प्यार ये जाने कैसा है (भाग 1)
प्यार ये जाने कैसा है (भाग 1)
अभी तू त्या गौरी सोबत काम करणार? ती कशी आहे माहित आहे ना तुला तरी तू,जा मला बोलायचे नाही तुझ्याशी. स्वाती रागात अभिजीत ला बोलली. स्वाती अरे तुला हे क्षेत्र नवीन आहे का? मीडियात काम करतो आपण दोघ तरी नको ते हट्ट का करतेस? हो आहे हा माझा हट्टच,तू गौरी सोबत काम करणार नाही आहेस. स्वाती तुझा माझ्यावर विश्वास नाही का? अभी ने स्वाती चा चेहरा आपल्या ओंजळीत पकडून म्हणाला. अभी आय ट्रस्ट यू बट नॉट ट्रस्ट ऑन गौरी. झाल तर मग स्विटू डोन्ट वरि. अभिजीत टॉप नाटक कलाकार आणि स्वाती स्क्रिप्ट आणि डायलॉग राइटर. एकाच कॉलेज मध्ये दोघ शिकत होते आणि एकमेकांच्या प्रेमात ही पड़ले. तिला लिहायला आवडायचे आणि त्यातच करियर करायचे होते. अभी उत्तम कलाकार होता. कॉलजेच्या पुरूषोत्तम करण्ड़क चा हीरो, त्याच्या अभिनयाने कॉलेज ला दरवर्षी बक्षीस ठरलेलेच! असे हे लव बर्ड्स. कॉलेज संपल्या नंतर त्यांच्याच ग्रुप ने हौशी नाटक मंडळ स्थापन केले. आता ते व्यावसायिक नाटक ही करू लागले होते. अभी दिसायला एकदम चार्मिंग,हैंडसम आणि आवाज दमदार एकून अभिनेता म्हणून परफेक्ट होता. स्वाती ही उत्तम च लिखाण करायची.
अभी ऊंचा पूरा सावळा,टोकदार नाक,आणि गाला वर पडनारी खळी त्यामुळे बऱ्याच मुली त्याच्या मागे होत्या. पण अभी चं प्रेम स्वाती वरच होते.गौरी त्यांच्या ग्रुप मध्ये एका च्या ओळखी ने आली होती. ती ही नाटकात काम करत होती. मात्र तिचा हेतु अभी ला आपल्या प्रेमात ओढण्याचा होता, हे स्वाती ने बरोबर ओळखले होते कारण गौरी चे वागणे तसच होत. प्रैक्टिस च्या बहाण्याने अभीला स्पर्श करणे,त्याच्या जवळ जाणे, सवांद बोलताना एकटक अभी च्या नजरेत बघणे, हे सगळ ती मुद्दाम करतेय हे स्वातीला समजत होते. ती अभिला या बद्दल बोलली तर तो म्हणाला स्वाती का उगाच इतके पझेसिव्ह होतेस? तू रायटर आहेस ना मग सवांद कसे बोलायचे हे मी तुला सांगू का? तू गौरी चा विचार डोक्यातुन काढून टाक. नसेल जमत तर प्रैक्टिस च्या वेळी इथे नको येऊस अभी ओरडला तिला. ती मग गप्पच बसली. ती रायटर असल्या मुळे तिला तालीम च्या वेळी हजर राहणे भागच होते. स्वाती ला बघुन गौरी अभी च्या जास्तच पुढे पुढे करायची कारण तिला स्वाती आणि अभी चे रिलेशन माहित होते. पण तिला अभी आवडत होता. तिचे प्रेम बसले होते त्याच्या वर म्हणुन ती मुद्दामच यांच्या ग्रुप ला कनेक्ट झाली होती.रोज गौरी ला अभी सोबत तालीम करताना बघने स्वाती ला जड़ जात होते. त्यांच्या ग्रुप मध्ये सगळ्यांना अभी आणि स्वाती बद्दल माहित होते. पण पर्सनल गोष्टी वेगळ्या आणि काम वेगळ हे प्रत्येकाला माहित होत. अभी तसेच वागत होता पण स्वातीच मन मानायला तयार नव्हते.
क्रमश:

