इग्नोर करायचा. याचा गौरी ला खूप राग यायचा. आता गौरी स्वातीशी जास्त बोलत असायची. गोड गोड बोलायची. तू आणि अभी मेड फ़ॉर इच आदर आहात अस म्हणायची. अभी शी कामा पुरते बोलायची. स्वाती ला ही वाटले की गौरी ला अभी आणि तिच्या रिलेशन बद्दल समजले असेल म्हणून ती आता बदलली असेल.

गौरी शॉपिंग ला एका मॉल मध्ये गेली होती. अचानक तिला तिथे अभी सारखा एक जण दिसला,तीने थोड़ पुढे जावून बघितले तर तो अभिच होता. अभी सोबत एक मूलगी होती,ती ट्रायल रूम मध्ये जात होती आणि कपड़े वेयर करून बाहेर अभी ला दाखवत होती. अभी ही तिला हा नको तो ट्राय कर अस सांगत होता. गौरी मुद्दाम अभी कड़े गेली. हाय अभी,त्याने वळून पाहिले. ओह्ह गौरी तू, शॉपिंग ला त्याने विचारले. हो आणि तू? मी ही अभी बोलला तेवढ्यात ती मूलगी ड्रेस घालून अभी ला दाखवायला आली. तसा अभी गौरी ला एक्सक्यूज मि म्हणत निघून गेला. गौरी ला चांगला चांस मिळाला अभी चे हे गुपित स्वाती ला सांगायला. दुसऱ्या दिवशी नाटका ची तालीम होती. गौरी सगळ्यांत अगोदर आली होती. स्वाती नुकतीच आली होती. अभी अजून आला नव्हता. स्वाती काल मला अभी भेटला होता मॉल मध्ये. हो का काय म्हणाला मग? काही नाही ख़ुप बिझी होताो. त्याच्या सोबत एक मूलगी होती. मग ती मूलगी कसे वेगवेगळे कपड़े ट्राय करून अभिला दाखवत होती याच रसभरित वर्णन गौरी ने स्वाती ला सांगितले. स्वाती थोडी डीस्टर्ब झाली. अभी स्वत: हुन काही या बद्दल बोलतो का हे बघायचे अस तीने ठरवले. गौरी मात्र खुश होती तिने दोघात संशया ची ठिणगी टाकली होती. अभी आणि बाकी चे सगळे आले आणि तालीम सुरु झाली.

आज स्वाती चे लक्ष नवहते.अभि ने विचारले ही काय झाले तुला? काही नाही अभि इतकच ती बोलली. अभि घरी आला आणि लगेच त्याच्या मित्राचा त्याला कॉल आला. तसा अभि तडक निघाला. गौरी रात्री तिच्या फ्रेंड्स सोबत डिनर ला आली होती आणि त्याच हॉटेलमध्ये अभि आणि अजून एक मुलगा आणि त्या दिवशी मॉल मध्ये त्याच्या सोबत होती ती मुलगी ही होती. ती मुलगी रडत होती आणि अभि तिला जेवणाचा आग्रह करत होता. गौरी ने बघितले आणि तिला आयती संधी मिळाली स्वाती ला अभि चे हे रूप दाखवण्याची,तिने स्वाती ला कॉल करून त्या हॉटेल ला बोलवून घेतले. स्वाती लगेच आली आणि तिने पाहिले अभि त्या मुली ला आपल्या कवेत घेऊन तिला पाठीवर थोपटत होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama