Jyoti gosavi

Classics Others

3  

Jyoti gosavi

Classics Others

पंढरीचा राया दळी जनीच्या घर

पंढरीचा राया दळी जनीच्या घर

3 mins
317


एका भक्ती गीताचे रसग्रहण


आभाळीचा चांद माझ्या

 आज अंगणात

पंढरीचा राया दळी,

 जनीच्या घरात

किती करी काम देवा, 

घेई रे विसावा

हेच एक एवढे रे,

 मान किती घ्यावा

घनश्याम विठ्ठला रे, पंढरीच्या नाथा

धावुनिया भक्तांपाठी,

 वृथा शिणवाया

जरा थांबु दे रे देवा,

 कोमल हे हात

पंढरीचा राया दळी

 जनीच्या घरात


किती माझ्या संगे,

 गाऊनिया गाणी

भागलासि आता, 

तू रे चक्रपाणी

कटी पितांबर शोभे,

 गळा वैजयंतिमाला

असा हरी गरिबांच्या,

 झोपडीत झोपी गेला

सावळीच गोजिरी ही, 

मूर्ति सदा नयनात

पंढरीचा राया दळी

 जनीच्या घरात


हे गाणं माझी आई म्हणायची, त्यानंतर आता सर्च केल्यावर माणिक वर्मा यांच्या आवाजामध्ये हे भक्तीगीत आहे असे समजले यु ट्यूब वरती मिळाले

 

विठ्ठल आणि जनाबाई यांच्यातील प्रेमभाव, भक्तिभाव, त्यांचं जमलेलं गुळपीठ, सारं काही या गाण्यांमधून दिसतं .पहिलीच ओळ आहे 


आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात

 पंढरीचा राया दळी जनीच्या घरात


म्हणजे तो आभाळीच्या चंद्रा एवढा अप्राप्य आहे, हे जनीला माहीत आहे, किंवा आभाळीचा चंद्रा इतकाच तेजस्वी असा विठ्ठल जनीबरोबर दळण दळतो. "किती आहो भाग्य त्या जनाबाईचे"


किती करी काम देवा,

 घेई रे विसावा

हेच एक एवढे रे,

 मान किती घ्यावा

घनश्याम विठ्ठला रे,

 पंढरीच्या नाथा

धावुनिया भक्तांपाठी

, वृथा शिणवाया

जरा थांबु दे रे देवा,

 कोमल हे हात


त्या दोघांना पण एकमेकाबद्दल एवढा कळवळा आहे ,एवढे प्रेम आहे ,की जनीसाठी परमेश्वर पडेल ती कामे करतो. 

दळण दळतो, वाकळा धुतो, तिच्याकडे झाडू मारतो, अंगणात सडा टाकतो, तिच्या संगे गौर्या थापू लागतो. 

अशा किती गोष्टी परमेश्वर करतो, 

इतकेच काय जनिचा भक्तिभाव येवढा होता ,की तिने थापलेल्या गौर्या देखील विठ्ठल विठ्ठल बोलत असत. 


एकदा तिचे शेजारणीशी भांडण झाले, गौर्यांवरून, शेजारीण म्हणे आम्ही थापलेल्या गौऱ्या जनीने चोरल्या, तर जनी म्हणे तिच्या गौरा शेजारीन बाईने घेतल्यात 

 शेवटी निवडा करणाऱ्या माणसाला जनाबाईने सांगितले माझी प्रत्येक गवरी विठ्ठल विठ्ठल बोलेल. त्यांनी कानाला लावला तर खरोखर प्रत्येक गवरी विठ्ठल विठ्ठल बोलत होती.

अहो तो निवाडा करणारा माणूस देखील काही साधासुधा नव्हता, तर ते संत कबीर होते. 


यातून एक गोष्ट मात्र कळते ती म्हणजे कोणतेही काम करताना, जरी आपले कर्तव्य चालू असले तरी आपण नामजप करू शकतो. आपला भक्तिभावात या कामात ओतू शकलात, तर परमेश्वर देखील तुमच्या मदतीला उभा राहतो, धावून येतो. 


जनीला वाटते यांनी किती काम करायचे, त्याचे हात दुखतील, 

देवा तुझे हात कोमल आहेत, आता जरा थांब ना! जरा विश्रांती घे ना किती रे मान घेतोस! असे जनाबाई त्याला विनविते आर्जवे करते. 


किती माझ्या संगे,

 गाऊनिया गाणी

भागलासि आता, 

तू रे चक्रपाणी

कटी पितांबर शोभे

, गळा वैजयंतिमाला

असा हरी गरिबांच्या,

 झोपडीत झोपी गेला

सावळीच गोजिरी ही,

 मूर्ति सदा नयनात


जनाबाई त्याला विनवते अरे देवा माझ्या बरोबर गाणे गाऊन गाऊन तू पण शीणलास, 

तेव्हा हे "चक्रपाणी" आता जरासा विसावा घे .

अशी जनी त्याला विनंती करते, त्याच्यानंतर तो श्रीहरी तिच्या त्या झोपडीमध्ये खरोखर विसावा घेतो. आपल्या भक्ताची विनंती मान्य करतो. आणि त्याच्या रूपाचे वर्णन केले आहे की, कटीला पिवळा दैदिप्यमान पितांबर, गळ्यामध्ये गुडघ्यापर्यंत होणारी वैजयंती माळा, अंगावरती अलंकार, डोक्यावरती मोरपीस, आणि असा हा हरी त्या गरिबाच्या झोपडीमध्ये त्या जनाबाईच्या झोपडीमध्ये विश्रांती घेत आहे. 

तिथं झोपी गेला, आणि त्याची सावळी गोजिरी मूर्ती सदैव व तिच्या नयना मध्ये आहे. 


काही ठिकाणी तर रुक्मिणीने जनाबाई साठी पांडुरंगाला दूषण दिले आहे . किंवा टोमणे मारले आहेत .असे कुठेतरी वाचनात आले. 

म्हणजे देवा इथे नरम बिछाना आहे. 


 चहू बाजूनी पलंग, 

वरती जळती समया

 रुक्मिणीच्या गोपिका

 पाई दाबाया

हे आवडेना देवा तुजला जनीच्या घरी जाशी

 तिची वाकळ पांघरशी

 ऐसा स्वभाव तुजपाशी

 भक्तासाठी होऊन कष्टी

 रानोमाळ फिरशीफिरशी

 हरि तु रानोमाळ फिरशी


तरस आत्या जनाबाईच्या आणि विठुच्या मधला तो अद्वैत भाव मनाला या भक्ती गीता मधून मोहवून टाकतो


 राधे राधे 

जय श्रीकृष्ण

 जय विठ्ठल


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics