नववधु प्रिया मी (भाग 2)
नववधु प्रिया मी (भाग 2)
बाहेर खाटा वर शाम ची आई झोपायची. जागा तशी खूप लहान होती. जेवण करून शाम आई जवळ खाली झोपला आणि त्याच्या थोडं बाजूला सखू झोपली. तिला खर तर शाम ला मिठी मारून झोपावं अस वाटत होतं. पण आजच लगीन झालंय मग ते पूजा बिजा असणार मग त्याच्या जवळ झोपता येईल असा विचार करत सखू झोपी गेली. शाम मात्र वर आढया कडे बघत बराच वेळ जागा होता.
सकाळी सखू उठली तर शाम ने बाहेर चूल होती ती पेटवून अंघोळी चे पाणी तापत ठेवले होते. सखू ने बिछाना आवरला . शाम बोलला तू अंघोळ करून घे मग आपण गावच्या देवी ला जाऊन येऊ. बर म्हणत सखू घरा बाहेर असणाऱ्या मोरी कडे अंघोळीसाठी गेली. शाम ने आई ला खायला देऊन सखू ला घेऊन देवी च्या दर्शनाला निघाला. शाम खूप कमी बोलत होता तर सखूच जास्त बडबड करत होती. जाणूनबुजून त्याला स्पर्श करत होती. हात धरून चालत होती . पण शाम तिचा हात बाजूला करत होता. सखू ला समजेना की शाम असा का वागत आहे. घरात आई असते पण इथे बाहेर याला माझ्या जवळ यायला किंवा नुसता स्पर्श करायला काय अडचण आहे?
दुसऱ्या दिवशी घरगुती पध्दतीने सत्यनारायण पूजा झाली. सखू ला शाम ची ओढ लागली होती. कधी एकदा रात्र होते अन शाम च्या कुशीत जाते अस तिला झाले होते. रात्र झाली शाम ने स्वयंपाक घरात दोघांचा बिछाना टाकला. सखू नुसत्या कल्पनेनेच मोहरून गेली होती. शाम ने स्वयंपाक घराला जो आडोसा म्हणून पडदा होता तो बाजूला केला. सखू म्हणाली,अव पडदा का सरकवला आई खाटे वर आहेत तर आपण कस इथं झोपणार? आई ची तब्येत ठीक नसती तिच्या कड लक्ष असायला पायजे म्हणून पडदा नको. अस बोलून शाम अंथरुणावर पडला. त्याची आई झोपली होती पण खोकला सतत तिला येत असे. सखू ही शाम च्या बाजूला झोपली. तिने त्याच्या अंगावर हात टाकला. शाम काहीच हालचाल करेना म्हणून सखूच जरा वर उठून अंधारात शाम च्या ओठांवर आपले ओठ ठेवू लागली तसा शाम ने तिला बाजूला केले,नको आई उठल अस बोलून तो सखू कडे पाठ करून झोपला. सखू ला काहीच समजत नवहते. असा कसा हा ? चरफडत केव्हा तरी रात्री सखू झोपी गेली.
सकाळी लवकरच शाम भाकरी भाजी घेऊन कामावर जायचा. सखू संध्याकाळी त्याच्या वाटे कडे डोळे लावून बसायची. शाम आला की मोजकेच बोलत असायचा. असेच दोन महिने झाले. अजून ही शाम ने सखू ला जवळ घेतले नवहते. सखू च्या सगळ्या स्वप्ना वर पाणी फिरले होते. रोज रात्री शाम आईच कारण देत असायचा.
शाम कामावरून घरी आला. रात्री जेवताना आई ला म्हणाला, आये इथलं काम आता संपले आहे मला शहरात काम बघायला जावे लागणार. जा की मग आम्ही राहू दोघी. काय ग सखू आई सखू कडे बघत म्हणाली. सखू ला हा धक्काच होता . नवीन लग्न झालेला नवरा बायको ला सोडून दुसरी कडे कामाला जातो. काय चाललय याच ? तिला काहीच समजत नवहते. सकाळी शाम स्वतःच आवरून बाहेर पडला. सखू ला म्हणाला,आई कड लक्ष दे मी अधनमधन येत जाईन. शाम शहरात निघून गेला. याच मना विरुद्ध माझ्या बरोबर लग्न झालय का? कसे काय हा बायको पासून लांब राहू शकतो असा विचार सखू करत राहायची. का याच दुसऱ्या बाई वर प्रेम हाये? कोण बाई असलं का याच्या आयुष्यात? सखू असा विचार करू लागली.
पंधरा दिवसांनी शाम घरी आला. त्याला शहरात काम मिळाले होते. सखू ने जबरदस्ती ने शाम ला गावात फिरायला आणले होते. तिला त्याच्या सोबत बोलायचे होते. जे घरात बोलता आले नसते. मंदिराच्या बाहेर झाडा खाली ते दोघे बसले होते. अव मला सांगा तुम्ही काय मनात नसताना माझ्या शी लगीन केलं काय? का कोण दुसरी बाई हाये ? सखू ने विचारले. शाम ला काय बोलावे समजेना आज ना उद्या ही वेळ येणार हे त्याला माहीत होतं. नाय कोण बी दुसरी बाई नाय. मग माझ्या जवळ का येत नाहीसा? सखू तुला हे आधीच सांगायला पायजे होते पण आई पुढं गप्प बसलो. शाम बोलला.
काय बोलायचं होत नीट सांगा सखू म्हणाली.
मग शाम तिला सांगू लागला .. आणि ते ऐकून सखू शॉक लागल्या सारखी एका जागी बसून राहिली. डोळयाला तिच्या पाण्याची धार लागली. काय सांगता हे खरं हाय? सखू ने विचारले. व्हय मी तुला ते सुख नाही देऊ शकत कारण मी जोगत्या हाय. शाम खाली मान घालून म्हणाला. मग मला का फसवलं? का लगीन केलं माझ्या बरुबर?
सखू तुला फसवायच नवहत ग पर आये बोलली की माझं लगीन नाही झालं तर लोकांना काही बाई संशय येईल म्हणून लगीन कर म्हणाली. लोक नाव ठेवतील म्हणून लगीन करायला भरीस पाडल मला.
मी काय करायचं मग आता? माझी स्वप्न तर राख झाली. सखू रडत बोलत होती.
तुला जे पटलं ते कर सखू मी अडवणार नाही. शाम म्हणाला.
दोघे घरी आले. रात्र भर सखू च्या डोळयाला डोळा लागला नाही. सकाळी उठून सखू पिशवीत आपली कापड घेऊन बाहेर पडली. कोणाला काही बोलली नाही.
काय रे शाम ही कुठं गेली अस न बोलता.. आई ने विचारले.
आये तिला समजलं की मी जोगत्या हाय ते. म्हंजी मीच बोललो. कशाला तीच आयुष्य माझ्या बरोबर नासवत ठेवू.
आई गप्पच बसली.
सखू आई कडे आली आणि आईच्या गळयात पडून रडू लागली. काय ग पोरी काय झालं अन तू सकाळ सकाळ हिकडे आलीस? शाम बरूबर भांडली का? बोल की आता घडाघडा शारदा म्हणाली.
आये त्यानं फसवलं ग मला.
म्हंजी शाम च काही बाहेर हाय काय?
नाय पर तो बापय नाय. सखू बोलली.
म्हंजी ? मला समजलं अस सांग .
आये त्यो शाम जोगत्या हाय त्यो मला कसलं बी सुख नाय देऊ शकत. सखू रडत रडत बोलली.
शारदा ने तोंडावर हात धरला. खर सांगती का तू हे?
व्हय त्यानं सोतहा सांगितल मला.
सखू ही गोष्ट बाहिर कुणाला कळता कामा नाय, नाहीतर आपली नाचक्की होईल बघ तवा गुमान गप रहा.
सखू महिना झाला आई कडेच राहत होती. शाम शहरात कामाला गेलाय म्हणून सखू आई कड आलीय अस शेजाऱ्याना सांगितले होते.
सखू एकटीच गावा बाहेरच्या देवळात आली होती. पुढं काय करायचं विचार करत बसली. काही सुचत नवहत तिला. अंधार पडायला सुरुवात झाली तशी ती घरी जायला निघाली. वाटेत तिला सरपंचा चा पोरगा रमेश भेटला. तिला बघून जवळ आला, काय ग सखू लई दिस झाले माहेराला येईन काय अडचण हाय काय? तो लालची नजरेने सखू कडे बघत होता. एक नंबरचा वाया गेलेला मुलगा होता रमेश.
नाय असच राहिलीय आई ची तब्येत बरी नाय म्हणून सखू बोलली.
रमेश तिच्या जवळ येत तिच्या खांदाला धरून म्हणाला, आताच लगीन झालं नव्ह तुझं तरी नवऱ्याला सोडून राहतीस. त्याने तिचा खांदा दाबला. सखू ने आपल्या हाताने त्याचा हात बाजूला केला. तुला काय करायचे रे सखू रागात म्हणाली.
मला शिकवू नको , तुझ्या कड बघून समजत अजून तुला नवऱ्यान हात बी लावला नाय तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. मी हाय कधी पण ये शेतातल्या घरात, म्हणत रमेश ने सखुला आपल्या कवेत ओढले. क्षणभर सखू ला त्याचा स्पर्श रोमांचित करून गेला. सखू काही प्रतिकार करत नाही बघून रमेश ने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि जोरात चुंबन घेतले. सखू या अनपेक्षित स्पर्शाने शहारली पण लगेच सावरली. आणि पळत पुढे निघून गेली.
घरी आली जेवण करून अंथरुणावर पडली. रमेश सोबत घडलेला प्रकार तिला अस्वस्थ करत होता. त्याचा स्पर्श आता ही तिला अंगावर शहारा उमटवत होता. याच स्पर्शाची ,सुखाची स्वप्न तिने बघितली होती आणि ते नैसर्गिकच तर होत. शाम वर तिचा जीव होता त्याच्या आठवणीने डोळे भरून आले.
दुसऱ्या दिवशी शारदा बाजारात गेली होती. सखू एकटीच होती दुपारी सगळं सुनसान होत. दारावर टकटक झाली तसे सखू ने दार उघडले,तर दारात रमेश उभा होता. इथन चाललो होतो ऊन लई हाय बघ वाइच पाणी दे प्यायला रमेश म्हणाला. सखू पाणी घेऊन आली तर रमेश घरात आला होता. सखू च्या हाताला स्पर्श करत त्याने पाण्याचा ग्लास हातात घेतला. कालच्या प्रकारला सखू ने प्रतिकार नाही केला म्हणून आता रमेश मुद्दाम आला होता. रिकामा ग्लास सखू कडे देत त्याने तिचा हात पकडला. रमेश सोड मला काय करतोस? सखू हात सोडवत म्हणाली पण त्याची पकड घट्ट होती.
तुला नाही माहीत मी काय करतो. काल केलं तेच म्हणत त्याने सखू ला आपल्या जवळ ओढले आणि तिथेच कॉट वर पाडले. सोड मला रमेश माझं लगीन झालंय. व्हय काय लगीन झालं पर सुहाग रात नाय झाली अस म्हणत त्याने सखू चा साडी चा पदर छातीवरून बाजूला केला आणि तिच्या अंगावर वाकला तेवढ्यात कोणी तरी रमेश ला जोरात बाजूला केले आणि जोरात दारा बाहेर ढकलले . निघ इथंन नाहीतर जीव घेईन तुझा शाम रमेश ला हाकलत म्हणाला. रमेश निघून गेला. सखू पदर नीट करत उठून बसली शाम ला बघून डोळे भरून आले तिने त्याला घट्ट मिठी मारली. अवो ही असली गिधाड शरीराच लचक तोडणारी असतील तर त्या परीस मी तुमच्या जवळ आयुष्य भर राहीन. मला इथन घेऊन चला माझं चुकलं. सखू रडत बोलत होती.
शाम ने तिचे डोळे पुसले , सखू पर मी असा मग माझ्या बरुबर तू संसार कसा करशील आणि तुझं स्वप्न?
माझा जीव हाय तुमच्या वर तुमी कसबी असाल तस माझं आहात. मी माझी स्वप्न,माझं सुख विसरून जाईन पर अस एकटीने राहणार नाय.
शारदा घरी आली तेव्हा सखू बोलली आये मी माझ्या सासरी निघाली आता तिकडंच राहीन. जे नशिबात असलं ते जिण जगीन.
तुला जस पटत तस कर शारदा म्हणाली.
सखू शाम सोबत आपल्या घरी जायला निघाली.
समाप्त
