आशा -अपेक्षा
आशा -अपेक्षा
अशा आणि अपेक्षा जीवनात जेवढ्या जास्त असतात.तेवढे माणसाचे जीवन हे कष्टदायी होते.जेव्हढे साधे राहणीमान आणि जेवढ्या जीवनाकडे आशा, अपेक्षा कमी असतील तेवढे जिवन हे सकारात्मक आणि समाधानी राहते. हे अगदी सत्य असेल तरी या विचारांवर विश्वास ठेवणारा कधीही या गोष्टीचा अवलंब करत नाही. जिवन जगताना नकळत माणूस हा कोणाकडून अशा करतोच आणि अपेक्षा, ही ठेवतोच जर ती पूर्ण नाही आली तर निराशेला बळी पडतो हे सत्य स्थिती आहे.
