कणा
कणा


मध्यरात्री आलेल्या वादळाने सारे गाव अस्ताव्यस्त झाले होते. कुणाचा आक्रोश, तर कुणाच्या किंचाळ्यांनी संपूर्ण आसमंत निनादला होता. साऱ्यांची धावपळ चालू होती. कुणी घाबरून पळत होते, तर कुणी आता काहीच उरले नाही समजून दुसरा ठिकाणा शोधण्यासाठी धावत होते.
परंतु या गोंधळात एकटा रामू मोडलेल्या घराचा कणा बनून घराची डागडुजी करण्यात व्यस्त होता.