Love Writing

Comedy

4.0  

Love Writing

Comedy

न्यू सिमकार्ड

न्यू सिमकार्ड

4 mins
329


एक दिवस अचानक एका अनोळखी नंबरवरुन व्हॉट्सअपवर मॅसेज आला. मेसेज फक्त "Good Morning"

कोण असेल??? कुणाचा नंबर???हे बॉईज म्हणा नाहीतर विवाहित पुरुष कधी पाहत नाही. लॉटरी समजूनच त्या मेसेजला आपल्या ग्रुपच्या साठ्यातील काही गमतीशीर अथवा सल्लादाई मेसेज फॉरवर्ड करतात.


मी ही बायकोच्या नकळत त्या गुड मॉर्निंगला बरेच असे रिप्लाय दिले. डी पी नव्हता त्यामुळे कुणाचा नंबर विचारला???त्यात कळाले. तो नंबर हर्षदा सावंतचा मी फोटोसाठी हट्ट धरला. आणि डी पी पहिला.एक विवाहित आणि खूप सुंदर अशी महिला मोठे आश्चर्य म्हणजे ती ही मी राहतो त्याच ठिकाणी राहणारी. तरी आपल्या नजरेत कशी नाही आली त्याचे नवल. आता आमच्या जुन्या इमारती कडे पाहून तसे ही मन वैतागलेले. त्यात हा तर एक प्रशस्त इमलाच म्हणायचा. आणि त्या इमल्यात झणभर विश्रांती मिळावी म्हणून धडपड 😁😁😁😁😁

राहून राहून एकच प्रश्न मनात माझा नंबर तिला कसा मिळाला असेल????

त्यावर तिचा रिप्लाय "योगायोग समजा ....!"शोभत नसेल जर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधे तर pls डिलीट करा"

माझा रिप्लाय "इतका निर्दयी नाही हा मी?????

चॅटिंग तशी नेहमी व्हायची. पण ती फोनवर बोलायला तयार नव्हती.

एका दिवशी चॅटिंग करताना

ती - तुमचे लग्न झाले आहे का??

मी - नाही

लग्न झालेली बायको आणि चार मुलांचा संसार आसून कुवरा झालो होतो तिच्यासाठी.

ती - काय करता जॉब की????

मी - जॉब करतो शिवाय लिखाणाची ही सवय आहे कधी तरी कथा कविता लेख लिहितो.


हव्या तितक्या थापा .बाप बड्यात पेन हातात नाही घेतले आणि कथा कविता लेख. अगदी दिवसभर तिने ठेवलेला डी पी पाहून शेवटी एकदा भेटायची इच्छा बोलून दाखवली. नाही हे उत्तर स्वाभाविक होते. आणि तेच मिळाले. call वर बोलू या का???नको आमचे हे असतात आपण फक्त मेसेज वरच बोलू आता आमच्या चॅटिंगमधे तिचे हे आडथळा म्हणजे माझ्या फ्रेंडशिपला तर ग्रीन सिग्नल मिळालाच होता. मान्य केले कधी call नाही करायचा फक्त चॅटिंग.


दिवसभर ऑफीसमधून बरीच चॅटिंग करायचो माझे गमतीशीर रिप्लाय कधी कधी हसवायचे तिला तर कधी कधी तर माझ्या सेन्स ऑफ हुमर चा तर ती पोट भरून स्तुती करायची. कधी कविता तर कधी गाणे. एक दिवस आपला एरिया सोडून भेटण्याचे बोललो तरीही तयार नवती पण जिद्द आणि चिकाटी कामी आली. आणि माझी भेट झाली त्या भेटीत चांगली खोड मोडली माझी. दुपारी ३ वाजता ठरली भेट. बायकोने विचारले

"आज सुट्टी असताना इतके नटूनथटून कुठे??? मनातल्या मनात म्हटले तरी आमचं मांजर आडवे कसे नाही आले.

अरे माझ्या ऑफिस मधल्या मित्राचे लग्न आहे.

आता ऑफीस मधल्यांचे लग्न बारसे कधी त्यांचे आजोबा तर कधी आज्जी माझ्या अश्या वेळेला मारायचे. आज ही एकाला लग्नाच्या बोहल्यावर चढविण्याचा बहाणा सांगून निघालो.

३ वाजता पार्कमधे ठरविल्याप्रमाणे वाट पाहत होतो. मस्त हातात फुलांचा बुके. ३.३० झाले. तिला मेसेज केला.

"कुठे आहेस????बस थोडा वेळ अर्धा तास फक्त.

चिडलो तर होतो तरी its okay आरामात ये.

तिची वाट पाहत असताना

"कुणी येणार आहे का???

मागे वळून पाहिले तर माझी बायको...

काय स्थिती असेल माझी साक्षात चंडिका माता डोळ्यासमोर.

"मित्राची वाट पाहतोय लग्नाला जाण्यासाठी

"तू काय करतेस इथे????

हा प्रश्न मी विचारला का तुम्हाला ??????

कोण मित्र येणार आहे ??? हर्षदा सावंत

आयला हिला कसे माहित?? वेळो वेळी मी चॅटिंग डिलीट करायचो तरी त्या साठी तर ही पाठलाग करून आली नाही ना???

हर्षदा नाही हर्ष सावंत. अडखळत उत्तर दिले.

हर्ष नवीन भरती काय ?? तुमच्या ऑफीसमधली ??

भरती जुनी पण ओळख नवी आहे. तो आला की जाईन तू कशाला आलीस इथे ???? आता चोर कोतवाली करत होता.

आमचा कोतवाल (बायको )

ह्या पार्कमध्ये सर्व प्राणी आहेत आज कोल्हा येणार म्हणून.

म्हणजे ????

येवू द्या तुमचा मित्र मग जा ??? लग्नाला

लग्न कुणाचे नव्हते पण आज माझे मोडणार इतके नक्की.

तिच्या नकळत मेसेज केला हर्षदा ला

सॉरी नंतर कधी भेटू bye see you

फोन स्विच ऑफ केला.

बायकोने तिचा मोबाईल काढला आणि मला दाखविला. हर्षदाला पाठविलेला मेसेज तिच्या व्हॉट्सऍपवर होता.

आता त्या पार्कमध्ये माझी अवस्था भिजल्या मांजरीसारखी होती.

मी इतके दिवस हर्षदा समजून जिच्याशी चॅटिंग करत होतो ती माझी बायको. मढे बसविले त्या जियो कंपनीचे. स्वस्त प्लॅनच्या चक्करमधे माझ्या बायकोने जियो नंबर घेतला. मला surprise करण्यासाठी तिने मला नवीन नंबरवरून मेसेज केला होता. माझ्या लहरीपणामुळे मीच अंगावर संकट ओढवून घेतले. कधी तिच्यासाठी एक गुलाब नाही घेतलेले आणि चक्क ५०० चा बुके. आता घरी लाथ आणि बुक्के नक्की. 😁😁😀😀😀


हर्षदा तिच्या वर्ग मैत्रिणीचे नाव आणि फोटो पण तिचाच डी पी मधे ठेवलेला. ते नाव आणि हसऱ्या फोटोच्या चक्करमधे माझा चेहरा रडवेला झालेला.😂😂😂😂😂😂

भयंकर मोठी फजिती मी हातातील बुके फेकून दिला.

ती म्हणाली "बुके उचला त्यातली फुले तुमच्या फोटोला हार घालायला उपयोगी पडतील."

जगातला मी पहिला होतो आपली तिरडी सजविणारा आणि फुले मरणाआधी विकत घेणारा.ती पार्क मध्ये काहीच नाही बोलली. पण घरी गेल्यावर जी कहाणी घडली ती लेखक असूनही मला शब्दात मांडता येणार नाही. 😁😁😁😂😂😂😂


एक वीकनंतर पुन्हा माझ्या नंबरवर एक अनोळखी नंबरचा मेसेज Good Morning...

ह्या वेळी माझा रिप्लाय...

मी राज मोहिते. माझे लग्न झाले आहे. मला चार मुले आहेत. मी कुणी लेखक कवी नाही.

तिकडून रिप्लाय

You are a liar

Good bye bastard

तो मेसेज होता माझ्या ऑफिसमधील काव्याचा

जिला मूर्ख बनवून जाळ्यात ओढले होते

ह्या ही वेळा जिओच्या प्लॅनने माझा प्लॅन चौपट केला.

मढे बसविले त्या फ्री सिम कार्ड ऑफरचे

😂😂😂😂😂😂

हे माझ्यासोबतच होते हा.........😁😁😁😁😭😭😭😭😭😭


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy