शिकणे महत्त्वाचे
शिकणे महत्त्वाचे


ती अस्वस्थ होती, बैचेनही जराशी, कदाचित कुणीतरी हटकले होते तिला. प्रश्नचिन्ह केला होता तिच्या मागील दोन वर्षांच्या काळात आलेल्या स्थैऱ्यासाठी.
ती विचार करू लागली, काल वाचलेल्या वर्तमान पत्रातला सुविचार तिला आठवला, प्रत्येक क्षण आपणास काही ना काही शिकवत असतो. मग माझे मागिल दोन वर्षे व्यर्थ कसे जातील. मी बाहेरचे जग नसेल शिकले परंतु घरातील कामे करायला व माणसे वाचायला नक्की शिकले. शेवटी शिकणे महत्त्वाचे.