वागणूक
वागणूक
जगात चांगली व वाईट दोन्ही प्रकारची माणसे असतात. आपल्याला कुणी वाईट बोलून दाखवले तरी त्याला मोठ्या मनाने माफ करावे. त्याने केलेल्या वागणुकीबद्दल मनातील विचार काढून टाकावा.त्यामुळे आपले मनही हलके रहाते. मेंदूत त्रास देणा-या गोष्टी ठेवु नये. कालांतराने आपल्याला ज्या व्यक्तीने त्रास दिला त्यालाही एक दिवस पश्चाताप होइल. आपण दुस-यांना त्रास देऊ नये. होईल त्याप्रमाणे मदत करण्याचा प्रयत्न करावा. सर्व समभाव समानता ठेवावी भेदभाव करू नये. एखादा आपल्याला फसवतअसेल तर त्याची समजून काढण्याचा प्रयत्न करावा त्याच्यामुळे थोडे फार नुकसान झाले असेल तर सहन करावे. व्यसनमुक्त जिवन व्यतीत करावे . रामदासस्वामी म्हणत त्याप्रमाणे दिजामाजी जे काहीतरी लिहावे.
