होलिका दहन
होलिका दहन
होळी 2025 : हा भारतातील एक प्रमुख सण आहे. होळी म्हणजे रंग, आनंद आणि भक्ती यांचे अतूट बंधन असल्याचे दिसून येते . रंगपंचमीच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते, त्यास 'छोटी होळी' किंवा ‘होळी पूजन' असेही म्हणतात.
होलिका दहनाची पौराणिक कथा :
होलिका नावाच्या राक्षणी सोबत जी हिरण्यकश्यपची बहीण होती हिरण्यकश्यप, त्याचा पुत्र प्रल्हाद यांची कथा जोडलेली आहे. हिरण्यकश्यप हा असुरराजा होता, जो स्वतःला देव समजत असे आणि त्याने त्याच्या राज्यात विष्णूभक्तीवर बंदी घातली होती. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा परम विष्णूभक्त होता. हिरण्यकश्यपने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेस त्यास अपयश आले. तरीही प्रल्हाद ने विश्र्नुभक्ती सोडली नाही. शेवटी त्याने त्याची बहीण होलिकासोबत प्रल्हादला जाळण्याचा आदेश दिला. होलिकाला अग्नीपासून बचाव करणारे वरदानप्राप्त वस्त्र मिळाले होते. ती प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बसली, पण विष्णूच्या कृपेने प्रल्हाद बचावला आणि होलिका जळून भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहनाचा सण साजरा करण्याची प्रथा प्रचलित आहे. वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणजे होळी सण समजला जातो. होलिका दहन म्हणजे नकारात्मकता, अहंकार आणि वाईट विचारांचे दहन करून नवे, सकारात्मक जीवन सुरू करण्याचे प्रतीक देखील मानले जाते.
पूजा करण्याची पद्धत :
* स्वच्छ जागेवर होलीकेची स्थापना करावी.
* होळी तयार करण्यासाठी लाकूड गवत गवत गव्याच्या उंब्या आणि शेणापासून तयार केलेले शेकोट्या या इत्यादीचा वापर करावा. त्यासमोर रांगोळी काढावे.
होलिका पूजा साहित्य :
होलिका पूजेसाठी लागणारे साहित्य मध्ये गंध हळद कुंकू फुले गूळ नारळ अक्षदा सुपारी वाद वडीकेचा प्रसाद आणि नैवेद्य अशा प्रकारचे साहित्य लागते.
पूजेचा विधी :
होली का पूजेचा वेळ ही संध्याकाळी शुभ मुहूर्तावर केली जाते. यामध्ये आधी गणपती पूजन केले जाते
तत्पश्चात होलीकेला हळद कुंकू फुले वाहून प्रदक्षिणा घालावी. आणि नैवेद्य दाखवावे.
होलिका लग्नाच्या शुभमुहूर्त :
होलीका पूजन करण्याची वेळ मुहूर्त हा संध्याकाळी असतो आणि वेळे पंचांग पाहून ठरविले जाते.
होळी पूजनाचे महत्त्व आणि लाभ :
होळी पूजन आणि जीवनातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रधान होते.
होळीच्या अग्नीत अर्पण करण्यात येणारे गहू हरभरे आणि औषधी पदार्थ हवेत शुद्धता निर्माण करण्याचे कार्य करतात.
होळी हा लोकांना एकत्रित आणण्याचा सण आहे त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक बांधिलकी जपल्या जाते आणि रंगपंचमी साजरी करताना आनंद उत्साह साजरा केला जातो.
असे मानले जाते की मुलीचे पूजन केल्याने बाबांचा नाश होऊन ईश्वराची कृपा प्राप्त होते आणि जीवन प्रगतशी राहते.
होळीचे अन्नपदार्थ धान्य टाकले जाते त्यामुळे ते दिवस प्राप्त होऊन चांगले पीक आणि समृद्धी मिळते.
होळी हा केवळ रंगाचा सण नसून तो भक्ती आणि सकारात्मक आणि आनंदाचे प्रतीक आहे. होळीचा दहन म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाची शिकवण देणारा सण आहे. त्यामुळे हा सण उत्साहाने साजरा केला जातो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांतता प्राप्त व्हावी अशी प्रार्थना केली जाते.
