Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Sangieta Devkar

Drama Tragedy


3  

Sangieta Devkar

Drama Tragedy


प्राक्तन - भाग 1

प्राक्तन - भाग 1

3 mins 203 3 mins 203

उन्हाचा तडाखा वाढला होता. पंखयाचा वारा पण गरम हवा सोडत होता. कालपासून नलूची काम पेंडिंग राहिली होती. आईसाठी घरून काम करण्याची परवानगी तिने घेतली होती. एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये ती काम करत होती. गेली सहा महिने आई अंथरुणावर खिळून पडली होती तसे तिने काम घरून करण्याची विनंती केली होती. नलूचे काम चोख आणि प्रामाणिक होते त्यामुळे तिला घरी काम दिले.


नलू थोडे सरबत देतेस का ग? आईने आवाज दिला. काय ग किती वेळा उठवतेस मी काम पूर्ण करू की नको नलू वैतागून बोलली. नाही ग जरा जास्तच गरम होतय ग म्हणून. देते म्हणत चरफडत नलू उठली आणि सरबत बनवले. आईला हात देऊन बसवले आणि हातात सरबत दिले. स्वतःलाही घेतले. माझा खूप त्रास होतो ना ग तुला? खूप करतेस माझ्यासाठी. असू दे आता हे बोलायची वेळ नाही आई. कधीतरी बोलले पाहिजेच तसा आता माझा काय भरवसा? शांताला बोलताना धाप लागत होती. राहू दे झोप आता कशाला त्रास करून घेतेस. नलू आपल्या कामाला लागली.


संध्याकाळी विमल आली कामाला. ताई काय करायचे आज जेवणाला? विमल थोडी भजी करतेस का ग मला खूप खायची इच्छा झाली आहे आणि उद्या जरा आंबे घेऊन ये आमरस पण कर उद्या. आई भजी खायची नाही तुला. असू द्या ओ ताई त्यांना खावेसे वाटते तर खाऊ द्या. विमल तुला काय वाटते मी आईची आबाळ करते काय? सख्खी आई नसली तरी लांबची मावशीच लागते माझी. ती कशी पण वागली तरी मी नाही ना तस वागू शकत. हो ग बाई मी खूप त्रास दिला तू नलू माझं चुकलंच ग. पोटची पोर चौकशी पण करत नाही पण तू मात्र खूप करतेस. जमलं तर मला माफ कर. जा विमल आधी आईचं आवरून घे आणि कर हवा तो स्वयंपाक. नलू बोलली.


मी खाली जाऊन येते म्हणत नलू बाहेर पडली. सोसायटीच्या गार्डनमध्ये जाऊन बसली. काय ग नलू कशी आहेस आई कशी आहे? मिरजकर काकू तिला विचारत होत्या. काकू मी बरी आहे आई पण आहे ठीक. नलू एक विचारू का ग तुला? अहो काकू बोला ना परवानगी का मागता. माझ्या नात्यातले एक जण आहेत त्यांची बायको गेल्याच वर्षी कन्सरने गेली. एक मुलगा आहे त्यांना बारावीला आहे. खाण्याची आबाळ होतेय त्यांची म्हणून ते लग्नाला तयार आहेत तू तयार असशील तर मी बोलू शकते त्यांच्याशी.


काकू माझी चाळीशी संपली आता मी ४६ वर्षाची झालेय. त्यात ना रंग रूप मला आणि आईची जबाबदारी नाही टाळू शकत मी. नलू दिसायला तू काही इतकी वाईट नाहीस आणि आईसाठी विमल आहेच की! तू अधूनमधून लक्ष ठेव. नको काकू सध्या तरी लग्न हा विषय खूप मागे पडला आहे. बर जशी तुझी इच्छा पण नलू आता काही वाटत नाही ग. जेव्हा आपण एकटे पडतो ना तेव्हा सोबतीची गरज भासते. किती दिवस अशी एकटी दिवस काढणार तू? अजून वय गेले नाही तुझे.


काकू तुम्ही माझा इतका विचार करता हेच खूप आहे माझ्यासाठी. चला जाते मी घरी विमललाही जायचे असेल. नलू घरी आली. विमल काम उरकून जरा वेळ आईशी बोलत बसत असे. नलू आल्यावर ती जायला निघाली. विमल हे घे पैसे उद्या सकाळी येताना आंबे आण आणि आमरस कर. बर ताई म्हणत विमल निघून गेली. विमल आईला जेवण भरवून मग जात असे. नलूने आपले ताट वाढून घेतले आणि रूममध्ये गेली. १ बीएच के फ्लॅट स्वतःच्या कामाईतून तिने घेतला होता. वडील शिक्षक त्यामुळे मोजका पगार कायम भाड्याच्या घरात राहत आले ते. बाबा होते तोपर्यंत तिला आधार होता. नाही म्हणायला बहीण अर्चना होती पण तिने नलूला कधी स्ख्खी बहीण मानलेच नाही. दिसायला सुंदर होती म्हणून कायम नलूचा दुस्वास करत होती.


आईच्या खोकल्याचा आवाज येऊ लागला. नलू नलू हाका ऐकू आल्या. सुखाने दोन घास खाणं पण नशिबी नाही आपल्या म्हणत नलू बाहेर आली. आईला थुंकण्यासाठी डब्बा हवा होता. नलूने दिला खोकून खोकून थुंकत राहिली. नलूला पार किळस आली पण काय करणार? आपलंच नशीब आपलंच कसले हे प्राक्तन म्हणून भोगण भाग होत तिला. आता जेवायची इच्छाच मरून गेली तिची. पाणी पिऊन तशीच बेडवर पडली. विचार करू लागली कसले हे नशीब आपलं. कसंलच सुख का नाही माझ्या नशीबात? आतापर्यंत लग्न होऊन माझी मुलं पण मोठी झाली असती. डोळयातून अश्रू झरझर वाहू लागले. आजपर्यंतचा जीवनप्रवास नजरेसमोर दिसू लागला.

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Drama