स्त्रियांनी घर संसारास प्राधान्य द्यावे
स्त्रियांनी घर संसारास प्राधान्य द्यावे


सावित्रीबाई फुले यांनी स्त्री - शिक्षणाची ज्योत पेटवली. ज्योतीबांची स्वप्ने साकार केली. म्हणून आज स्त्रिया अनेक क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. सर्व जबाबदाऱ्या हिरीरीने पार पाडत आहेत. म्हणून माझा या सर्व स्त्रीयांना मानाचा मुजरा.
शिक्षणाने स्त्रिया सुशिक्षित झाल्या आहेत. नोकरी, व्यापार व्यवसाय करून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करून जबाबदारी पार पाडत आहेत. ही जबाबदारी पूर्ण करत असतांना घर ही व्यवस्थित सांभाळत आहेत.
मला असे वाटते की स्त्रियांनी सर्व जबाबदारी पार पाडतांना घर संसारास प्राधान्य द्यावे कारण आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या घरासाठी व्हावा. व आपण नोकरीसाठी आपणास बाहेर पडावे लागते व त्यामुळे जगाचे व्यवहार ज्ञान आपणास मिळते, त्याचा उपयोग आपल्या घर संसारासाठी करणे गरजेचे आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणे, सर्वांना जोडून ठेवणे, घरात
ील प्रत्येक व्यक्तीची शारीरिक, मानसिक स्थिती समजून घेवून योग्य ती उपाययोजना करणे. यास प्राधान्य देता यायला हवे. घरात सकारात्मक विचार विनिमय करता यायला हवा. मुलांसाठी वेळ देवून त्यांच्यावर
योग्य ते सवयी व संस्कार करता यायला हवे. मुले हीच आपली खरी संपत्ती आहे व त्यांची जतन करणे जास्त गरजेचे आहे. नातेवाईक, सगेसोयरे, मित्रमंडळ यांचे जतन करणे त्यांच्या मदतीस धावणे. वेळात वेळ काढून सुख दुखात एकत्र येणे गरजेचे आहे यामुळे आपण तर आनंदी रहातोच परंतु मुलांवर ही संस्कार होतात.
आपली नोकरी, व्यापार, व्यवसाय हे अर्थाजन व आपल्यातील कौशल्य व कसब जरी लागते तरी हे सगळे यश मिळवणे व त्याचा आनंद उपभोगण्यासाठी परीवाराचा सहभाग महत्त्वाचा वाटतो. आपण सगळी खटाटोप परीवारासाठी करत असतो. आपल्या यशाचे परीवारातील प्रत्येक व्यक्ती भागीदार असतात. त्यामुळे आपण आपल्या घरसंसारास प्राधान्य गरजेचे आहे. धन्यवाद.