प्रेमाविषयी थोड
प्रेमाविषयी थोड
कोण म्हणत प्रेम एकदाच होते,खोटं बोलतात ते सांगणारे की प्रेम एकदाच होत. त्यांना नसेल मिळाले प्रेम करणारे भाऊ बहिण, समजून घेणारे नातेवाईक,साथ देणारे मित्र....
प्रेम हे वारंवार होत असते, पाउलो पाऊली प्रेमाचे ठसे उमटत असतात, फक्त ते पहायची मनात जिज्ञासा असणे गरजेचे आहे.ज्याप्रमाणे जागोजागी धक्का देणारा, घात करणारे लोक असतात,त्याचप्रमाणे प्रेमाने साथ देणारे समजून घेणारेही मिळतात. कधीतरी ते उशिरा मिळतात किंवा आपण त्यांना ओळखू शकत नाही असे ही होते. पण माणसाचा स्वभाव आहे एखाद्याने वाईट केले की तो सर्वावर चा विश्वास कमी करायला लागतो.प्रत्येकाला संशयाने पाहतो,आणि
मनातील रागाची भावना जोर धरू लागते. एक नवजात बालक जन्माला येतो त्यावेळेपासून ते प्रथम आईवडील,भौबहिन, आजी-आजोबा, नंतर मित्र मैत्रिणी, कॉलेज मध्ये गेल्यावर तरुण वयात नवीन मित्रांचा ग्रुप तयार करतो, ऑफिस मध्ये,लग्नानंतर सासर च्या प्रेमातील नाजूकता सांभाळतो,या प्रत्येक नात्यात, त्याच्या वागणुकीतून प्रेमाचे भावना दिसून येते, म्हणून तर व्यक्ती ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी आपली एक नवीन ओळख निर्माण करतो.
यावरून तो जीवनातील प्रत्येक वळणावर एक नवीन नात निर्माण करताना त्याच्या मनात त्या नात्या बद्दल एक आदर आणि प्रेमाची भावना दिसून येतो. तरीही व्यक्ती एकदाच खरे प्रेम करतो असं का बर म्हणतात.