Gaurav Mane

Others

3  

Gaurav Mane

Others

जगणं नक्की कुणासाठी ?

जगणं नक्की कुणासाठी ?

7 mins
236


   काल सहजच फेसबुक बघत होतो , थोडा वेळ असच काहीस बघून फेसबुक मधून बाहेर पडणार होतोच की , थोड वर स्क्रोल झाल्याने अचानक एक पोस्ट दिसली... विचार करायला भाग पडणारी ती पोस्ट होती ' प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर स्वतःसाठी जगत असतो मात्र , कधीतरी दुसऱ्यांसाठी सुध्दा जगून बघावं ' अशीच काहीतरी होती ती पोस्ट... मागे भरपूर वेळेस मी हे वाक्य ऐकलं होतं , वाचाल सुध्दा होत... पण काल मला त्यात काहीतरी वेगळंच वाटलं... भरपूर वेळेस शाळेतील प्रमुख कार्यक्रमात , कधी मोठया थोर नेत्याची जयंती अथवा समूर्तीदिनानिमित हे वाक्य सर्रास ऐकायला मिळायचे , कधीतरी वॉट्सअप्प स्टेटस वर पण बऱ्याच वेळेस पाहायला मिळाले , पण तेव्हा ते इतकंस वावगं कधीच नाही वाटलं...पण या वाक्याने आज माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेतलं होतं...मला आज त्या वाक्याचा दुसराच काहीतरी अर्थ लागत होता...त्याच्यातील तो गूढ अर्थ नव्याने उमगत होता...


     

‌      सर्वसामान्य पणे समाजात तीन प्रकारची माणसं राहतात... एक गरीब तर दुसरे श्रीमंत आणि अजून एक म्हटलं तर मध्यमवर्गीय असे अर्थात मी इथं काही वर्गाचं वर्गीकरण करत नाही परंतु हा मुद्दा मांडण्याची मला जरा इथं निकड भासली... गरीब आणि श्रीमंत यांच्यात समन्वय साधणारे मध्यमवर्गीय असतात...तर त्या पोस्ट मध्ये म्हटल्या प्रमाणे बहुधा सर्व मनुष्यप्रजात आयुष्यभर स्वतःसाठी जगत असते , कधीतरी आपल्या आयुष्याचा काहीसा भाग इतरांसाठीही असावा अस त्यात म्हटलं आहे , अंतःहा आपण सामाज्यातील एक महत्त्वाचा घटक असतो आपलं पण समाज्याच्याप्रती काहीतरी देणं लागतं... समाज्यातील काही घटक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्याला घडवत असतात त्यांच्या बऱ्याच गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडतो... पण काही गोष्टींसाठी आपण स्वतःला समाज्याचे गुलाम बनवून घेतो...आणि हे सर्व आपण आपली प्रतिमा किंवा प्रतिष्ठा समाज्यात टिकून राहावी म्हणून करत असतो... मी मानतो आपण पण समाज्याचे काहीतरी लागतो , वरती लिहिल्या वाक्याशी पूर्णतः सहमत आहे परंतु आजच्या या काळात आपण स्वतःला फक्त इतरांना दाखवण्यासाठी समाज्याप्रति संलग्न असण्याचं ढोंग करत असतो आणि कदाचित हीच ढोंग करता करता कधी आपण समाज्याच्या स्वाधीन होतो याची पुसटशी कल्पना आपल्याला येत नसते मात्र , आज या वाक्याचा खरतर दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे... मागच्या वीस तीस वर्षपूर्वीच्या काळात हे वाक्य समाज्याच्या परिस्थिती अनुरूप होत हे तुम्हालाही माहीत आहे म्हणूनच आता या वाक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कदाचित थोडा बदलायला हवा...आणि शक्यतो आजच्या या युगात कोणत्याही गोष्टीचा बहू आयामांनी विचार केला जातो... आता मी एक विद्यार्थी असल्याने माझ्या दृष्टीकोनातून त्या वाक्याचा अर्थ असा असायला हवा असं मला वाटतं 


   आजच्या या काळात आता लहान मुलांना अगदी वयाच्या चौथ्या वर्षीच शिक्षण देण्याची सुरुवात केली... बघा ना! अगदी मध्यमवर्गीय घरातील मुलांनासुद्धा प्ले ग्रुपला जायला लागल्यापासून त्यांना Competition च्या रेस मध्ये त्यांना भरडवल जात , पावलोपावली Competition ची भीती दर्शवली जाते...एवढ्या लहान वयात Competation भूत मुलांना दाखवल्यामुळे ती मुल फक्त आणि फक्त का तर या समाज्याने आपली अवेहलना करू नये म्हणून , कोणी आपल्याला टोचून बोलू नये किंवा आपल्या आईवडिलांना समाज्यात सन्मान असावं म्हणून या भीतीने Competition च्या ट्रॅक वर पळायला सुरवात करतात आणि तो मुलगा जसा जसा मोठा होतो तसं तो अजूनच अवास्तव सामाजिक बंधनाना बळी पडतो , मग याच ठिकाणी तो स्वतःच त्याचा स्व हरवून बसतो , त्याला स्वतःच असं काही अस्तित्व राहत नाही...कदाचित त्याचं मन फक्त इतरांच्या सुखासाठी हे सर्व करत असावं आणि असंच कुठेतरी ती रेस जिंकल्यावर त्याला जाणवतं की आपण स्वतःला समाज्याच्या किती स्वाधीन केलं आहे , त्यांच्या विचारांचा पगडा मी स्वतःच स्वतःवर बांधून घेतला आहे आणि सुरू होतं स्वतः ला कोसणं , स्वतःचे दोषांना कुरवाळणं आणि आपल्या आईवडीलांबद्दल अडी निर्माण होणं , स्वतःच गुलामपण इतरांना सांगणं आणि परत या सर्वात विचार करून डोक्यात अनैसर्गिक गोष्टीचा कल्लोळ माजणं... अश्याने हातात आलेलं पण आपण गमावून बसतो ज्या गोष्टी आपल्याकडे जन्माजात आहे , त्यांचं अवलोकन करण आपण विसरून जातो... कदाचित मनात चाललेल्या द्विधामनस्थितीमुळे! आता याच वरील कथनातून समजत की आपण स्वतःला किती स्वतः साठी आणि किती इतरांसाठी जगत असतो... आजच्या या काळात आपण म्हणतो आपल्याला स्वातंत्र्य मिळाले परंतु ते फक्त दाखवण्यासाठी आपण मनाने मात्र अजून नाही कुणाचे तरी गुलाम आहोत... आपल्या आईवडीलांनी आपल्याला स्वतंत्र तर दिले परंतु त्यांच्या विचारसरणीचा पगडा अजूनही कुठेतरी आपल्यावर आहे... आपल्याला मुक्त विचार करण्याची मुभा असूनही आपण समाज्याचे बंधन आपल्या मनावर बिंबवून घेतो आणि शेवटी तोच निष्कर्ष प्राप्त होतो.... आता तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का ? किंवा अशी कोणती गोष्ट आहे जी या गोष्टीचे समर्थन करते ? तर आहे माझ्या स्वतःच्या आयुष्यात अश्या गोष्टींचा अनुभव घेतला आहे...


       मी तेव्हा नुकताच दहावीला गेलो होतो , मे महिन्यात मी दहावीच्या क्लासेसला जायला लागलो होतो...दररोज रेग्युलर क्लासला जात होतो , अश्यात मे महिना संपला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात मागच्या वर्षीत दहावीत असलेल्या मुलांचा रिझल्ट लागला सर्वत्र दहावी मध्ये उत्तम गुण मिळालेल्या मुलांचे अभिनंदन होऊ लागले , काहींचे सत्कार सुद्धा झाले काहींची तर गावातील सगळ्यात हुशार मुलगा - मुलगी म्हणून रॅली सुद्धा काढली...दोन- तीन दिवस झाले असतील , मी रात्री अभ्यास करत बसलो होतो...पप्पा पण माझ्या समोर खुर्चीवर बसून टीव्ही बघत होते त्यांना अचानक कोणाचा तरी फोन आला आणि ते बाहेर गेले मी तसाच बसलो होतो काही वेळाने पप्पा आले आणि त्यांनी फोन माझ्या हातात दिला , मी फोन घेतला समोरून कोण बोलताय याचा अंदाज घेतला...पलीकडून माझी मावस आत्या बोलत होत्या...त्यांची मला अभ्यासबद्दल जुजबी बोलल्या आणि शेवटी " तुला पण दीदीसारखा पहिला नंबर आणायचं बर का ? एवढं मात्र आवर्जून म्हणाल्या...मला जरा धास्तीच भरली , मी पण बोलायच्या ओघामध्ये " हो " म्हणून टाकलं आणि फोन ठेवला...अन् मग सुरू झाला नंबर मिळवण्यासाठीचा हव्यास...आता फक्त नंबर मिळवणंच माझ्यासाठी माझं सर्वस्व झालं होत आता शाळा सुरू होणार होत्या म्हणून मी घर सोडून हॉस्टेलला राहायला आलो आणि तिथे गेलो आणि हे नंबर मिळवण्याचं खूळ काही प्रमाणात कमी झालं होतं आणि परत एक दिवस कळालं की आमच्याच हॉस्टेलच्या मागच्या वर्षीच्या दोन मुलांची शाळेत दुसरा व तीसरा नंबर आला होता आता मात्र ही गोष्ट आमच्या इगोवर आली होती आम्ही जर या वर्षी नंबर नाही काढू शकलो तर आम्ही हॉस्टेल मुलांच्या आणि शाळेच्या शिक्षकांच्या नजरेत पडलो असतो...आता मी ठरवलं तिन्ही नंबर पैकी एकतरी नंबर मला मिळायचं हवा , मी मनाशी जणू नंबर मिळवण्याचा चंगच बांधला होता...मग फक्त आणि फक्त अभ्यास एके अभ्यास बाकी सगळं फाट्यावर...पार जीवाचा आटापिटा करून रात्रंदिवस अभ्यास चालू केला...बाकी गोष्टी माझ्यासाठी निरर्थक झाल्या होत्या , माझ्याबरोबर माझ्याच होस्टेलच्या एक मुलगा अभ्यास करत होता पण तो जास्त काही टेन्शन घेत नव्हता... अभ्यासत मात्र कधीच मागे नसायचा आणि इतर गोष्टीमध्येही पुढेच मला त्याच खूप विशेष वाटायचं...असच करता करता आमची चाचणी परीक्षा झाली मी आमच्या दहावीच्या वर्गांमध्ये दुसरा आलो होतो आणि तो दुसरा मुलगा तिसरा आणि पहिली अर्थात एक मुलगीच होती...आता मला थोडं हायस वाटलं नंतर सहामाही परीक्षापण झाली तिथेही मी दुसराच होतो आता मला ही Continuty टिकवून ठेवायची होती असे नियोजन करून मी परत अभ्यासाचा सपाटा लावला पण या सर्वात मी शाळेच्या बऱ्याच इव्हेंट मिस केल्या होत्या डिसेंबर मध्ये पूर्वपरीक्षा झाल्या आणि आम्हाला बोर्ड परीक्षेआधी काही दिवस अभ्यास करण्यासाठी सुट्टी मिळाली यावेळेतही मी अभ्यासाचा सपाटा काय सोडला नाही...हा अभ्यास करून करून माझं मानसिक संतुलन बिघडू गेलं होतं मला सतत पुस्तकातील वेगवेगळ्या प्रश्नांची अन्सर आठवायचे आणि मी ते अन्सर आठवत आठवत कधी त्या विषयाच्या मुळावर पोहचून जायचो मलाच नाही समजायचं आणि कोणतीही गोष्ट करतांना या विचारांनी मला पुरतं ग्रासून टाकलं होतं या मुळे मी माझ्या इंग्लिशच्या पेपरला आजारीपण पडलो होतो...अखेर बोर्डाच्या परीक्षा झाल्या आणि दोन महिन्यांनी रिझल्ट होता... मला रिझल्ट लागू स्तोर काय रिझल्ट लागेल याची चिंता लागून होती आणि शेवटी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात रिझल्ट लागला आणि माझा दुसरा नंबर आला होता...एकदाच माझं टेन्शन गेलं मी फ्री झालो... फोन करून लोकांनी माझं अभिनंदन पण केलं सत्कारही झाला या सर्वांच मला तेव्हा खूप आनंद झाला होता , पण आज मी आयुष्याच्या ज्या वळणावर उभा आहे तेथे आज मला ना या मार्कांना किंमत आहे आणि त्या प्रतिष्ठेला...पण आज मला या सर्वांच महत्व कळालंय कदाचित मी त्या काळात नंबर मिळवण्यासाठी स्वतःला अभ्यासाचा गुलाम बनवून घेतलं होतं आणि हे नंबर मिळवण्याच भूत कश्याला तर फक्त माझी प्रतिष्ठा निर्माण व्हावी म्हणून , माझ्या आईवडिलांना समाज्यात सन्मान मिळावा म्हणून छे छे ! पण आता याच गोष्टीचं दुर्दैव वाटतय की मी स्वतःसाठी नाहीतर समाज्यासाठी जगलो...समाज्याच्या या चौकटीबद्द आयुष्य स्वीकारलं आणि त्यात माझा एक वर्ष पणाला लावले आणि अंतिमः काय झालं तर रेस मध्ये पळून पळून थकलो आणि जिंकलो सुद्दा परंतु आज मागे वळून पाहिल्यावर वाटत कदाचित तेव्हा थोडं यातून बाहेर असायला हवं होतं...आज माझ्या या मार्कांचा पुरावा फक्त एक कागद आहे परंतु या काळात मिळणाऱ्या अनुभवांपासून मी वंचितच राहिलो तेही स्वतःच्या चुकीमुळे आज हे मार्क्स मला हसायला लावत नाही तर फक्त काही आठवणी मला हसायला भाग पाडतात...अनुभवांची फार कमी प्रमाणात मला प्राप्त झाली याच दुःख तर आहेचं...असो 


      तर वरील अनुभवावरून तुम्हाला नक्कीच समजले असणार मला काय म्हणायचे आहे...तसं तर दहावीला आयुष्यातल टर्निंग पॉइंट म्हणतात पण या टर्निंग पॉइंटला मी फक्त करिअरच्या दृष्टीनेने बघून खूप काही गोष्टींना ,माझ्या कलांना वाव देण्यास मागे पडलो आणि पच्छाताप करण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही  पण आज मी एक गोष्टीचं कॅलकुलेशन अगदी परफेक्ट करून ठेवला आहे की मी स्वतासाठी किती जगलो आणि दुसऱ्यासाठी किती जगलो...आता माझं हे मत फक्त आपल्या स्वातंत्र्याप्रति आहे बाकी आयामांनी वेगळं असू शकतं...मला माहितीये प्रत्येकाच्या आयुष्यात असा अनुभव नक्कीच आला असेल परंतु आता त्यात बदल घडवण्याची गरज आहे...आणि न दिसणाऱ्या सामाजिक बांधनांना किंवा विचारांचा पगडा दूर लोटूया आणि नवीन विचारांची पेरणी करूया...बघा नक्की विचार करा काय वाटतंय , आणि शेवटी ' प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर स्वतःसाठी जगत असतो मात्र , कधीतरी दुसऱ्यांसाठी सुध्दा जगून बघावं 'याचा जरा संक्षिप्तने विचार करा....


Rate this content
Log in