STORYMIRROR

Varsha Gavande

Inspirational Others

4  

Varsha Gavande

Inspirational Others

मातृभाषा

मातृभाषा

8 mins
368

         नमस्कार🙏 वाचक मित्रांनो, आपण महाराष्ट्रीय आहोत. त्याचा आपल्याला अभिमान आहे. कारण या महाराष्ट्राने रहीवासियांना खूप काही दिले आहे. जसे, हिरवा निसर्ग. आता तुम्ही म्हणणार हा पृथ्वीवर चोहिकडे आहे. त्यात काय मोठ. बरोबर आहे पण महाराष्ट्रात जो निसर्ग आहे तो नजर वेधुन टाकण्यापलिकडाचा आहे. तुम्हाला माहित असेलच, यामध्ये आयुर्वेदिक औषधालय दडलेले आहे. जे प्रत्येक ठिकाणी उपलब्ध नाही. फक्त गरज आहे ती त्याच्या योग्य प्रकारे समजून घेणाऱ्यांची. संतांचे माहेर घर आहे महाराष्ट्र. या संतांनी संस्कृत सोबत मराठीचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला आहे.त्यासाठी मोठी सामाजिक आणि अध्यात्मिक साहित्य निर्मिती केलेली आहे.

        मराठी या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा, सभ्यतेचा आणि संस्कृतीचा आधारस्तंभ राहिल. 


        भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. ह्या देशाला अतुलनीय अशा अनेक परंपरा आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या धर्माचे लोक इथे वास्तव करताना आपल्या लक्षात येते. अनेक बोलीभाषा असणारा हा महान देश. येथे दर ५ मैलावर लोकांचे राहणीमान आणि भाषा बदलते.म्हणजे अनेकतेत एकता जपणारा देश म्हणजे भारत होय.


        भारतात जवळपास १२२२ बोलीभाषा आहेत. त्यातील २३४ या मातृभाषा आहेत. प्रत्येकाला आपल्या धर्माचा, आईवडिलांचा जसा अभिमान असतो, तसाच आपल्या भाषेचाही असावा आणि तो असायलाच हवा. आपण ज्या मातीत जन्माला येतो. जिथे आपल्यावर संस्कार घडवले जातात त्यासोबत एकरूप असणे गरजेचे असते. ज्या भाषेने आपण आपल्या जीवनाची सुरवात करतो. त्या भाषेला दुय्यम स्थान कसे काय असू शकते. आपल्या जीवनात आपल्याला दुय्यम स्थान जर मिळाले तर किती त्रास होतो. ती तर आपल्या इतिहासाची, संस्कृतीची जनजननी आपली मातृभाषा आहे.

      

       मराठी भाषा ही भारताच्या 22 अधिकृत भाषांपैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवातही मराठी भाषा बोलली जाते. भारतात मराठी भाषकांची संख्या जवळपास 14 कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी भाषा ही भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. 1 मे हा महाराष्ट्र दिन तसेच मराठी राजभाषा दीन म्हणून ही साजरा केला जातो आणि 27 फेब्रू हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. 

      1964 साली वसंतराव नाईक यांच्या सरकारने मराठी राजभाषा अधिनियम 1964 सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केला आणि मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. मराठी भाषा नसून ही आपली संस्कृती आहे. इतर भाषेच्या तुलनेत मराठी भाषेमध्ये साहित्य उपलब्ध आहे. धार्मिक पौराणिक, ऐतिहासिक, राजकीय क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात मराठी भाषेचे योगदान आहे. त्यामुळे या भाषेला एक जागतिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशात भाषेनुसार प्रांतरचना आहे, याच विभागणीतून आपल्या मराठी भाषा बोलल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. मराठीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्राची स्थापना आवश्यक ही होती आणि तो उद्देश आणि त्याचे उपाय योजना कुठेतरी कमी पडलेल्या आहेत. म्हणूनच मराठी भाषेचा अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झालेला नाही.


       भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. ते चुकीचे नाही जेव्हढे आपल्याला नवीन शिकता येईल तेवढे शिकावे. मग ती भाषा असो की आणखी काही. वेगवेगळ्या लोकांसोबत व्यवहार करताना वेगवेगळे भाषा येणे गरजेचे आहे. पण हे व्यावहारिक उपयोगासाठी योग्य आहे. त्यासाठी आपण आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान देणे कितपत योग्य आहे. महाराष्ट्र सोडून कोणत्याही राज्यात गेले किंवा बाह्य राज्याचा रहिवाशी, असेल तर तो कधीही त्याची भाषा सोडून मराठीला प्राधान्य देणार नाही. जसे आपण करतो. समोरच्याला छान वाटावे म्हणून आपण त्याच्यासोबत त्याची भाषा बोलतो. त्याच भाषेला जीवनात महत्वाचे स्थान देणे सुरू करतो.पण तीच व्यक्ती आपली मातृभाषा शिकण्याचा साधा प्रयत्नही करत नाही. असे का व्हावे? कारण आपणच आपल्या मातृभाषेला दुय्यम स्थान दिलेले असते.


        इतर राज्यात त्यांच्या मातृभाषेचा अभिमान हा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. आपण महाराष्ट्रतील रहिवासी कुठेतरी कमी पडतोय. महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहणारे मराठी लोक तर एकमेकांशी हिंदीमध्ये संवाद साधताना स्वतःला शिक्षित समजतात. त्याशिवाय मराठी बोलताना त्यांना स्वतःचा आणि भाषेचा कमीपणा वाटतो. जिथे हिंदी भाषा साथ देत नाही तिथं इंग्रजी भाषेची मदत घेतात . इंग्रजी ही परकीय भाषा आहे. तिलाही आपल्या देशात संवाद साधण्यासाठी उत्तम भाषा समजली जाते. आपण त्या भाषेला एवढ महत्व देतो की एखाद्याला जर येत नसेल, तर त्याने काही गुन्हा केलाय की फारच गावठी असल्याची त्याला वागणूक दिली जाते. आपण फक्त "आले ताटात तर घ्यावे पोटात" याप्रमाणे विचार न करता वागत असतो. 

       मराठी भाषा बोलल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातच मराठी बोलल्या जात नाही यापेक्षा वाईट काय असू शकते. मराठी भाषा लोप पावण्यासाठी आपली संस्कृती आणि भाषा, सभ्यता आपण जपायला पाहिजे हे जर आजच्या आपल्या युवा पिढीला समजून द्यावं लागतं म्हणजे किती दुर्दैवी बाब आहे. आपली पिढी आधुनिकतेच्या नावाखाली इंग्रजी आणि हिंदीच्या चक्रव्यूमध्ये अडकून स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा अपमान करत आहे ही बाब ही त्यांच्या लक्षात येऊ नये का? आजच्या प्रगतिशील देशात संगणक प्रणालीने ही मराठी राजभाषेचा माहिती देण्यासाठी अवलंब केला आहे. आज कोणतीही अडचण येत असेल तर ती आपण लगेच इंग्रजी मध्ये शोधतो तीच मराठीतही सापडते पण आपण स्वतः आपल्या मराठीला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न का करत असतो.

      प्राथमिक शिक्षण ते सरकारी कार्यालयापर्यंत सर्व मराठी भाषा वापरून कामे करता येतात. पण आधुनिकतेच्या नावाखाली मराठीला दुय्यम दर्जा दिला जातो हे सगळ बंद करण्यासाठी मराठी भाषिकांना पुढाकार घेण्याची गरज आहे आणि मराठीला प्राथमिकता देण्याकरिता सक्ती करण्याची गरज महाराष्ट्रात आहे.

प्रत्येक प्रांतात स्वभाषेची लोक स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगतात त्याचा प्रचार, प्रसार करतात. फक्त मराठी भाषिकांना का मराठीचा अभिमान वाटत नसावा. 

       मराठी माणूस हा कार्य करण्यास तत्परता दाखवतो पण तो ते कार्य स्वतः पुढाकार घेऊन कधीही पूर्ण करीत नसल्याचे बऱ्याचदा लक्षात येते.शिवाय मराठी माणूस कष्ट फारसे करू शकत नाही. त्यापेक्षा शेती पुरताच मर्यादित आहे. परराष्ट्रीय व्यक्ती येऊन महाराष्ट्रात स्वतःचा व्यवसाय, व्यापार करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात. तेच परिश्रम महाराष्ट्रीय व्यक्ती का करू शकत नाही. ते त्याने करावे म्हणजे बाह्य लोक इथे येऊन मराठी माणसावर व मराठीवर वर्चस्व प्रस्थापित करणार नाही. 

     

       आपणच जर आपल्या भाषेतचा स्वीकार केला नाही आणि तिचा अंमलबजावणी आपल्या रोजच्या व्यवहारात केली नाही तर लवकरच ही भाषामृत पावेल. मृत पावेल म्हणजे काय तर ती कालबाह्य होईल जर आज आपण स्वतः आणि आपल्या नवीन पिढीला जर त्याबद्दल काही माहिती सांगितली नाही. त्याचा वापर केला नाही तर हळूहळू ही भाषा नामशेष होईल. मग कोण कोणाला मराठी भाषेतून विचारणार नाही आणि परत कोणी तिचा संगोपन करण्यास किंवा भाषेच्या अभिमान करण्यास थोरवी गाण्यास कोणतीही पिढी पुढे सरसावणार नाही. कालांतराने प्रत्येक भाषेचा ऱ्हास होणे हे ठरलेले आहे. कारण माणूस जेव्हा नवीन गोष्ट आत्मसात करतो तेव्हा जुन्याचा विसर पडतोच पण जाणून बघून आपली संस्कृती दर्शवणारी भाषा मातृभाषा जर आपण मागे सारली तर आपल्या इतिहासाचा आणि सामाजिक संस्कृतीचे फार मोठे नुकसान होईल. 

         थोडक्यात काय तर मराठीतील जे श्रेष्ठ उत्तम साहित्य नष्ट होईल किंवा ते कालबाह्य होईल, अज्ञातवासात जाईल. आज जर आपण त्यासाठी काही करू शकलो तर ते त्यासाठी खूप मोठे हिताचे होऊ शकते. आपण जर मुलांना इंग्रजी वाचायला लावतो, आणि बाहेर तेच संवाद साधणे सहज मुल शकतो.. घरात वेगळे आणि बाहेर वेगळे जर वागायचं सांगतो, बोलायचं सांगतो तर मुलंही बाहेरच्या गुणांना वाव देणार. जीवन जगताना माणूस घरापेक्षा बाहेर समाजात जास्त वावरत असतो. त्यासाठी बाह्य मराठी बोलण्यावर भर देणे गरजेचे आहे.

        महाराष्ट्र बाहेर किंवा देशाबाहेर आपण कुठेही गेलो तर तिची संस्कृती आपल्याला स्वीकारावी लागते. आपण आपली भाषा आणि आपले नियम घेऊन तिथे वास्तव्य करू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात का असं घडू नये बाहेरून येणारे त्यांची भाषा बोलू शकतात, त्यांचं राहणीमान जगू शकतात आपण त्यांच्यावर सक्ती का करू शकत महाराष्ट्रीयन होण्याची किंवा आपले नियम पाळण्याची.आपणच आपल्या महाराष्ट्रात किती काटकसर करून एखादा व्यवसाय सुरू केला तर आपलीच माणसं आपल्याला खेचण्यास तयार असतात. तेच परकीय माणूस येऊन आपल्या महाराष्ट्रात एखादा उद्योग सुरू करतो, तो फायद्यात राहतो म्हणजे बाहेरून येणारा माणूस कमाई करून श्रीमंत होऊ शकतो. पण आपण आपल्याच महाराष्ट्रात एक गरीब होत चाललो किंवा मग त्यांची तरी भाषा वापर करून आपल्याला पैसा कमवावा लागतो यापेक्षा दुर्दैव काय असू शकते? याला कोण जबाबदार आहे?

        ज्याप्रमाणे आज संस्कृत कोणी बोलत नाही. आणि संस्कृत कोणाला येतही नाही त्याचप्रमाणे एक दिवस असा येईल की मराठी कोणी बोलणार नाही. पण त्यानंतर कोणाला ती येणारही नाही कुटुंबातील शेवटची व्यक्ती जोपर्यंत मराठी बोलायला पूर्ण त्या मराठी बोलायची मानसिकता तयार करत नाही विशेष करून शहरी व्यक्ती तोपर्यंत समाजात मराठीची स्थिती बदलणे अशक्य आहे. जर आपणच घरात मॉम - डॅड, मम्मी - पप्पा, ब्रदर - सिस्टर सारखे जर शब्द वापरायला लागलो, आई-बाबा विसरू तर कोणती आणि कशी पिढी मराठी शिकणार आहे.

       मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्रित चळवळ करू शकतो. कायद्यात आपण बदल करू शकत नाही.कायदा हा देशासाठी लागू असतो आणि तो एका राष्ट्रासाठी बदलणं शक्य नाही आणि काही केल्यास कायदा आडवा येण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्यामुळे चळवळ करून मराठीचे महत्त्व व अभिमान आपण वाढवण्यास मदत घेऊ शकतो सर्वप्रथम मुलांना मराठी शाळेत टाकून इंग्रजी शाळांना वंदन घालून प्रत्येक गोष्ट मराठीतच सुरू करून मराठीत संपवणे हे या चळवळीचे पहिला नियम हवा. आणि त्यात गाव पातळी ते शहरी शहरी पातळीपर्यंत प्रयत्न झाल्यास कदाचित हा बदल मराठीच्या स्थितीत होऊ शकतो. एक कविता फार छान आहे ज्यात मराठीची गोडी सांगितलेली आहे......


मराठी भाषा माझी आई 

करू नका तिची कुचराई 

दिले तिने आम्हा ज्ञान 

 आहे ती सर्वात महान ll १ll 


मराठी भाषा महाराष्ट्राची शान 

 शब्द ऐकता हरवून जाते भान 

 मराठी भाषेचा आहे मान 

मराठी भाषा सर्वात छान ll२ ll 


मराठी भाषेला नाही आहे तोड 

मराठी भाषा आहे आसूची गोड 

मराठीने दिले आपल्याला वाण

 इतिहासात आहे तिचा मान ll३ll 


मराठीने आम्हाला ठेवले ऋणात 

 म्हणून आज मराठी राहते आमच्या मनात 

 त्याच मराठी भाषेचा आहे आम्हा गर्व 

मराठी भाषा संवर्धन नि अभियानासाठी प्रयत्न करूया सर्व. ll ४ ll 


        मृणाली ताईंच्या कवितेत मराठी भाषेला आई, शान, मान म्हटले आहे. तर आपण त्याचे भान का ठेऊ नये. 

          आपली पिढी आधुनिकतेच्या नावाखाली इंग्रजी आणि हिंदीच्या चक्रव्यूमध्ये अडकून स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा अपमान करत आहे ही बाब ही त्यांच्या लक्षात येऊ नये का? आजच्या प्रगतिशील देशात संगणक प्रणालीने ही मराठी राजभाषेचा माहिती देण्यासाठी अवलंब केला आहे. आज कोणतीही अडचण येत असेल तर ती आपण लगेच इंग्रजी मध्ये शोधतो तीच मराठीतही सापडते पण आपण स्वतः आपल्या मराठीला दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न का करत असतो.

         प्राथमिक शिक्षण ते सरकारी कार्यालयापर्यंत सर्व मराठी भाषा वापरून कामे करता येतात. पण आधुनिकतेच्या नावाखाली मराठीला दुय्यम दर्जा दिला जातो. हे सगळ बंद करण्यासाठी मराठी भाषिकांना पुढाकार घेण्याची गरज आहे आणि मराठीला प्राथमिकता देण्याकरिता सक्ती करण्याची गरज महाराष्ट्रात आहे.

प्रत्येक प्रांतात स्वभाषेची लोक स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा अभिमान बाळगतात. त्याचा प्रचार, प्रसार करतात फक्त मराठी भाषिकांना का मराठीचा अभिमान वाटत नसावा. 


       इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना मराठी शिकण्याची सूचना केली होती आणि महाराजांनी मराठीचा अभिमान वाटत होता त्यांनी मराठी भाषेला महत्व देऊन प्रसार केला कधीही दुसऱ्या भाषेचं संस्कृतीचा वापर केला नाही. तरीही त्यांना आज आपले आराध्य दैवत मानले जाते. आपल्या देवाने दिलेला मार्ग आपण स्वतः अवलंबू नाही शकत तर मग परक्यांकडून का अपेक्षा करावी. 


 माझी भाषा माझी आई 

अर्थ भावनांना देई,

तिच्या राहावे ऋणात 

होऊ नये उतराई. 


तिच्या एकेका शब्दाला 

रत्न कांचनाचे मोल,

कधी तप्त लोहापरी

कधी चांदणे शीतल.


रान वाऱ्याच्या गंधात 

माझी मराठी भिजली, 

लेऊनिया नाना बोली 

माझी मराठी सजली.


       या मृणालिनी जोशी ताई यांच्या कवितेत सहज आणि सोप्या भाषेत मराठीचे महत्व, मराठीची थोरवी सांगितलेली आहे. मराठी भाषेला आई चा दर्जा दिलेला आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून मराठीचा वारसा पूढील पिढीस भेट देणे हे अप्रत्यक्ष असलेले वचन पूर्ण करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे ते त्यांनी पूर्ण करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते अन्यथा आपण मराठीशिवाय पोरके व्हायला वेळ लागणार नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational