फोफावणारा भ्रष्टाचार
फोफावणारा भ्रष्टाचार
*कथेतील पात्र: सीमाताई (पं. स. सदस्य), दादासाहेब (अध्यक्ष), कार्यकर्ता*
----------------------------------
*सीमाताई:-* नमस्कार दादासाहेब.
*दादासाहेब :-* या... या ....वकीलीनबाई. आज इकडं कसं काय यणं केलं ?
*सीमाताई:-* खूप दिवसाने आपली भेट झाली नाही. थोडंस बोलायचं होतं तुमच्याशी.
*दादासाहेब:-* हं... बोला बोला... ऐकत आहोत आम्ही.
*सीमाताई :-* माझं असं म्हणणं होतं की आता आम्ही या पदावर येऊन एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. आपल्या कृपेने मला पंचायत समितीचे सदस्यत्व लाभले.
*दादासाहेब :-* मग... काय म्हणायचं आहे.... शुभेच्छा दिल्या घेतल्या की आता.
*सीमाताई :-* एक वर्ष झाले माझ्या वॉर्डमधील काही कामे रखडून पडली आहेत.
*दादासाहेब :-* अच्छा ! आहो... तेवढ्यासाठीच तुम्हाला जिंकून दिले. आपापल्या भागातील कामे बघा. प्रजेचे प्रश्न सोडवणे हेच प्रतिनिधींची कामे आहेत.
*सीमाताई :-* हो. कालच माझ्याकडे वॉर्ड नंबर 14 मधील लोक आले होते. गटारीच्या कामाबाबत विचारण्यासाठी.
*दादासाहेब:-* मग तुम्ही काय सांगितलं, वकीलीनबाई ?
*(दादासाहेब एका कार्यकर्त्या कडे बघून बोलतात)*
अरे.... जरा चहा पाण्याच बघा......
*सीमाताई :-* हो. माझ्याकडे असलेल्या खात्यामध्ये गटार काम व पाणी पुरवठ्यासाठी 90 लाख रुपये मंजूर झाले. तीच फाईल घेऊन आले आपल्याकडे.
*दादासाहेब :-* अरे व्वा...व्वा! अशी कामे करायला पाहिजे. आणा इकडे फाईल. सही मारली का चेकवर?
*( फाईल बघितल्यासारखे करतात)*
हा... ठीक आहे.
*सीमाताई:-* मग या पैशांचे नियोजन कसे करायचे ?
*दादासाहेब :-* ते बघतो आम्ही, एवढ्यासाठीच तुम्हाला निवडून दिलय. तुमचा वाटा पोहोचवण्यात येईल तुम्हाला. काळजी करू नका.
*सीमाताई :-* असं नाही दादा, खरंतर वार्ड मधल्या लोकांना त्यांच्या वार्डच्या विकासाचे मी आश्वासन दिले आहे . तुम्ही म्हणत असाल तर उद्यापासूनच कामाला लागते.
*दादासाहेब :-* हे बघा वकिलीनबाई विकास कामे कितपत करायची ? कुठे पैसा घालवायचा ?याचे ज्ञान आम्हाला देऊ नका. बघतो आम्ही ते. निघा आता.
*सीमाताई :-* राग मानू नका दादा, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी मला निवडून आणलं असेल, परंतु मी माझ्या कामाशी जबाबदारीशी विश्वास घात करणार नाही.
*दादासाहेब:-* काय बोलताय समजतं का तुम्हाला ? विचार करून बोला.
*सीमाताई:-* क्षमा असावी दादासाहेब, पण ज्या कामासाठी मी हा पैसा मंजूर करून घेतला आहे, मला त्याच्यासाठी वापरू द्या. मला माझे हात भ्रष्टाचारात भरवायचे नाही.
*दादासाहेब:-* भ्रष्टाचार ! तुझं म्हणणं आहे की मी भ्रष्टाचार करतो, पैसे खातो.
*( कार्यकर्त्याला हाक मारत)*
कोण आहे रे तिकडे ....कडमडले का सारे ? जरा बघा या वकीलीनबाईकडे.
*सीमाताई:-* दादासाहेब, ती गरीब जनता, ज्यांचे पावसात घर पाण्याने भरलेत का गटारीत डुंबलेत समजत नाही, त्यांची कळकळ पाहून तरी त्यांच्यासाठी काहीतरी करा. त्या लोकांमुळेच आपण येथे आहोत.
*दादासाहेब :-* बाई बास कर, निघ आता. आम्हाला काय करायचं, काय नाही, आमचं आम्ही ठरवू.
*सीमाताई :-* नाही दादासाहेब, जोपर्यंत माझ्या बोलण्याला, माझ्या वार्डला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी ही इथून हटणार नाही. त्या सर्व लोकांचे डोळे माझ्यावर आहेत. त्यांच्या डोळ्यात माझ्या कडून अपेक्षा दिसते. मी त्यांच्या अपेक्षा मोडणार नाही. त्यासाठी मला राजीनामा द्यावा लागला तरी चालेल.
*( तोपर्यंत एक कार्यकर्ता दादासाहेबांच्या कानात कुजबुजतो)*
*कार्यकर्ता:- (कानात)* दादासाहेब या बाईच्या पाठीशी सर्व जनता उभी आहे. हिच्याशी पंगा घेण्यात अर्थ नाही. हिला खिश्यात ठेवणचं आपल्याला फायदेशीर आहे.
*दादासाहेब :-* असं म्हणतोस होय.
*(सीमाताई कडे बघून)*
ठीक आहे, वकिलीनबाई, ही फाईल ठेवा तुमच्याकडे. करा सुरुवात उद्यापासून, आम्ही येतो शुभारंभाला.
*सीमाताई :-* धन्यवाद दादासाहेब ! येते मी.
*सारांश*
*(भ्रष्टाचार कुठे नाही, परंतु भ्रष्टाचाराला चालना देणाऱ्या लोकांना आपण स्वतःहून रोखले पाहिजे. जर सर्वच कार्यकर्ते प्रामाणिक असतील, स्वतःच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत असतील तर भ्रष्टाचार करणारा देखील दुसऱ्यांना फसवण्याआधी दहा वेळा विचार करेल. भ्रष्टाचार करणारेच फक्त नसतात, तर करू देणारे देखील असतात. वेळीच स्वतः बदल केल्यास या भ्रष्टाचाराला रोखण्यात नक्कीच यश मिळेल. जिथे पाहिजे तिथे खंबीर भूमिका घ्यायलाच पाहिजे. अन्यायाविरोधात आवाज उठवलाच पाहिजे.)*
