STORYMIRROR

Gaurav Mane

Tragedy

3  

Gaurav Mane

Tragedy

स्त्रीभ्रूणहत्याच की अजून काही

स्त्रीभ्रूणहत्याच की अजून काही

7 mins
306

आज रविवार होता सकाळचे सात वाजले होते सूर्य आकाशात आगमन करत होता...मी आमच्या सेकंड फ्लोअरच्या बाजूच्या बाल्कनीत बसलो होतो...सूर्याची कोवळ्या उन्हाची किरणे झाडांच्या पानांची गर्दी पार करून सरळ अंगावर येत होती...मी चहा घेत होतो , आज रविवार असल्यामुळे साईट वर काही काम नव्हतं आणि सुट्टी पण होती... आणि आज काही महत्वाचं काम नसल्याने मी पण एकदम निवांत होतो बाल्कनीत बसून सूर्याची ती कोवळी प्रकाश किरणे अंगावर घेत होतो...हल्ली मला असा मोकळा वेळच नसायचा...सतत आयुष्यात नुसती धावपळ चालू होती , आयुष्यात सतत तोच तोच पण येत होता पण माझा पण नाईलाज होता आता जगायचं म्हणून ते करणं तर भागच होतं आणि मीही त्यात गुरफटून जायचो ,दररोजच रटाळ आयुष्य जगणं शरीराने अंगी बाणलं होत.... घर कितीही रम्य अश्या निवांत गार्डन जवळ असलं तरी त्या गार्डन मध्ये कधी फेरफटका मारणं झालच नव्हतं... कधी घरी लवकर आलोच तर मनस्विनी (माझी मुलगी) घेऊन जायची मला गार्डन मध्ये म्हणे स्ट्रेस फ्री करण्यासाठी , हॅप्पीवालं लाईफ जगण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा परिचय मला ती करून दयायची... मला तिचा हा लाघवी स्वभाव खूप आवडायचा, ती अगदी मनमोकळ्यापणे बोलायची आणि तिच्या सोबत फिरलं का मला पण ताजेतवाने झाल्यासारख वाटायचं....

आजही तसाच काहीसा दिवस उगवला आहे अस मला काही क्षण वाटून गेलं...काही वेळ गेला असेल मला खाली सायकलची ट्रीग्ं ट्रीग्ं ऐकू आली कदाचित पेपरवाला आला असावा...मी बाल्कनीतूनच घराच्या भिंतीला कान लावून कोनी उठलंय का याचा कानोसा घेतला... तन्मयचा आवाज येत होता कदाचित तन्मय उठला असावा...तन्मय , अरे ये तन्मय उठलास का ?' मी त्याला आवाज दिला. ' हो पप्पा उठलोय , बोला काय म्हणतांय ' तन्मय आळस देत बाहेर बाल्कनीत आला... काय रे रात्री जास्तवेळ टिव्ही बघत बसतो आणि सकाळी लवकर उठायचं सोडून मस्त सुस्त असतो , दीदी बघ केव्हाची उठली आणि क्लासला पण गेली तुम्हाला मात्र त्याच काहीचं गांभिर्य नाही ना ? मी तन्मयावर चिडलो... "अम्म्म पप्पा जाउद्याना होतं कधी कधीं असं " तन्मय... "कधी कधीच का दररोज ?" मी तन्मयला प्रश्न केला.. "जाउद्याना पप्पा सकाळी सकाळी काय हे , एक दिवस नाही गेलो क्लासला त्यात काय एवढं ? "तन्मय... "हेच एक ना एक दिवस अंगाशी येईल ना तेव्हा कळेल तुला , जाऊदे चल तुझ्या पुढे बोलून काय फायदा तुझं ते नेहमीच सुरूच असणार , बरं पेपर आला बघ बरं तेव्हढं " मी तन्मयला विचारलं... हो बघतो अस म्हणून तो पेपर आलाय का बघायला निघून गेला...काही वेळाने पेपर घेऊन आला आणि माझ्या पुढ्यातल्या टीपॉयवर ठेऊन निघून गेला... तो गेला त्या दिशेने मी काही वेळ बघितलं आणि पेपर हातात घेतला आणि पेपर बघू लागलो पेपरच्या उजव्या बाजूला एक स्त्रीच अनिमेटेड छायाचित्र होत आणि त्याच्या बाजूला भल्यामोठ्या वळणदार अक्षरात जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अस लिहिलं होतं...आज जागतिक महिला दिवस म्हणजेच ८ मार्च होता...म्हणूनच बायको आज लवकरच सोसायटीच्या महिला मंडळात गेली वाटत... मी पेपरच एक पण उलटत होतो ,आज महिला दिनाच्या निमित्ताने महिलाबद्दल नवनवीन योजनाचा अवलंब केल्याचं दिसून येत होतं , महिला सबलीकरणाबद्दल पण लिहिलं होतं , महिलांचा नवीन क्षेत्रात प्राधान्य क्रम दाखवला होता , महिलांच्या सुखसोईसाठी नवीन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवल्याचे अहवाल दिसत होतं , महिलांचं भारतीय संस्कृती असणार स्थान अगदी स्पष्टपणे मांडलं होत... दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण महिलादिनानिमित्त महिलांच्या दैनंदिन आयुष्यबद्दल वेगवेगळे अग्रलेख छापले होते... महिलांचा भारतीय राजकारणात सहभाग उल्लेखनीय आहे.... परंतु आहे राजकारणात महिला सहभाग तर घेतात , निवडून पण येतात मात्र आजही ग्रामीण भागात महिला फक्त नावासाठी निवडून येतात त्यांच्या ठिकाणी त्यांचे नवरेचं पदभार सांभाळत असतात ही वास्तव स्तिथी आहे...असो हा माझा मुद्दा नाही , महिलांना स्वातंत्र्य आहे हे फक्त बाहेर दाखवले जात परंतु घरात अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव कायम आहे...ग्रामीण भागात आजही सर्रास लहान वयातच मुलींची लग्न लावली जातात , त्यांची ती जबाबदारी पेलण्याची ताकद नसूनही त्यांच्यावर ते लादलं जात , त्या सक्षम असतात का ती जबाबदारी पेलण्यासाठी की ,आपली जबाबदारी एकदाची संपवी म्हणून आपण त्यांची लग्न लावतो , बालविवाह हा गुन्हा आहे पण तो फक्त कागदाताच वास्तवात मात्र रितच...बरोबर ना ? एखाद्या मुलीचं समजा वयाच्या १४ किंवा १५ व्या वर्षी लग्न झालं तर मानवाचं साधारणपणे आजच्या काळात आयुर्मान बघितलं तर जास्तीत जास्त ८० वर्ष आहे तर विचार करा या मुलींना वयाच्या किती वर्षे संसार करावा लागेल ,पण त्या अगोदरचं या मुलींच्या आयुष्याचं काय होत याचा अंदाज आपल्याला आहे का ? एक तर मुलीचं लवकर लग्न झाल्यामुळे जर गरोदर राहिलीच तर प्रसुती वेळी योग्य वाढ झाली नसल्यामुळे मृत्यू ही होतो , लवकर लग्न झाल्यामुळे घर सांभाळन्याची जबादारी ती मुलगी पेलू शकते का , या समाज्यात राहताना अनेक गोष्टींची तडजोड करावी लागते त्यासाठी त्या तयार आहेत का , काही वेळेस तर त्या मुलीला स्वयंपाक करतांना गॅस व्यवस्थित नाही हाताळता आला तर प्रसंगी गॅसचा भडका ही होऊ शकतो आणि जीवही गमवावा लागतो...तर का करावी मुलींची लग्न एवढ्या लहान वयात ? 


    मागे एक दिवस मी गावी गेलो होतो , तेव्हा कळालं की गावातल्या एका चांगल्या कुटुंबातील मुलीचं अगदी लहान वयात लग्न झालं , मला खूप वाईट वाटलं...नंतर काही दिवसांनी मला त्या मुलीचे वडील भेटले मी त्यानं विचारलं " तुम्ही का एवढ्या लवकर तुमच्या मुलीचं लग्न केलं , अजून तर तिची दहावीपण झाली नाही " तर ते म्हणाले... " एकदा की मुलगी वयात आली की लग्न करून टाकावं लागतं नाहीतर मुली पळून जातातं " ....माझ्यातर ही गोष्ट डायरेक्ट डोक्यातच गेली , असे कसे हे आईबाप साधा त्यांचा त्यांच्या मुलींवरही विश्वास नाही , मग मला वाटलं त्या मुली तरी कसा तिच्या आईबापवर विश्वास ठेवला की ज्या मुलाशी तुम्ही माझं लग्न लावताहेत तो मुलगा मला आयुष्यभर सांभाळेनं ? पण नंतर आठवलं संस्कार....आता तुम्हीच विचार करा असे जर पालक असतील तर आपला समाज सुधारेल का ? मला माहितीये इथे काही पालक आक्षेप घेतील पण मी सत्यात अस घडलं आहे...आणि याला मी ही अपवाद आहे असं नाही बरं का ? माझ्या ही आयुष्यत मी अशी एक चूक केली आहे... मी तेव्हा अकरावीत होतो , माझ्या नानांनी माझ्या बहिणीचं म्हणजे धनश्रीचं लग्न आठवीत असतानाच लावलं होतं , पण तेव्हा मी वरती सांगितल तसं काही कारण नव्हतं त्यावेळी समाजचं मुलगी जास्त काळ घरात राहिली तर लगेच नाव ठेवायला लागायचे किंवा मुलीबद्दल काही वाईट मत तयार करायचे त्यामुळे समाज्याच्या सोयीचं म्हणून नानांनी बहिणीचं लग्न लावून दिलं होतं आणि मीही तेव्हा काही बोललो नव्हतो कारण मुलींच्या असण्याबद्दल मी तेव्हा आज एवढा जागृत नव्हतो , आणि खेडूत असल्यामुळे जे आहे ते योग्यचं आहे ही धारण मनात कायमची रुजली होती...पण तिच्या लग्नाचा पच्छाताप आम्हालाच झाला होता , लग्नाच्या काहीच दिवसात ती गरोदर राहील आणि नंतर बाळंतपणाला आली होती पण डिलिव्हरीच्या वेळी खूप त्रास तिला सोसावा लागला अगदी मृत्यूयातना होत होत्या तिला पण देवाचीकृपा म्हणून ती वाचली....आईला तर पोरीची ती अवस्था बघून रडू कोसळत होत पण ती माय पण पुरुषप्रधान संस्कृतीने बांधली होती , लग्नाच्या वेळेस माझ्या आईने नानांना बरंच समजवायचा प्रयत्न केला पण नानांनी काय माघार घेतली नाही , ते त्यांचा निर्णयावर अटील होते , ते जरी बाप असले तरी त्यांना बाप म्हणून विचार करणं समाज्याच्या भीतीने बंद केलं होतं.... काही दिवसांनी धनश्री परत सासरी गेली , तिला स्वतःलाच अजून सांभाळता येत नव्हतं तर आता या मुलीला ही कसं काय सांभाळेनं याची चिंता आईला लागून राहीली होती...परत मुलगी झाल्यामुळे सासरकडून तिचा छळ चालूच होता आम्ही कधी तिच्याकडे गेलोच तर तिच्या डोळ्यातला त्रास मला स्पष्ट जाणवायचा मला माझा नाईलाज होता...आणि अखेर एक दिवशी ती गेल्याचं कळालं तिचा स्वयंपाक करताना गॅसचा भडका होऊन ती त्यात ७५% टक्के भाजली होती , त्या दिवशी मी खूप रडलो होतो माझी एकुलती एक बहीण आम्हाला सोडून गेली होती...आजही तिचा तो मृतदेह आठवून अंगाला आता काटा येतो , तेव्हा वाटत तिने कसं सहन केलं असेल ? मला तेव्हा माझाच खूप राग येत होता , मी मोठा भाऊ म्हणून काहीच करू शकलो नाही...पण आता वेळ गेली होती , शेवटी तिच्या अवघ्या सहा महिन्यांची मुलगी नानांनी त्यांच्याकडे ठेवली होती जी आज माझ्याकडे आहे मनस्विनी... आज ती खूप हुशार आणि समजूतदार पण आहे... नाना आणि आई गेल्यानंतर ती माझ्याकडे इथे शहारात राहायला आली आता तिनं परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे... आम्हाला मुलगी नसल्याने आता आम्हाला तीची खूप सवय झाली आहे , पण माझी स्वतःची ही दोन मुलं नुसती टवाळक्या करत असतात, कधी कधी तर टेन्शन येत मला की यांचं कसं होणार...आता मला मुलगी मी तिच्या सोबत जे घडून गेलं तंस कदापि होऊ देणार नाही... समाज काय आज एका बाजूने बोलेन उद्या परत दुसऱ्याबाजूने बोलायला मोकळा पण निर्णय आपल्यावर आहे कारण एकदा घडून गेलं की परत चूक काही सुधारू पण शकत नाही...नाहीतर आपल्याच पोटच्या लेकराचं आपण शत्रू होतो मग तेव्हा पच्छाताप करण्याचा पण फायदा होत नाही...आता मला या समाज्याच्या दुसरी बाजू पण चांगलीच अवगत झाली आहे...माझी बहिण गेली त्याच्यानंतर पण लोकांनी तिच्या कर्मावर शिंतोडे उडवले होते जे काही खरं होत हे तिलाच माहीत होतं पण समाज्याने आपली बाजू मात्र पक्की केली होती म्हणजे एकाबाजूने नाहीतर दुसऱ्याबाजूने ठरलेच आहे...आणि याची जाणीव सगळ्यांना आहे मात्र करणं समाजमान्यचं आणि इथे कोंडी मात्र आपलीच होते...तेव्हा ही विचार करण्याची बाब आहे आणि बदल घडवण्याची पण....असो


     

     काही वर्षापूर्वी स्त्रीभ्रूणहत्येवर गदा आणली होती , आता ती काही प्रमाणात थांबली आहे...पण तिचा प्रादुर्भाव अजूनही दिसून येतो , एकीकडे स्त्रीभ्रूणहत्या थांबली पण लहान वयात मुलींचे लग्न लावून दिल्यामुळे मुलींना त्यांच्या जबाबदारी जाणीव नसते आणि ती जबाबदारी पेलतांना त्यांची हेळसांड होते आणी कुणाला सांगण्याची पण बंदी असते नाहीतर घरातून जबर वचक आहेच...असंच कधीतरी त्यांचा विहिरीतून पाणी काढतांना , स्वयंपाक करताना किंवा प्रसुतीतिच्यावेळी जीव जातो , तेव्हा मला वाटत एकाबाजूने स्त्रीभ्रूणहत्या थांबते आणि दुसरीकडे लग्न लावून दिल्यावर पुन्हा तीच हत्या होत असते... फरक फक्त एवढाच की ती लहानपणी आणि ही मोठी असतांना...जर चांगला विचार केला तर दोन्ही बाजूने विचार केला तर सारखंच होतं मग ही पण स्त्रीभ्रूणहत्याच आहे की अजून काही...असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा वाटतं जे आहे ते पाहिल्यासारखच आहे मग बदल काय झाला...बालविवाह गुन्हा आहे पण तो फक्त कागदातच का ? वास्तवात मात्र अजूनही जसं आहे तसंच आहे...आता कायदा वास्तवात हवा की कागदात हे सर्वस्वी आपल्यावर आहे...ठरवा मग काय ? 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy