शिडी
शिडी


रामू व दामू दोघांत घनिष्ठ मैत्री होती. परंतु दोघांचा विचार करण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा होता. त्या दोघांत एकदा शिडीवरून छोटे भांडण झाले, व दोघे आपापल्या मतावर ठाम होते. रामूचे म्हणणे होते कि शिडी चढण्यासाठीच बनवली जाते तर दामू त्याच्या मतावर ठाम होताकी, शिडी उतरण्यासाठीच बनवली जाते. बघायला गेले तर दोघांचे मत बरोबर होते, पण चढण्याचा दृष्टीकोन सकारात्मकता दर्शवते व उंची धेय्य दर्शवते तर उतरण्याचा दृष्टीकोन नकारात्मकता दर्शवते व नैराश्य दर्शवते. म्हणून म्हणतात ना! "जशी दृष्टी तशी सृष्टी!"