मोबाईल चा दुष्परिणाम
मोबाईल चा दुष्परिणाम
मोबाईल फोनचा जास्त वापर केल्याने आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात,मोबाईल चा अतिवापर म्हणजे आजारांना निमंत्रण असेही आपण म्हणी शकतो.
डोळे कोरडे होणे, डोकेदुखी, अस्पष्ट दृष्टी येणे, डोळ्यात वारंवार पाणी येणे, डिजिटल आय सिंड्रोम होणे,
झोपेवर परिणाम होतो
मानसिक आरोग्यावर परिणाम होणे
ब्लड प्रेशरचा धोका वाढणे
शरीरात ट्यूमर होण्याची शक्यता
मोबाईल फोन आणि त्यांच्या टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरींमुळे हे दुष्परिणाम होतात.अजून काही मोबाईल फोन वापरण्यामुळे होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे :
स्क्रीनवरील निळा प्रकाश मेलाटोनिनची निर्मिती दडपतो, त्यामुळे झोप लागणे कठीण होते.
मुंबईमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, जे लोक ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल फोन वापरतात त्यांना ब्लड प्रेशरचा धोका फार जास्त असतो.
मोबाईल फोनकडे दीर्घकाळ पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो.
अशा विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण या मोबाईल मुळे दिले जाते.म्हणून होईल तितका कमी वापर मोबाईलचा करावा.जेणेकरून आरोग्यावर परिणाम होणार नाही.
