घटस्फोट
घटस्फोट
काय आहे घटस्फोट कशाची होते ताटातूट. पती पत्नी ची,दोन परिवाराची,की त्यांनी रंगवलेल्या स्वप्नाची, स्वप्नासाठी केलेल्या धावपळीचा. त्याहीपेक्षा होती त्या चिमुरड्या जीवांचा होतो घटस्फोट. पती पत्नी विभक्त होऊन त्यांचे जीवन सुरळीत जगण्यासाठी धावपळ करू शकतात. दोघेही पूर्ववत आयुष्य विभक्त होऊन जगू शकतील.पण ती त्यांची मुलं कोण एका जवळ आनंदाने फुलून राहू शकत नाहीत.कितीही प्रयत्न केले तरीही आई ची जागा बाबा आणि बाबांची पूर्तता आई करू शकत नाही. बाकी सगळी काळजी घेतल्या जाऊ शकते पण मुलांचे घटस्फोटापासून झालेले नुकसान,हरवलेले निरागस बालपण कधीही भरून निघणार नाही. ही वेळ कोणाच्याही जीवनात येऊ नये. जीवनात नाती एक महत्त्वाचा दुवा आहे जो प्रेम,काळजी नि विश्वासावर टिकलेला असतो. एका निस्वार्थ प्रेम केले म्हणजे दुसरा हा काळजी करायला सुरवात करतो आणि त्यामुळे दोघांमध्ये विश्वास निर्माण होते. यासगल्यांमुळे एकी निर्माण होऊन कधीही वेगळे होण्याची वेळ कदाचित कोणाच्याही जीवनात येणार नाही. पण हे सगळे बोलायला आणि वाचायला जेव्हढे सोपे आणि छान वाटते, तेवढेच अवलंब करायला कठीण वाटते.पण नवीन स्वप्न घेऊन जेव्हा आयुष्याची सुरुवात केली जाते त्याच वेळी ही काळजी जर घेतल्या गेली तर दोघांना वेगळे होण्याची वेळ येणार नाही. आणि मुलांनाही त्यांचे बालपण गमवावे लागणार नाही. पती पत्नी ने जीवनात समजूतदार जोपासायला हवा. त्यामुळे सुखी संसार चे स्वप्न साकार होऊ शकते.
