पत्रं त्या दोन मित्रांस.....
पत्रं त्या दोन मित्रांस.....
हा महिन्यातला दुसरा आठवडा. त्यामुळे या आठवड्यातल्या शनिवारी बँकेतल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. दर रविवारी तशी सुट्टी असतेच परंतु घरची इतर काम , विकेंडला एखाद्या नवीन ठिकाणी जाणं किंवा एखाद्या नातेवाईकांकडे जाणं त्यामुळे तसा काही फ्री वेळचं मिळत नाही. दररोजच्या हेक्टिक शेड्युल मधून वेळ काढणं खूपच कठीण असतं.
आज खूप दिवसांनी मुलाला घेऊन सोसायटीच्या गार्डन मध्ये आलो होतो. सायंकाळचे बहुतेक पाच वाजले असावेत. गार्डन मध्ये हळूहळू लोकांची गर्दी वाढू लागली होती. लहान मुलांपासून तर प्रौढांची संख्या सुद्धा बरीच होती.
दररोज तर तो त्याच्या आई सोबतच येतो पण , आज मला काहीसा मोकळा वेळ मिळाला म्हणून मीच त्याला घेऊन आलो.आज बऱ्याच दिवसांनी असं सगळं आणि खेळीच्या ठिकाणी आलो होतो. मलाही बरं वाटतं होत , दररोजच्या त्या हेक्टिक शेड्युलला फारच कंटाळलो होतो.
सूर्य अस्ताला चालला होता. गार्डनमध्ये लहानग्यांच्या आवाजाचे कल्लोळ उठले होते. बरेच पालक त्यांच्या मुलाबरोबर खेळत होते. त्यांचे ते अवर्णनीय हट्ट पुरवत होते , काही वृद्धही घोळक्याने बसून गप्पा मारताना दिसत होते ,काही मुलं पाण्याच्या उंच उडणाऱ्या कारंज्याच्या बाजूला उभ राहून त्यांची मज्जा घेत होते. तर काही मुलं आपल्या आईवडिलांना खेळणं करून आपल्या इच्छा पूर्ण करत होते. आईवडीलही त्या छोट्याशा मुलांमधे आपलं बालपण जगत होते. सर्वजण काही वेळासाठी हा विरंगुळा एन्जॉय करत होते. आणि माझा सोनूही त्याच्या फुटबॉलशी एकटाच खेळत बसला होता. कदाचित अजून त्याचे मित्र आले नसावेत.
आज खूप दिवसांनी गार्डन मध्ये फिरायला आलो म्हणून गार्डन मधल्या प्रत्येक गोष्टीला मी न्याहळत होतो. इतक्या दिवसांनी माणसांच्या गर्दीतून आज निसर्गाच्या हिरवळ सानिध्यात आलो होतो. मनाला प्रसन्न वाटतं होत. चिंतातुर मनापासून काही काळासाठी अलिप्त झालो होतो. मनाला टवटवीत पणा आला होता. मी गार्डन न्याहळत असतांनाच सोनूची हाक मला ऐकू आली
" डॅड , व्हॉट आर यु डुईंग देअर आय एम गेटिंग बोर यार "
सोनूचा आवाज आला. मी तिथूनच मागे फिरलो आणि त्याच्या जवळ आलो
"काय झालं बेटा " मी
" डॅड , मला खूप बोर होतय. आज मम्मा पण नाही आली , अजून माझे फ्रेंडस सुध्दा नाही आलेत. आय वॉन्ट टू प्ले फुटबॉल . कॅन यु प्ले फुटबॉल विथ मी टिल दे अराइव्ह."
" मला फुटबॉल नाही खेळता येत बेटा , आय एम क्रिकेट प्लेयर फ्रॉम चाईल्डहूड. आय डोन्ट हँव एनी बेसिक नॉलेज अबाऊट इट " मी
" जस्ट ट्राय डॅड , चल मी शिकवतो ना तुला चल बरं " असं बोलून मला ओढत तो फुटबॉल ग्राउंड वर घेऊन गेला.
खरंतर मला फुटबॉल अजिबात आवडत नाही पण त्याला कंपनी द्यायला आलो होतो म्हणजे जाणं भागच होत.
त्याने मला फुटबॉल काही बेसिक गोष्टी समजवून सांगितल्या. आम्ही फुटबॉल खेळायला सुरुवात केली. सोनू फुटबॉल मध्ये चांगलाच चॅम्पियन झाला होता. माझ्या कडे बॉल पास करायचा आणी मला फुटबॉल किक मारायच्या अगोदरच स्वतः येऊन किक मारून निघून जायचा. या सगळ्यात त्याने मला खूपच दमवल होत. हे हुलकावणी देण्याचं कौशल्य त्याने बहुतेक चांगलच अवगत केलं होतं.
डोक्याने हेडशॉट घेणं , दोन्हीं पाय मागे घेऊन त्यात फुटबॉल उचलून किक मारणे , प्रतिस्पध्याची डोळेझाक करून हुलकावणी देणं. मी तर त्याच हे कौशल्य पाहून दंग राहिलो होतो.त्याच्या सोबत खेळायचं सोडून त्याच खेळणचं बघत राहिलो. अवघ्या अकरा वर्षाचा मुलगा या खेळात एवढा पारंगत कसं काय होऊ शकतो याच मला आश्चर्य वाटत होतं.
बराच वेळ झाला आम्ही दोघ खेळत होतो. आता बहुतेक तो दमला आणि बाकड्यावर बसायला गेला मी पण त्याच्या मागे गेलो आणि बाकड्यावर बसलो. त्याने थोडा वेळ दम खाल्ला आणि मान खाली घालुन तिरकस नजरेने माझ्याकडे पाहून म्हणाला
" व्हॉट , आर यु डुइंग यार डॅड . मी एवढ शिकवण्याचा प्रयत्न केला पण तुला काहीच जमलं नाही नुसतं बघत होतास माझ्याकडे की , तुला शिकायची इच्छाच नव्हती ?? " त्याचा कोचक प्रश्न
" अरे , आज माझा पहिलाच दिवस होताना आणि माझं वय सुध्दा झालंय रे .मला नाही जमत आता अस कन्टिनू फुटबॉल मागे पळण किंवा असे स्टंट करायला " मी
" रियली डॅड , सोसायटीची क्रिकेट टीम तर तूच लीड करतोस , तेव्हा नाही का तुझं वय होतं. आणि मम्मा तर दररोज खेळते माझ्या बरोबर तीच सुध्दा वय तुझ्या एवढंच आहे ना मग , अँड यु नो व्हॉट मम्मा पहिल्याच दिवशी खूप शिकली होती. तुला तर तेवढीही आलं नाही. खरं तर तुला माझ्यासोबत फुटबॉल खेळणं म्हणजे बलिशपणा वाटत असेल नाही का ? सोसायटीच्या क्रिकेट खेळाचं दरवर्षीच बक्षीस तर तुमच्याच टीमला भेटत ते फक्त तुझ्यामुळे तेव्हा तर उत्साह ओसंडून वाहत असतो कारण ते खेळाडू तुझ्या समवयीन असतात ना. इथं बघ सर्व मुलाचे डॅड बघ त्यांच्या सोबत कसे लहान होऊन खेळताहेत. मलाही वाटत कधीतरी माझ्या डॅड ने पण माझ्या सोबत लहान होऊन खेळावं , माझ्यासोबत थोडीतरी मस्ती करावी मला समजून घ्यावं. पण नाही , तुला तर तुझ्या कामातून वेळ मिळेल तर ना . मला वाटलं आज डॅड सोबत खेळता येईल . गप्पागोष्टी होतील आज कितीतरी दिवसांनी तुझ्यासोबत टाइम स्पेन्ड करायला मिळेल म्हणून किती खुश होतो मी पण तू सगळा मूड घालवलास माझा. जाऊदे चल आता माझे मित्रही आलेत अँड वन थिंग अलसो मला नाही वाटत डॅड ' you will become my best friend ever '
एवढ सगळं तो एका दमात बोलून मोकळा झाला आणि त्याच्या मित्राकडे निघून गेला.
मी त्याच बाकड्यावर सुन्न होऊन बसलो होतो. आज कदाचित त्याने मनात साठलेलं ओठांवर आणलं होतं. मनातली सगळी भडास त्याने आज बाहेर काढली होती. मी एकदम शॉक लागल्यासारखा थक्क होऊन ऐकत होतो.
खरंच ! एवढ्या कमी वयात याने हा विचार केला होता. मला फक्त फुटबॉल नीट खेळता आला नाहीम्हणून त्याने किती काय ऐकवलं मला. मला खरचं त्याच्या बुद्धीचं कौतुक वाटलं. किती बारीक बारीक गोष्टी त्याने नोटीस केल्या होत्या. आज न्यू जनरेशन फास्टफॉरवर्ड असण प्रत्येक्षात आज अनुभवलं. एवढ्याश्या वयात किती डीप थिंकिंग करत ही मुलं ! आय एम रियली सारप्राईज्ड !
आणि शेवटी म्हणलेल्या " Dad you will never become my best friend ever " या शब्दांनी आज मनावर खोलवर कुठेतरी भाल्याने वर केल्यासारखे वाटलं . खरंच ! आयुष्यात कधीच मी त्याचा मित्र होऊ शकणार नव्हतो का ?
एखादी गोष्ट वर्तमानात घडली असेल आणि त्याचा किंचितही संबंध भूतकाळाल्या गोष्टींशी असेल तर त्याची भूतकाळातली तीव्रता शब्दांनी मोजणं कठीन होऊन बसतं
आज हे शब्द कानावर पडले आनि माझं मन काही काळासाठी भूत काळात गेलं. मी पण कधीतरी हेच शब्द माझ्या आई वडिलांना बोललो होते फक्त एका क्षुल्लक हट्टासाठी.
साधारण सातवीला असताना. माझ्या एका मित्राची बर्थडे पार्टी होती आणि त्यात मला आणि माझ्या आई वडिलांना बोलावलं होतं. आम्ही गेलो होतो . बर्थडेचा केक कट झाला आणि नंतर वेगवेगळे टास्क ठेवले होते.
एक काचेच्या बाउल मधून एक चिट्टी काढून त्यात लिहिलेली ऍक्टिव्हिटी त्यांना करायची होती. माझ्या बाबांनी त्या बाउल मधून एक चिट्टी काढली . त्यात डान्स लिहिलं होतं विथ आपल्या पार्टनर. बाबांनी सरळ नाही म्हणून सांगितलं आणि आईही तयार होत नव्हती. त्यांच्या कलीगने सुद्धा खूप इनसिस्ट केलं पण त्यांनी शेवटी केलाच नाही. मला त्यांचा खूप राग आला.
आम्ही घरी आलो मी सरळ कार मधून उतरून घरात येऊन सोफ्यावर बसलो. मला दोघांचा खूप राग आला होता. आता मला शाळेत माझे मित्र चिडवणार. मी या विचारात आकंठ बुडून गेलो होतो . आई बाबा आले आणि माझ्या बाजूला बसले मी माझा राग कंट्रोल करत होतो. दोन्ही मला समजावत होते .त्यांना ती ऍक्टिव्हिटी करण्यास अनकम्फर्टेबल वाटतं होत असे काही बाही सांगत होते. माझ्या मात्र हे सगळं डोक्यावरून जात होतं. त्यांचंही बरोबरच होतं पण त्यावेळी माझ्या डोक्यात राग नुसता धुसमुसत होता. अश्यावेळी मन शांत असणं गरजेचं असतं तेव्हाच नेमकं मनातल्या शांततेच उद्रेक होतो.
त्यांनी मला बरंच कन्व्हेन्स करायचा प्रयत्न केला पण मला फक्त माझ्यासमोर माझे मित्र माझ्यावर हसतांना दिसत होते. मला चिडवतांनी दिसत होते.
मी माझा सगळा राग आईबाबांवर काढत होते काहीही उलटं सुलट बोलत होतो आणि शेवटी मी म्हणालो " आई ,बाबा तुम्ही कधीच माझे मित्र होऊ शकत नाही.
आज हेच स्टेटमेंट तब्बल सत्तावीस वर्षांनी तेच वाक्य अपडेट करून माझ्या मुलाने माझ्या साठी वापरलं होत. आज कळालं किती वेदना झाल्या असतील आई , बाबांना. किती वाईट वाटलं असणार त्यांना माझे ते शब्द ऐकून.
असं म्हणतात " एकदा की बापाची चप्पल मुलाला यायला लागली की बापाने मुलाचं मित्र व्हावं लागतं. " आणि खरंच मी लहान असल्या पासूनच आई बाबा माझे मित्र मैत्रिण झाले होते. पण ज्यांचं माझ्या दृष्टीने फक्त माझं ऐकणारे मित्र वजा पालक म्हणून कर्तव्य होत.
माझा हट्ट म्हणून आई बाबा दररोज माझ्याशी क्रिकेट खेळायचे. त्यांच्या कामावरून दमून आल्यावर माझ्यासाठी काही वेळ द्यायचे. ते चाळिशीच्या घरात पोहचले असून सुद्धा माझ्यासाठी ते सगळं करत होते. मला मुलामध्ये मिसळता येत नव्हतं म्हणून आई फिलिडिंग आणि बाबा बॉलर म्हणून मला कंपनी द्यायचे. त्यांचं ते माझ्याशी लहान होऊन खेळणं तर मित्र म्हणूनच होत ना.
दररोज शाळेत जाताना आई माझी ती जड बॅग खाद्यावर घेऊन शाळेत सोडायला यायची. तेव्हा ती माझी मैत्रीणच झाली होती पण मला मात्र कधी कळलंच नाही. कोणी मला काही बोललं की मला भयंकर राग यायचा आणि तो आई वर काही न काही कारण वरून काढन्याचा प्रयत्न करायचो तेव्हा आईच मला समजून घ्यायची एक मैत्रीण बनुनच.
कधी एखादा विषय अवघड वाटतं असेल तर आई बाबा सोबत ग्रुप स्टुडी करून सोडवले म्याथ चे प्रॉब्लेमस तर मित्रमैत्रीणीच्या ग्रुप स्टुडी सारखच ना .
दरवर्षाच्या माझ्या annual डे च्या डान्स परफॉर्मन्सची प्रॅक्टिस तर आईच घेत होती ना. आणि शेवटी अमृताशी माझी लग्न करण्याची गळ आईनेच बाबांकडून अप्रुव करून घेतली होती.
हे सगळं म्हणजे सगळं आज माझ्या डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखं तरळलं होत. पण आज हे सगळं अर्थहीन ठरलं होतं.
विसरलो होतो बाबांचं मित्र होऊन वागवंण , चेसमध्ये मला जिंकल्याचा आनंद मिळावा म्हणून स्वतः हरल्याचा पुसटसा आव चेहऱ्यावर आणणं , दिवसाच्या दगदगितून माझ्यासाठी हक्काचा वेळ काढणं , माझ्यासाठी अधिक प्रोटेक्टिव्ह असणं. आईचं मी दहावीला असताना माझ्या आरोग्या सोबत अभ्यासाची काळजी घेणं , मला सकाळी अभ्यासासाठी लवकर उठवणं , शाळेच्या ट्रीप साठी बाबांशी भांडून मला ट्रीपला पाठवणं , काहीही करताना चार चार वेळा 'काळजी घे'म्हणून सांगणं. हे एवढं त्यांचं माझ्यासाठी असणार अटेन्शन मी काही क्षणांत विसरलो होतो फक्त त्या एवढ्याश्या हट्टाच्या नादात. आज त्या एका वाक्याने माझ्या बापाच मित्र होण्याचं वास्तव माझ्या समोर उभ केलं होतं.
मी तरी खूप कमी वेळ माझ्या सोनू सोबत घालवत होतो पण बाबाआई तर मला जेव्हा वाटेल , जस वाटेल तस करण्यास माझ्यासाठी तयार होते. पण मित्र माझ्या विश्वात मशगुल होऊन त्यांची अवस्था कधी समजूनच घेतली नाही.
कसं असत ना 'जेव्हा आपण आपले १००% इनपुट एखाद्या गोष्टीत इन्व्हेस्ट करत असतो आणि तरीही त्यातून मिळणार आउटपुट १% टक्का ही नसेन आणि त्याऐवजी ते जर अजून मायनस मध्ये त्याच सगळ्यात जास्त दुःख होत असतं.'
आता सगळा भूतकाळ आणि वर्तमान पिंजून झाला होता. आणि केलेल्या चुकांची मालिकाही डोळ्यासमोर मंडळी होती. आज आई बाबांचं माझ्या आयुष्यातल स्थान आज खऱ्या अर्थाने कळालं होत.यासाठी स्पेशिअली थँक्स टू सोनू!
प्रिय ,
आईबाबा नाही....तो आणि ती
मी अमेय तुमचा मुलगा. खरंतर आज मला तुमचा मुलगा म्हणून घेण्याची लाज वाटतेय. आज तुम्ही ह्यात नाही पण आज मला तुमच्या प्रत्येक गोष्टीची आठवण येत आहे. आईचं ते काळजी घे म्हणून चार वेळेस दरडावून सांगून किंवा बाबा तुमचं सांभाळून वाग म्हणणं पुन्हा पुन्हा आठवतय.
एक मित्रमैत्रिणीच्या स्वरूपात भेटलेले माझे आईवडील आज मला पुन्हा एकदा वास्तव स्वीकारायला भाग पडताहेत. मी तुमची केलेली अवहेलना मला माझाच चेहरा आरश्यासमोर उभं राहून बोलायला लाजवतयं. मी म्हंटलेल्या ' आई बाबा तुम्ही कधीच माझे बनू शकत नाही' पेक्षा मीच कधी तुमचा मित्र बनू शकलो नाही हेच सत्य माझ्यासमोर आलंय. आज कदाचित याच शब्दांनी अप्रत्येक्षपणे माझ्या थोबाडीत लगावली आहे. माझं खरचं चुकलं आईबाबा तुमच्या प्रेमाला मी कधीच समजू शकलो नाही पण आज याच आठवणी मला पुन्हा तुमच्या सोबत जगल्याचा आनंद मिळतोय. माझं माझ्या पुरतं मर्यादित होऊन जगतांना तुमचं माझ्या आयुष्यातल स्थानच विसरलो होतो. माझ्या या चुकी साठी माझं करा आई बाबा. तुमचं ते माझ्याशी निस्वार्थी होऊन मित्र बनण्याचा आयुष्यभराचा प्रयत्न मी नक्कीच सोनू सोबत मित्र म्हणुन अनुभववेल.
तुमचा मुलगा ,
अमेय
