पेच
पेच


""साहेब""
हाक ओळखीची वाटून सदा बाहेर आला अंगणातल्या वृन्दावनाच्या खालच्या अंगाला लागूनअसलेल्या चपट्या दगडावर हताशपणे बसलेल्या सईला पाहून सदा काहीसा गोंधळात पडला त्याच्या मनाला वाटल आत्ता या वेळी तिन्ही सांजेला इकडे का आली असावी?सदाला पडलेल्या प्रश्नाच कोड त्याला एकट्याला सूटनार नव्हत,अर्थात ते सईला विचारल्या शिवाय समजनार नाही हे जानून सदा पायऱ्या उतरून अंगणात तुळीशी वृंदावनापाशी उभा राहूनच त्याने विचारलं
""सई अंग तू या वेळी इथ काय करतेस?""
""साहेब मोठा पेच निर्माण झाला तो तेवढा सुटेल का बघा""
""कसला पेच काय झालय""
""जण्यान थोरल्या मालकीनीवर हात उगरलाय""
""काय!!
सदा जवळजवळ किंचळला...
""हो साहेब खर आहे""
""अगं पण का?काय झाल?आणि त्याला समजतय का वाघाच्या गुहेत हात घातलाय जनार्दने मग रक्त बंबाळ होनारच""
""साहेब तूम्ही काही करा हो मोठ्या आशेन आले तुमच्या कडे""
""पण झाल काय अस की जनार्दनाची मजल थोरल्या मालकीन बाईवर हात उगरण्या पर्यन्त गेली""
""काय सांगू साहेब कपाळ फुटल माझ मीच पाटवल होत बळ जबरी तो जातच नव्हता""
""तू पाठवल अगं काय बोलते मला काही कळत नाही बळजबरी केली तू जन्यावर मला समजल अस बोलशील ""
""काय बोलू साहेब आम्ही गरीब मानस त्याच्या वावरात कष्ट करूण खातो..त्यांना वावग बोलाया आमची जीभही उचलत नाही आणि""
""आणि जनार्दने मालकीनीवर हात उचला ,कळतय का तूला अगं ती त्याला सोडेल का अशी""
""नाही सोडनार चवताळलेल्या वाघीनीसारखी दहाड मारते वाडाभर हिंडत बसली, कुणाच ऐकत नाही""
""तूला कस माहीत""
""मी तीथेच गेली होती जन्यान झाला प्रकार सांगितला तेव्हा मी पळत पळत वाड्यावर गेली...माफी मागीतली पायावर डोक ठेवल नाक घासल तरी ऐकायला तयार नाही.त्यांच म्हनन आहे जन्याला पूढे उभा कर तेव्हाच पुढच पाहीन""
""मग गेली नाही जनार्दनला घेवून""
""तोच मोठा पेच आहे साहेब जन्या हट्टाला पेटला मरेन पण तीच तोंड देखील पाहनार नाही.जान तर दूरच राहील,आणि मालकीनबाई तीही हट्ट धरून बसली जन्या येवून जोवर नाक रगडत नाही तोवर गावाल्या कुठल्याही वावरात काम करू द्यायची नाही""
""जेवढा राग जनार्दनला आलाय त्याच्या दुप्पट राग मालकीनबाईना """
""हो साहेब यातून तुम्हीच फक्त मार्ग काडू शकता""
""मी कसा काय""
""तुमचच ऐकतील त्या दुसऱ्या कुणाच ऐकणार नाही...साहेब एवढा पेच सोडवा म्हणजे आम्ही दुसरीकडे कूठेतरी जावू""
""अंग घर सोडून जाण्याएवढी समश्या मोठी नाही""
""नाही साहेब समश्या मोठीच आहे ती कधी मिटण्यातली नाही""
""म्हणजे""
""साहेब तुम्ही माझ्या घरी चला जन्याला समजवा तूमचे उपकार होतील आणि माझ्या मुलांचा दुवा लागेल तुम्हाला""
खरंतर सदाला या तिन्ही सांजेला घराला कुलूप लावून जाण फार जीवावर आल होतं. परंतू सईने मुलांना मधीच आणून सदाची बेलती बंद केली होती. मनात नसतानाही सदा सई पाठी तीच्या घरी आला होता. घर कसल ते कौलारू दोन खोल्याची ती झोपडी होती..लाईट असूनही बल्प फक्त टीमटीम करत होता.. ना धड काळोख ना धड लखलखीत प्रकाश, अशा घरात सदाने प्रवेश केला आणि तुटक्या साधारण मोडकळीस आलेली खुर्ची सईने पूढे केली..सदाने त्यावर बसने म्हणजे धोका पत्करण्यासारख वाटून तो खाली पसरलेल्या चटईवर बसला.. सईने सुरवात म्हणून विचारल
""साहेब चहा ठेवू थोडा""
""आत्ता नको ""
""मग पाणी आणू""
खरंतर सदाला काही नको होत.परंतू सईला राग येवून गरीबीची जानीव होवू नये म्हनून त्याने फक्त पाणी प्यायला. सईच्या हाती खाली ग्लास देत सदाने मुद्याला हात घातला..कारण वेळ वाढत होती.दुसर कदाचीत वाड्यावर सुद्धा जावलागेल याची काळजी होतीच..
""जनार्दन काय झाल मालकीनीवर हात उगरण्या एवढी तुझी मजल गेली होय रे !!तूला जराही भीती वाटली नाही""
""कसली भीती साहेब""
""अरे पूढे काय होईल याची कल्पना तरी केलीस का?"
""नाही करणार का करू मी कल्पना का घाबरू मी तीला ती स्वत:हाला काय समजते?पैशाच्या जोरावर ती काही करील,आम्ही गरीब असलो तरी आम्हाला किंमत आहे
साहेब,मेलो तरी वंगाळ काम करनार नाही..देवासारख्या साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसू ,नाही साहेब ते माझ्याने होनार नाही...मेलो तरी बेहत्तर""
सदाला माहीत होता भोळा समदार चोरी मारी न करनारा जनार्दन सरळ मार्गी चालनारा मालकाला देव मानत पुजनारा या आधी कधीच त्याला रोषात तिरस्कारी बोलताना सदाने पाहील नव्हत.तसच काही जन्याच्या विरूद्ध घडल असाव म्हणून तो एवढा चिडलेला आहे..
त्याचीही मर्जी संभाळत सदा म्हनाला
""जण्या सोड राग! अरे ही आपलीच मानसं. होतात कधीतरी चुका त्यांच्याकडून, म्हणून का आपण ते धरून बसायचं! आपण लहान आहोत ती मोठी समजून माफी माग, म्हणजे संपल सर्व
""माफी त्या बाईची जीला स्वत:हाच्या चरीत्र्याची लाज बाळगता येत नाही त्या बाईची माफी मागू,अजीबात नाही""
""चरीत्र लाज अरे काय बरळतोस!जण्या मला समजेल अस बोल""
""सांगतो !तुम्हाला सर्व सांगतो!!
""अहो अस नका करू तूम्ही काही सांगू नका तूम्हाला शप्पथ आहे,माझी..तूम्ही माफी मागा आणि मिटवा सार,एखाद्या बाईची निंदा नालस्ती करून तूम्हाला काय मिळनार""
""सये तू गप राहा मला बोलूदे मोठ्या घरची ही मानस कशी आपली पायरी सोडून खालच्या थराला जातात ते""
""जण्या तू बोल मला ऐकायच आहे""
""साहेब तूम्ही नको त्याना विचारू फक्त माफी मागून घ्या एवढ करा आणि आमच्यावर उपकार करा कसही असल तरी ज्या घरच मिठ खाल्ल त्या घरचे वासे कसे मोजावे साहेब""
""सई अगं त्यान सींगितल नाही तर कस कळेल चुक कुणाची आहे ते""
""मीही तेच सांगतो साहेब तुम्ही माझ ऐका म्हणजे कळेल तुम्हाला ही मोठी लोक आपल्या स्वार्थापाई कुणाच्याही भावनांचा चुराडा करतात""
""तू आता आड्यात बोलनार की सांगणार आहेस सर्व""
""सांगतो ऐका""
काल मी मळ्यातल्या पिकांना पाणीवदेता देता मालकांनी तंबी दिली जण्या दोन दिवस मी शहराकडे जातोय डाँक्टरना भेटायला तोवर तू मळ्याची राखण आणि मालकीनबाईचा आदेश पाळ""
आपसे मालक डाँक्टरजवळ जातात तेही दोव दिवसा करता जण्याच्या काळजाचा ठाव चुकला हातला पाण्याचा पाईप तसात टाकून तो धावत मालकांपाशी येवून म्हणाला..
""मालक तुमची तब्येत बरी आहे ना तुम्हाला काही झाल तर नाही ना तस असल तर मी येतो तूमच्या संगती""
""अरे बाबा मला काही झाल नाही मी बरा आहे..पण स्त्री हट्टापाई काही कराव लागत""
""म्हणजे तूम्ही काय बोलता मला काही कळत नाही""
""तस काही नाही ,घाबरू नको बर येवू मी"
""या संभाळून जा""
""तूही जपून कर काम मी आलोच
मालक निघून गेले जण्या मळ्याला पाणी देवू लागला..सध्याकाळचे चार वाजले आणि मळ्याची राखण करीत असलेल्या दाजी करवी जण्याला मालकीनीन वाड्यावर येण्याचा निरोप मिळताच जण्या लगबगीन वाढ्यावर गेला..
""मालकीन तूम्ही बोलवल मला""
""हो""
उमद्या वयाच्या रांगडा कणखर असलेल्या जण्यावर नजर फीरवत मालकीन म्हणाली..
""कोणत काम""
""जण्या सर्व ईथच विचारणार की घरात येणार""
""हो आलोच ""
मालकीन कूठे नथांबता आपल्या झोपण्याच्या खोलीकडे वळली तशी गण्याची पावलेही आपसूक जागच्या जागी चिकटली कारण आपली मर्यादा एवढीच आहे.. मनात आल्यावर जण्या म्हणाला
""मालकीन तीकडे कूठे चाललाय इथेच बोला की""
""जण्या खोलीत ये काम ईथे आहे""
""खोलीत आल्यावर जण्याने विचारल
""बोला मालकीन""
""जण्या तू बस आधी""
""नको मी ईथच बरा आहे.तूम्ही काम बोला""
""जण्या तू मला मालकीन बाई बोलू नको"
""अस विपरीत कस बोलता तूम्ही आमच्या मालकीन आम्ही तूमचे सेवक नाव कस घेनार""
""कस ते मी सांगते"
""म्हणजे मी नाही समजलो""
""समजेल बस खाली""
मालकीनीन जवळजवळ जण्याच्या हाताला धरून पलंगावर बळेच बसवल गण्या मात्र अनोख्या भितीने थरथर कापत होता.पण मालकीन मात्र हसत जण्याला म्हणाली...
""जण्या घाबरू नको""
""नाही मालकीन घाबरलो नाही मी""
""मग माझ एक काम करशिल""
""कोणत मालकीन""
""गण्या जाधवांचं हे साम्राज्य माझ्याकडे आशेने पाहतय त्या साम्राज्याला वारस हवाय आणि तो देणे माझ्या हाती आहे परंतू तुझ्या मालकाच्या हाती नाही. गण्या आजवर तू या घरासाठी खुप केलंस पण आज ती वेळ आली खाल्लेल्या मिठाला जागायची, मला तुझ्याकडून या घराला वारीस हवा, फक्त एकदा गण्या मला साथ दे ही गोष्ट आपल्यात राहील, ""
ती बोलत होती जण्याच्या कानात कुणी वितळलेल सीसे ओतल्या सारख वाटत होत.त्याला आता कळल की मालक तालूक्याला डाँक्टर जवळ का गेले ते ,,मालक मालकीनीवर जीवापाड प्रेम करतात, केवळ तीच्या करता त्यानी आपल पूरूषार्थ दावावर लावताना त्याना कीती वेदना होत असाव्या आणि इथ ही बाई आपल्याकडे या वाड्याला वारीस मागते शि... हीला बोलवल तरी कस..विचारात मग्न असलेल्या गण्याचा हात कधी मालकीनीवर उचला गेला हे कळलच नाही..
पण समोरून चहा घेवून येणारी त्या घरची नेकरानीन पाहील आणि मालकीन हंगामा केला होता...एवढा वेळ जण्यान जे सांगीतल ते सदाने शांती पूर्वक ऐकल आणि जण्या बद्दल त्याला अपार कौतुक वाटल,खर तर जण्याच्या जागी कुणी दुसरा असता तर ऐशोआरामात लोळला असता परंतू जण्या खाल्या मिठाला खरेथर जागला होता..आता प्रश्न होता तो माफी मागण्याचा ,माफी गुन्हा न केलेल्या मानसाला मागावी लागणार होती..परस्थीती फार बिकट होती ..सईच्या म्हणण्या प्रमाणे हा पेच सोडवावा कसा हा प्रश्न होता..सरते शेवटी जण्या नियमीत पणे जातो तसाच कामावर जायच ठरवून सदाने आपल घर गाठल,पण सकाळी आपण मळ्यात येवू अस जण्याला आश्वासन देवूनच
ठरल्या वेळी जण्या मळ्यात हजर होता ..तर सई वाड्यावर, सईला पाहताच मालकीन मळ्याकडे धाव घेतली होती..सई समजून गेली जण्याच काही खर नाही.परीनामी सई ही मालकीन बाईच्या मागून निघाली..
मळ्यात जण्या आपल्या कामात मग्न होता सदाही झाडाखाली सावलीत विसवला होता तेवढ्यात
""जण्या ये जण्या""
आवाज मालक देत आहे जण्यान ओळखल आणि ते तीथूच म्हणाला..
""आलो मालक""
""अरे लवकर ये तूला आनंदाची बातमी द्यायची आहे""
"""बोला मालक""
""तू विचारलेल ना डाँक्टरजवळ का जाता""
""होय मालक पण तुम्ही का गेलात ते नाही सांगितल""
""सांगतो ऐक गण्या मी बाप बनू शकतो...डाँक्टरच म्हणाले मी खुष आहे जण्यापण माझ्यापेक्षा जास्त खुष कोण होईल माहीत आहे...
""कोण मालक""
""तूझी मालकीन मी आताच तीला ही गोड वार्ता सांगून येतो..
"""मालक खरं""
जण्याला खरी खोटी सुनवायला आलेल्या मालकीन ही गोष्ट ऐकली आणि तिने न राहून विचारल होत
""निता तू मळ्याकडे का आलीस""
""तुम्ही नसताना म्हटलं हा जण्या काम कसं करतो ते पाहू या म्हणून आले..आणि जण्या काल तुझ्यावर रागवल्याबद्दल माफ कर..
मालकीनीन मागीतलेल्या माफीने जण्याच मनही भरून आलं होतं..हा पेच देवाने सोडवला अस समजून सदा गालात हसत होता तर सई आपल्या डोळ्यांच्या पापण्या हळूच पुसत होती...