ध्यान
ध्यान


माझी सतत होणारी चिडचिड, संताप, स्वतःलाच त्रासदायक वाटू लागला. का होतंय असे कळत नव्गहते. अवतीभवती घडणाऱ्या घटना तशा नवीन नव्हत्या माझ्यासाठी. मग का? असा विचार मनात येताच, डोळे बंद करून स्वतः शीच संवाद साधू लागले. बोलता बोलता ध्यानमग्न झाले आणि हळूहळू मनातील तगमग शांत होवू लागली.