संमती
संमती


यश त्याच्या आयुष्यात यशस्वी ठरला होता. आणि आता त्याला मोठ्या शहरात कामानिमित्त जाणे भाग होते. खरतर आईला खूप आनंद झाला होता परंतु काळजीने तीचे मन त्याच्या निर्णयाच्या आड येवू पहात होते. बाबांनी हे हेरले आणि आज आईला फिरायला घेवून गेले. स्वछंद उडणाऱ्या पक्षींना पाहून बाबा म्हणाले," हे पक्षी बघ आपल्या पिलांना उडता यायला लागले की या आकाशात पाठवून देतात, मग आपल्या सक्षम मुलांना आपण का थांबवून ठेवायचे?" आई तीआईच, तीच्या डोळ्यात अश्रू दाटले, तीला उमगले. घरी आल्यावर आईने यशला जायला संमती दिली.