Jyoti gosavi

Classics

4  

Jyoti gosavi

Classics

पावसाळी सहल

पावसाळी सहल

4 mins
382


30 आणि 31 जुलै आमची सिद्धलेखिकेची पावसाळी पिकनिक

(भाग १) 


होय नाही करता करता

 आम्ही तरुणी सोळा

 सहलीसाठी झालो गोळा

झाला फ्रेंडशिप डे चा सोहळा 

 माहेराहून भरून आणला

 प्रेमाचा झोळा


 योगायोगाने त्या दिवशी फ्रेंडशिप डे होता, किंवा फ्रेंडशिप विक असेल, पण व्हाट्सअप ला भरपूर पोस्ट होत्या. 


आणि मग काय नुसते "चक् धूम"

सकाळी साडेसात ही वेळ दिलेली होती. गडकरी रंगायतन पशी येण्यासाठी, आणि सगळ्याजणी वेळेत आल्या. अगदी पवई वरून दीपाताई सुद्धा तिच्या गाडीतून अलगद उतरली. अगदी वेळेत! 

तिच्या पाठोपाठ एवढ्या लांबून शहापूर वरून उल्का (चांदणी) अवतरली. 

जणू काही हिरवी हिरवी* चांदणी लुकलुकते आहे. तशी काही पाच दहा मिनिटे इकडे तिकडे चालतात.


 आमच्या मुख्याध्यापिका बाईंनी (अर्थात पद्माताईंनी) आमची हजेरी घेतली. म्हणजे खरी खरी हजेरी हं! नाहीतर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटायचं. 


बस सुरू झाली, आमचा चक्रधर देखील चांगला होता. 

तिकडे डोंबिवलीच्या सख्यांचे आणि संगीताचे फोन वरती बोलणे चालू होती . 

कुठपर्यंत आलात? 

तुम्हाला कुठे पिकप करायचे ?

वगैरे! वगैरे! मग काय झाले डोंबिवलीच्या स्पॉटला चौघीजणी चढल्या. ठाण्यातून 12 जणी आणि डोंबिवलीतून चारजणी, त्याबरोबर एक "ऊर्जेचा धबधबा" प्राची गडकरीच्या रूपाने बस मध्ये चढला. आणि तो संपूर्ण दिवसभर नुसता ओसंडून वाहत होता.


बसमध्ये चढल्या चढल्या तिने सुरुवात केली. 

तुम्हाला काय वाटतं नुसता असंच बसून जायचं? आपण गाण्याच्या भेंड्या लावूया. ती पण संपूर्ण मराठी गाणी .अगदीच भेंडी चढण्याची वेळ आली तर हिंदी आणि खरोखर आपल्या सगळ्यांनी सिद्ध लेखिकानी, सिद्ध लेखिकेचे नाव नाव सिद्ध केले..

एकीनेही हिंदी गाणे म्हटले नाही. 

मग अशा गप्पाटप्पात कधी बदलापूर आले ते कळले देखील नाही. 

शिवाय अर्चना अंबासकर ने मस्त डब्बा भरून अळूवड्या आणल्या होत्या. अगदी बदलापूरला मिळालेल्या अळूवड्यापेक्षा देखील अर्चनाच्या अळूवड्या भारी होत्या. आणि डबा भरून तांबूल( अर्चना तुला तांबोला ची रेसिपी संध्याकाळी सात नंतर ग्रुप वर टाकायची आहे) उल्काने इतक्या खुसखुशीत आणि डब्बा भरून करंज्या आणल्या होत्या की अगदी ओठाने तोडाव्या. 

रोहिणी वावीकरने चिंचेच्या गोळ्या आणल्या, ज्यामुळे शाळेच्या दिवसांची आठवण झाली. आणि कोणी कोला चॉकलेट वगैरे वगैरे, 

थोडसं शोधायला लागलं अखेर हेंद्रे पाडा बदलापूर माहेरवाशिण सापडलं. 

स्टेशन पासून साधारण दोन तीन किलोमीटर अंतरावर आम्हाला मिळाले. 

तिथे उतरल्यानंतर प्रभाताई शिर्के यांनी सर्वांना अर्धवर्तुळ उभे करून, पायावरती गरम पाणी घातले ,प्रत्येकीला ओवाळले, आणि प्रत्येकी वरून तुकडा ओवाळून टाकला. 

तेथे बऱ्याच जणी गहिवरून आल्या. कारण लग्न झाल्यावर पहिल्यांदाच कोणीतरी पुन्हा एकदा असे पायावर पाणी घालून ओवाळून घेतले होते .आणि इथेच प्रभाताईंनी सर्वांची मने जिंकलेली आहेत. 


माहेर मध्ये काहीतरी वेगळ मिळतं, तर ते हे मिळतं. 


 त्यानंतर सर्वांचा नाश्ता झाला उपमा (जो मला अजिबात कधीही आवडत नाही आणि साधारणता कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी प्राधान्याने तोच असतो) आणि सँडविच असो त्याला काही इलाज नाही सँडविच छान होते त्यानंतर बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आमची सोय होती. 

एक चांगला कढीपाटाचा झोपाळा आणि दहा जणांची वर झोपण्याची सोय होती. 

 वरच्या मजल्यावर गेल्यावर, सगळ्या जणी नी झोपाळ्यावर बसण्याची हौस भागवली

 त्यानंतर आमच्या सर्वांचा ताबा प्राचीने घेतला. आणि जेवणाचा आवाज येईपर्यंत आम्हाला एका जागी खिळवून ठेवले .आणि सर्वांचे मनोरंजन देखील झाले. 

बुद्धीला चालना मिळाली. जसे पूर्वी ताक्् धिन धिन मध्ये आदेश बांदेकर फेऱ्या आणि मार्क्स देत होते, त्यानुसार सहा जोड्या झाल्या .

माझ्याबरोबर "आदिती जोशीची" जोडी लागली जवळजवळ आठ-दहा राऊंड झाले. 

मराठी हिंदी गाणी, 

काही कादंबरीकार आणि त्यांची  कादंबरी, संगीतकार आणि त्यांचे गाणे, 

एखाद्या ॲक्टर वरील गाणे

 एखाद्या एक्ट्रेस वरील गाणे

 असे खूप काही छान छान खेळ तिने घेतले आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ,मी आणि आदिती जोशी आमची जोडी त्यात जिंकली. 

प्राचीने स्वतःच्या खिशातून दोनशे रुपयांचे बक्षीस ठेवले होते .

त्यानंतर पुन्हा एकदा जेवणाचा कॉल आला, आणि आपण सांगितल्याप्रमाणेच "बासुंदी पुरीचा" बेत होता. 

मैत्रिणी छान जेवल्या, आराम देखील केला, 

पुन्हा एकमेकींशी गप्पा गोष्टी करत करत पाच वाजले. मग चहा घेऊन आम्ही पुन्हा बस मध्ये बसून बारवी डॅम पाहायला निघालो. 

आमच्याच बरोबर चार डॉक्टर उतरल्या होत्या, आता माझ्याच फिल्ड मधल्या असल्यामुळे मी जाऊन चांगल्या गप्पाटप्पा मारल्या, आणि त्यांना देखील आमच्यासोबत घेतले. 

आमची बस पाठीमागे खालीच होती. बारवी डॅम च्या फक्त शेजारून आम्ही गेलो, मात्र पुढे गेल्यावर एक छोटीशी नदी होती, जी आमच्या वयोगटाला सेफ होती. 

आम्ही पाच सहा जणी पाण्यात उतरलो, आणि मग काय अगदी "छई छप्पा छई छपाक छई " आम्ही पाण्यात बसलो, डुंबलो, आणि छप्पाछप हात मारून तुषार देखील उडवले .

खूप मज्जा मज्जा केली. ज्यांना पाण्यात उतरणे शक्य नव्हते, त्यांनी काठावरून मजा घेतली. 

ती पण अशी तशी नाही तर अगदी समय सूचक गाणी म्हणून


" यमुना जळी खेळ खेळू

 कन्हैया का लाजता"


" जिथे सागरा धरणी मिळते""

 अशी छान छान जुनी गाणी सर्वांनी एकत्र म्हंटली .


मग आम्ही ओले त्याने बसमध्ये येऊन बसलो. आणि हत्ती विहिरीत पडला तर कसा बाहेर येईल? तर ओला होऊन. असा पीजे देखील मारला. आणि गंमत जंमत करत परतीच्या वाटेला लागलो. 


 माहेर मध्ये आल्यावर आल्यावर आम्हाला गरमागरम चहा, आणि पुरी चाट मिळाला. 

वर गेलो जराशे इकडे तिकडे "लोळींगा लोळींगा" केलं. 

परत रात्रीच्या जेवणासाठी खाली उतरलो .

संध्याकाळी मात्र पोटाला लाईट म्हणून "थालपीठ" छान गरमागरम थालपीठ खाल्ली. 

एक दिवस दूध तापवायचे, उद्यासाठी भाजी काय करायची ? अमुक करायचं! तमुक करायचं! सगळ्याला सुट्टी. 

त्यातच डॉक्टरांच्या आलेल्या एका ग्रुपमधील एका मुलीचा वाढदिवस होता .

प्रभा ताईच्या सहकार्यानी अतिशय सुंदर डेकोरेशन केले .फुगे वगैरे लावले. केक मागवला, मग त्या मुलींनी आम्हाला पण आमंत्रण दिले. 

मग आम्ही आपल्या


 "बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना" 

अशा पद्धतीने डीजेच्या तालावर नाचलो. कोणाच्या अंगात आले, कोणी डान्सवर नाचले ,कोणी रॅम्प केला. आणि अगदी प्रत्येकीला त्यामध्ये, सुनंदाताई जोशी, प्रतिभा जोशी,  विजयाताई, अलका तर आपली एव्हरग्रीन ती काय नाचायला पण पुढे होती सगळ्यांना एकदा तरी रॅम्प वॉक करायला लावला. आणि मजा आली. 


मग आम्ही आपल्या" बीच मे मेरा चांद भाई" या उक्तीप्रमाणे मोका मारून घेतला, आणि बर्थडे गर्ल च्या खुर्चीत बसून गळ्यामध्ये चकचकी हार घालून आमचे देखील फोटो काढून घेतले. 

स्टेटसला टाकला, तर खूप लोकांचे मलाच हॅपी बर्थडे येऊ लागले काय म्हणाले असतील ही बाई काय दर तीन महिन्यांनी बर्थडे साजरा करते की काय? 

 पण एक मजा आली.

रात्री बारा एक पर्यंत सगळ्या जणी गप्पा मारत बसल्या ,वरती जागा कमी असल्यामुळे मी खाली प्रभाताईंच्या खोलीमध्ये झोपले.


 (दुसऱ्या दिवसाचा उर्वरित भाग उद्या) 



Rate this content
Log in

Similar marathi story from Classics