क्षणिक आनंद
क्षणिक आनंद


फुलपाखरू स्वछंदीपणे फुलांभोवती उडत होते. रंगेबीरंगी फुलांचा सुंदरसा परिमळ त्याला पुन्हा पुन्हा आकर्षित करत होता. तेव्हा तिथे कोळी किड्याने रेखाटलेल्या जाळ्यात ते अचानक अटकले. खूप प्रयत्न केल्यावरही शेवटी त्याला तेथून निघता आले नाही. व ते तेथेच मेले.
हवेने जाळे उडायचे व त्यामुळे त्यातील उडकलेले फुलपाखरू ही उडू लागे. त्या मेलेल्या फुलपाखराला उडतांना पाहिल्यावर इतर फुलपाखरे त्याच्या अवतीभवती पिंगा घालत जणू ते जिवंतच आहे. अन् अचानक जाळे तुटले फुलपाखराचे पंख खाली गळाले. पण जाता जाता क्षणिक आनंद मित्रांना देऊन गेले.