प्रसववेदना
प्रसववेदना


प्रसववेदनेने त्रासलेली प्रभा दवाखान्यातच चकरा मारत होती. वेदना असह्य होऊन डॉक्टरांच्या विनवण्या करू लागली. डॉक्टर म्हटले तुझी प्रसुती नैसर्गिकरीत्या करणे अशक्य वाटतंय. शहरातील मोठ्या दवाखान्यात जाऊन सिजर करावे लागेल. हे ऐकून प्रभा व तिची आई सुन्न झाली. हातात मोजके पैसे घेवून तशाच रिक्षेत बसल्या व प्रभा वेदना सहन करू शकत नव्हती आता तर ती रडू लागली. एक छोटी झोपडी समोर दिसताच रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली व तेथील म्हातारीला विनंती केली. प्रभा आणि तिची आई आत गेल्या. काही वेळातच बाळाचा रडण्याचा आवाज आला. आईने बाहेर येऊन रिक्षाचालकाचे व देवाचे आभार मानले.