एका सॉरीची किमंत किती ?
एका सॉरीची किमंत किती ?
साधारण सकाळचे आठ वाजले असावेत , मी हॉलमधल्या कोचवर बसून पेपर वाचत होतो...आज घरात कमालीची शांतता होती , कारण आज घरातली ती शांत होती...ती म्हणजे माझी बायको... ती म्हणजे घरातली एक सतत बडबड करणारी धावती ट्रेन...खरंच ट्रेनचं होती ती माझ्यासाठी... पण आज ती ट्रेन सकाळपासून मला दिसलीच नव्हती...कदाचित रुसली असावी माझ्यावर...काल रात्री तिने तिला तिच्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी शॉपिंगला जायचं म्हणे मग मी म्हटलं मग जाना तु मला कशाला विचारतेस ? तर ती म्हणाली तुम्ही पण या माझ्यासोबत...मला माहित होतं हिला शॉपिंग करायची म्हणजे माझी कमीतकमी दोन - तीन तास काही सुटटी नाही आणि शिवाय मला एक पेशंटच्या घरी पण जायचं होतं म्हणून मी तिला तिच्यासोबत येण्यास स्पष्ट नकार दिला... ती मला काही खूप काही बोलली तीच बोलणं स्वाभाविक होत मागच्या वेळेस मी तिला प्रॉमिस केलं होतं... त्यामुळे ती आता मला म्हणाली , पण या वेळेसही तेच उत्तर होतं म्हणून ती माझ्यावर खूपच चिडली होती...बोलून बोलून थकली आणि शेवटी नाक मुरडून झोपून गेली होती मी पण झोपून गेलो...
मी पेपरच्या आडून कोणी येतंय का याचा अंदाज घेत होतो पण काहीच हालचाल होत नव्हती..."आज आपल्याला काय चहा मिळत नाही " मी स्वतःशीच म्हणालो तेवढ्यात , ती चहा घेऊन आली आणि टीपॉय वर ठेवून भर्रकन निघून पण गेली... पण डोळ्यात मात्र खुन्नस पक्की होती... मी पेपरच्या आडून सर्व काही बघत होतो आणि चेहरापण लपवत होतो...मी चहा पिला आणि कप टीपॉय वर ठेवनारचं होतो की , ती दारात शॉपिंगला जायला दारात सज्जचं ! मलातर आश्चर्यचा धक्काच बसला , मला समजलच नाही की , ही आज एवढ्या लवकर तयारचं कशी झाली ? तिच्या डोळ्यात मिश्किल भाव होते...मी मात्र माझी नजर घरात इकडं तिकडं फिरवत तिच्याकडे बघत होतो.... " नव्या मी येते ग , शॉपिंगला चालली आहे तोपर्यंत तु घरावर लक्ष ठेवं " ती बोलत जरी नव्याला होती पण तीचा रोख पूर्ण माझ्याकडेच होता...तिने दारातूनच माझ्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकत आमच्या कार्टीला( म्हणजे आमच्या मुलीला ) सांगितलं आणि घरातून बाहेर पडली , मी तिची पाठमोरी आकृती बघतच राहिलो , काही वेळाने पुन्हा पेपर वाचण्यासाठी कोचवर येऊन बसलो आणि पेपर वाचू लागलो...थोडया वेळात आमची कार्टी बाहेर आली आणि माझ्या समोर हात करून " ह्या घे घराच्या चाव्या , बाहेर गेलास तर शेजारच्या आंटी कडे देऊन टाक आणि हो अजून एक लवकर सॉरी बोलून टाक नाहीतरी तुझं काही खरं नाही आज" ती माझी खेचत होती... " नाही बोलणार जा , तुला काय करायचं " मी निर्भीड होत उत्तर दिलं... " Ok as you wish " ती मला हातवारे करत म्हणाली आणि क्लासला घराच्या बाहेर पडली , तिला माहीत होतं एकदा म्म्मला राग आला म्हणजे लवकर काय जात नाही आणि मग पुढचं तर ठरलच आहे... मी तिच्या म्हणण्यावर विचार करू लागलो , विचार करता करता मला मागचा एक इनसिडंन्स आठवला....
साधारण मागच्या दोन वर्षापूर्वी ची गोष्ट आहे , तेव्हा आम्ही पुण्यात राहायचो...मी एक कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट आहे , माझं पुण्यात एक सेपरेट ऑफिस होतं...माझ्या घरापासून तीन - चार किलोमीटरच्या अंतरावर होतं...आम्ही पुण्यात एका सोसायटी मध्ये रेंट वर फ्लॅट घेऊन राहत होतो , त्याच सोसायटीत एक डॉ. मगर आडनावाचे डॉक्टर राहायचे... त्यांच्याशी माझी चांगली ओळख झाली होती , त्यांचं घर पण आमच्या फ्लॅट जवळच होतं दररोज मॉर्निंग वॉक आमचा सोबतच व्हायचा... नंतर एक वर्षानंतर आम्ही तो फ्लॅट सोडला आणि पुण्यातच एक नवीन फ्लॅट बघितला जो माझ्या ऑफिसच्या काहीच अंतरावर होता आणि डॉक्टरांशी दररोजचा संपर्क तुटला होता परंतु मध्ये कधी कधी फोन व्हायचा... पण भेटल्यावर मिळणारा आनंद काही मिळायचा नाही... नंतर माझं कौन्सिलिंगचं काम चालूच होत...अचानक एक दिवशी त्या डॉक्टरांच्या मिसेसने त्यांच्या मुलीसाठी माझी अपॉयमेंट घेतली आणि माझ्याकडे आल्या... त्यांचा त्या दिवशी बहुतेक चार नंबर होता , मी एक एक करत पेशंट काढले आणी चौथ्या नंबर असलेल्या त्या माय , लेकी माझ्या केबिन मध्ये आल्या...मी त्यांच्या मुलीकडे बघितलं तिचा चेहरा निस्तेज होता , साधारण तेविसच्या आसपास वय असावं तीच... अगदी स्वच्छंदी स्वभावाची ती मुलगी आज प्रचंड मानसिक ताणवाखाली असल्याचं मला जाणवलं , तिचा चेहरा आकसून गेला होता , डोळे खोल गेले होते , डोळ्याखाली डार्क काळे सर्कल तयार झाले होते , कदाचित कित्येक दिवसांची पुरेशी झोपली नसावी एकंदरीत ती तिच्यातच राहिली नव्हती...मी बघितलेली एक वर्षापूर्वीची महिमा ( त्या मुलीच नाव ) आज मला ओळखू सुद्दा येत नव्हती...मी क्षणभर तिच्याकडे बघितलं आणि त्यांना समोरच्या खुर्चीवर बसण्यास सांगितल...त्यांची काही जुजबी विचारपूस केली आणि मग मूळ विषयाला हात घालण्याचं मी ठरवलं...' बोला वहिनी काय झालंय माहीमला ? " मी मिसेस मगरला विचारलं...त्यांनी महिमा सोबत घडलेला सर्व वृतांत अगदी चोख सांगितला , मी ते ऐकून तर अवाक झालो होतो , मला त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता पण तीच वस्तुस्थिती होती...महिमा मात्र अजूनही तिच्यातच गुम होती , जसं तिचा या सर्वांशी काहिच संबंध नाही असं वाटत होतं... बोलतांना त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते मी नजरेनेच त्यांना धीर दिला... आणि माझा मोर्चा महिमा कडे वळवला ती शून्यात नजर लावून बसली होती... " महिमा " मी तिला आवाज दिला... तिची मात्र काहीच रिऍक्शन नव्हती... मी तिला परत एकदा आवाज दिला परंतु , ती अजूनही शून्यात नजर लावून बसली होती... तिच्या आईने तिला गदागदा हलवलं तेव्हा , कुठे तीच लक्ष माझ्याकडे गेलं... " महिमा काय घडलंय बाळा तुझ्यासोबत " मी.... ती एकटक माझ्याकडे बघत होती , आता मला वाटलं की मला माझी स्पेशल ट्रिटमेंट चालु करायला पाहिजे मी स्वतःशीच विचार केला आणि मिसेस मगरला नजरेनेच बाहेर जायला सांगितलं...
मी तिला एक साउंडफ्रुफ दहा दहाबाय दहाच्या रूम मध्ये घेऊन गेलो आणि तिला रूम मधल्या मूविंग चेअरवर बसवलं , मंद प्रकाशाचा लाईट ऑन केला...आता रूम मध्ये निरव शांतता होती ... "महिमा बाळा काय घडलंय तुझ्या सोबत सांग ना हुं ?" मी तिला एकदम हळू आवाज विचारलं... अर्थात मला हे सर्व मिसेस मागरकडून कळलं होतं परंतु , मला हे सर्व तिच्या तोंडुन ऐकायचे होते , जेणेकरुन मला कळालं असतं की , नक्की कशाचा त्रास तिला होतोय....तिचा श्वास वाढायला लागला होता , घाबरल्याचे भाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते , तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते...मी तिला शांत केलं आणि परत एकदा विचारलं आता तिनं बोलणं सुरू केलं...
महिमा - डॉक्टर , मी..…..मी....मी...
मी - हूं बोल बाळ काय झालंय तुझ्यासोबत ? तिनं रडणं सुरू केलं , मी पण तिला रडू दिल नाहीतर ती अशी मोकळीच झाली नसती...
महिमा - डॉक्टर , मी तेव्हा नुकतचं इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलं होतं...कॉलेज , घर, अभ्यास सगळं एकदम व्यवस्थित सुरू झालं होतं , हळू हळू दिवस निघून जात होते , मी पण कॉलेज लाईफची मजा घेत होते...आमचं फर्स्ट सेमिस्टर झालं नंतर काही हॉलिडेज भेटल्या आणि पुन्हा नेक्स्ट सेमिस्टर चालू झालं मला फर्स्ट सेमिस्टर मध्ये चांगले मार्क्स मिळाले होते म्हणून आम्ही मैत्रिणी पार्टी करण्यासाठी कँटीन मध्ये गेलो होतो , तेव्हा मला कोणीतरी चोरून बघतय असं मला वाटलं म्हणून मी माझ्याआजूबाजुला बघितलं तर कॅन्टीनच्या कोपऱ्यात बसून एक मुलगा एकटक माझ्याकडे बघत असल्याच मला दिसला , माझ्याकडे बघून स्माईल करत होता मी एक स्माईल करून प्रतिसाद दिला नंतर काही वेळ तो माझ्याकडेच बघत होता....कदाचित त्याला मी आवडत असावी असं मला वाटलं , नंतर मला पण तो आवडायला लागला होता नंतर जेव्हा पण आमची कधी योगयोगाने भेट व्हायची तेव्हा आमही नजरेनेच संवाद साधायचो हळूहळू आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करायला लागलो होतो...अश्यातच व्हॅलेन्टाईन डे आला अन त्याने मला प्रपोज केलं मी पण ते एक्सेप्ट केलं आणि मग नंतर आमच्यात एक नात निर्माण झालं...आम्हला दोघांनाही एकमेकांची ओढ लागली कॉलेज मध्ये पूर्ण वेळ मी त्याबाबसोबत असायची... आमचे हळू हळू स्वभाव जुळत होते दोघेही एकमेकांना जाणून घेत होतो आमच्यातील छोटे छोटे क्षण पण आम्ही जगत होतो एकमेकांना वेळ देत होतो आता कॉलेजमध्ये एक परफेक्ट कपल म्हणून आमची चर्चा वाढली होती... सुट्टी असली तरी दिवसातून किमान दोन वेळा तरी आमचा फोन व्हायचा , नाहीतर मेसेजेस तरी चालू असायचेचं...एक एक वर्ष हळूहळू पास होत होतं होत...लेक्चर बंक करून कधी कधी आम्ही लाँग ड्राईव्ह ला पण जायचो आयुष्यातला प्रत्येक क्षण आम्ही मनमुराद एन्जॉय करत होतो अश्यातच आमची दोन वर्षे कम्प्लिट झाले आता शेवटचं वर्ष राहील होत आता अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचं होत... या दोन वर्षात आम्ही खूप क्लोज आलो होतो , आता ग्रुप स्टडी वाढला होता , आम्हाला आता कमी वेळ मिळत होता पण दिवसातून एकदातरी भेट नक्कीच होत होती आता सेकंड लास्ट सेमिस्टर पण झालं आणि ग्रुपने ट्रेकिंग ला जाण्याचे ठरवले... दोन दिवसांनी आम्ही सहा जण ट्रेकिंगला गेलो....दिवस भर फिरून आम्ही बुक केलेल्या रिसॉर्ट मध्ये गेलो , मी आणि तो सगळ्यात पुढे हातात घालून चालत होतो म्हणून आम्ही दोघेच लवकर रिसॉर्ट वर पोहचलो त्यावेळी संध्याकाळचे पाच - सहा वाजले असावेत... आमचा ग्रुप अजूनही आला नव्हता आता त्या रूम मध्ये फक्त मी आणि तोच होते... त्याने त्याचे ते घामाने भिजलेले कपडे माझ्या कडे पाठ करून माझ्या समोरच चेंज केले आणि मागे वळला मी लाजत मान खाली करून उभी होते ,हळू हळू तो माझ्या जवळ आला आणि माझी हनुवटी त्याने त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याने वरती केली , मला क्षणभर बघून त्याने त्याच्या मिठीत घेतलं... मी त्याच्या त्या स्पर्शाने रोम रोम शहरले काहीवेळ आम्ही तसेच होतो... नंतर त्याने मला थोडं दूर केलं आणि माझा चेहरा हातात घेऊन माझ्या ओठांकडे कूच करू लागला...मी हळू त्याच्या पासून दूर जायचा प्रयत्न करत होते , मी त्याला या पुढे जाण्यासाठी नाही म्हणत होते पण तो काही ऐकत नव्हता आणि तो मला अजून जवळ ओढत होता माझं मन मला हे करण्यापासू रोखत होत पण बुद्धि साथ देत होत मला या दोन्हीत कोणाचं ऐकावं समजत नव्हत. मी आता रूमच्या एका भिंतीला येऊन थटले होते...अखेर बुद्धी पुढे मन जिंकलं आणि मी त्याला नाही नाही म्हणत होते पण तो काही ऐकत नव्हता...मग मात्र माझा नाईलाज झाला आणि मी त्याला माझ्यापासून जोराचा धक्का दिला आणि तो सरळ जाऊन बेडच्या एका कोपर्याला जाऊन पडला कदाचित त्याच्या हाताला जोराचा मार बसला असावा...तो जोरात विव्हळला मी माझ्या चेहऱ्यावर हात ठेवले होते... तो कसा तरी उठला आणि माझ्यावर चिडला , मला खूप बोलला. मी सॉरी म्हणतं होते पण त्याला फक्त त्याचंच महत्वाचं होत , पण इथे मी तरी काय करणार होते माझं मन मला अनैतिक गोष्ट करण्यास नकार देत होत...नंतर काही वेळ मला खूप काही बोलला आणि बाहेर निघून गेला , मी तशीच बेड बसून राहिले तो परत काही आलाच नाही अन मी पण त्याच्या कडे गेले नाही...दुसऱ्या दिवशी सकाळी मला दिसलाच नाही नंतर काही वेळाने जेव्हा आम्ही घर जाण्यासाठी निघालो तेव्हा तो मला दिसला मला वाटलं तो मला सॉरी म्हणेल पण त्याने नंतर माझ्याकडे साधं पाहिलही नाही आम्ही तसंच घरी आलो...दुसऱ्या दिवशी मी जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा मी त्याच्या कडे गेले तेव्हा तो म्हणाला मला आपल्या ग्रुप समोर सॉरी म्हण मी त्याला नकार दिला...तर त्याने मागचा पुढचा विचार न करता डायरेक्ट नाहीतर ब्रेकअप कर म्हणाला...मी त्याला म्हणाले मी तुला इथं सॉरी म्हणते पण पूर्ण ग्रुप समोर नको ना... "हे बघ जर तुला ब्रेकअप नको असेल तर मला त्यांच्यासमोर सॉरी म्हण " तो..." अरे पण का , मी इथं म्हणतेय ना " मी...कारण काल त्यांनी माझ्या इगोवर बोट ठेवलं , मला त्यांना दाखवायचयं की मी पण काही कमी नाही " तो...आता मला त्याचा राग आला त्याच्या इगोसाठी तो मला आमच्या पूर्ण ग्रुप समोर सॉरी म्हणायला लावत होता , आणि माझं काय ? मी त्याला नाही म्हणाले आणि तिथून निघून गेले , मला त्याच्या या बोलण्याचा खूप राग आला होता आणि तिथेच आमचं ब्रेकअप झालं...नंतर त्याने दुसऱ्या मुलीसोबत रिलेशन जोडलं , मला त्यांना दोघांना एकत्र पाहून खूप वाईट वाटू लागलं आणि त्याचा अजूनच राग येऊ लागला , या सर्वाचा विचार करून करून मी हळू हळू डिप्रेशन मध्ये जाऊ लागले , माझं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं गेलं आणि रात्री झोपेसाठी झोप येण्याच्या गोळ्या घेऊ लागले....नंतर माझं कॉलेजला जाणं बंद झालं , मला सतत त्याच्या सोबत असल्याचे भास होऊ लागले आणि एक दिवस ते आईने पाहिलं , मला आईला सर्व खरं खरं सांगावा लागलं ,या सर्वांत माझं इंजेनेरिंगचं लास्ट इयर वाया गेलं.......
एवढं बोलून ती ढसाढसा रडायला लागली मधेच बऱ्याच ठिकाणी तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते , पण जेव्हा तिने तो सॉरीचा इंसिडन्स सांगितला तेव्हा तिच्या डोळ्यात अंगार दाटून आला होता , आणि मला लगेच क्लिक झालं की प्रॉब्लेम नक्की इथेच आहे आणि मी तिला त्या प्रॉब्लेम वरच सोल्युशन म्हणून काही ट्रीटमेंट घ्यायला लावली....तो सॉरी बोलण्याचा इंसिडन्स तिच्या जिव्हारी लागला होता , त्याचा इगो दुखावला म्हणून तिनं का सगळ्यांसमोर त्याला सॉरी म्हणावं अस तिला वाटलं असेल परंतु हा खरंच एक महत्वाचा मुद्दा आहे , आपल्या जीवनात सॉरी या शब्दला महत्व आहे की नाही ? आज आपल्याकडून बऱ्याच छोट्या मोठया चुका होतात , प्रत्येकालाच आपण सॉरी म्हणतो पण या सॉरी शब्दाचं महत्त्व आपल्या जीवनात किती आहे ? का फक्त जस्ट फॉर्मलिटी म्हणून आपण सॉरी म्हणतो....जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रत्येक चुकी साठी सॉरी म्हणतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला गृहीत धरायला लागते आपल्या कडून होणाऱ्या प्रत्येक चुकीसाठी तिला आपल्या कडून सॉरी या शब्दाची अपेक्षा असतेच... पण ही अपेक्षा लावत कोण ? आपणनचं ना , आपल्यालेखी सॉरी या शब्दाची किंमत नगण्य आहे अस मला या अगोदर वाटत होतं...जेव्हा आपण एखाद्या अनोळखी माणसाला सॉरी म्हणतो तेव्हा आपल्याला याची किंमत नसते पण , जेव्हा तेच सॉरी आपल्याजवळच्या माणसांना आपल्याला म्हणावं लागत ना तेव्हाच खरी सॉरीची किंमत कळते अर्थात सॉरीची किंमत परिस्थितीवर अवलंबून असते....काही जणांचे इथं मतांतरे असतील पण खरंच तुम्हीच ठरवा आता एका सॉरी ची किंमत तुमच्या लेखी किती आहे , इथं फक्त सॉरीची किंमत कथित केली आहे पण प्रत्येक शब्दाची किंमत आपण जाणून असावी अन्यथा तोटा आपलाच आहे , मला तर सॉरी ची किंमत चांगलीच कळली आहे आणि नक्कीच तुम्हाला पण कळली असेल ........बघा पटतंय का ??
