मनकवडा
मनकवडा


घरात बाहेर राब राबराबणारी श्रेया, अगदी आत्ताच आवरून सोप्यावर बसली, विचार करत की, आता हवा होता एक कप भर गरम चहा. स्वतःशीच हसली आणि थकव्याने क्षणार्धात डोळे लागले. आणि अचानक तिला वेलची अदरकच्या वासाने जाग आली तेव्हा बघते तर काय तिच्या ह्यांनी तिच्या साठी आणलेला वाफाळलेला चहा तो ही बिस्कीटस सोबतती हसली आणि म्हणाली तुम्हाला नेहमीच कसं माझ्या मनातलं कळतं हो!