Jyoti gosavi

Classics

4.0  

Jyoti gosavi

Classics

प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम असतं

1 min
224


उपक्रम प्रेम


"प्रेम कोणावर ही करावं, राधेच्या वत्सल स्तनावर करावं ,तसंच कुब्जेच्या विद्रुप कुबडावर कराव"


या वि वा शिरवाडकरांच्या अजरामर कवितेप्रमाणे प्रेम कोणावर ही करावं.


"अहो प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं"


 मी कशी ओळखू प्रीती, 

हे हृदय म्हणू की लेणे

 प्रेमाला उपमा नाही

 ते देवाघरचे देणे 


आणि त्याच वेळी मारला जाणारा पांचट जोक ,

"उपमा नाही तर काय मग शिरा चालेल"


असं इतकं साधं सरळ प्रेम तेव्हा होतं.किंवा 


"ओळख पहिली गाली हसते

 सांग दर्पणा कशी मी दिसते


आणि  हिंदीत तर काय? प्रेमाची अजरामर गाणी आहेत.


पण आताच्या पिढीला ही नजरेचा खेळ करणार,

 निसटत्या स्पर्शाचा आनंद घेणार, 

न सांगता एकमेकांची काळजी घेणार

 न बोलताही समजणारं


" इशारो इशारो मे दिल लेने वाले

 बता ये हुनर तूने सिखा कहा से? 


पण हे असं अशा पद्धतीचे प्रेम आता कुठेतरी लुप्त झाले आहे.

आता फक्त शारीरिक प्रेमाला जास्त महत्त्व, आत्ताची पिढी मित्र मैत्रिणी आपले तरी लगेच मिठ्या मारत राहतात, आणि म्हणतात आमचा नॉर्मल आहे.

मग काय आलं लिव्ह इन रिलेशन? 

ते तर फारच पुढची स्टेप,


 म्हणजे बाजारात एखादी वस्तू आपण घ्यायला जावं, आणि नाही पटली म्हणून दुकानदाराकडे रिप्लेस करून घ्यावी .

असं काहीतरी वाटतं


अहो चॉकलेट देऊ आणि टेडी देऊन काय कुठे प्रेम वाढतं का? 


याच देशांमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये " लैला-मजनू" "हिर-रांझा"

" सोनी महिवाल" होऊन गेले .

प्रेमाच्या एका शब्दासाठी किंवा एका व्यक्तीसाठी आपल्या आयुष्यच्या आयुष्य बरबाद करणारे, याच भूमीत होऊन गेले.


आता च्या मुलांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकावं

 नुसतं प्रॅक्टिकल राहू नये.


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics